Home Blog Page 5

Umrganews /उमरगा तालुक्यात वेळा अमावस्या उत्साहात साजरी

0

भजी, बाजरी भाकरी, बाजरीचे उंडे, खीर, धपाटे, आंबील, आदी रानमेव्याचा घेतला आस्वाद
————–
सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा

उमरगा: निसर्गाचा दगाफटका कितीही बसो, पण काळ्याआईची मनोभावे पुजन करत बळीराजा, शेतकऱ्यांनी शेतातील उत्पन्न, समृद्धी व भरभराटी होण्याची मनोकामना व्यक्त करून शुक्रवारी (दि.१९)रोजी वेळा अमावस्या (येळवस) उत्साहात साजरी केली.

यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडलेले खरीप हंगामातील पिकाचे उत्पन्न जेमतेमच निघाले.जमिनीच्या ओलाव्यामुळे रब्बी हंगामातील पेरणी उशिरा सुरू झाली परंतु पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेत शिवारातील पिके बहरलेली दिसून आले. खरिपामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असताना सुद्धा शेतकरी न डगमगता काळ्या आईच्या सेवेसाठी सज्ज झालेला दिसून येत आहे.dharashivnews

येळवस या सणानिमित्त शेत शिवारात हर हर बोलो रे भगत राजा हर हर बोला तसेच महादेवाचा जयघोष करत यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या नातेवाईकांसह मित्र परिवारासह आपल्या शेतात रानमेव्याचा आस्वाद घेण्यासाठी निमंत्रित केले होते. यावेळी बाल गोपाळांसह महिला, पुरुष, मित्र मंडळांनी भजी, बाजरी भाकरी, बाजरीचे उंडे, खीर, धपाटे, शेंगदाण्याची पोळी, आंबील, आदी रानमेव्याचा आस्वाद घेतला. उमरगा शहरात सकाळपासूनच जिकडे तिकडे सणाला जाण्यासाठी प्रत्येकाची लगबग सुरू असल्याचे दिसून येत होते.

Umrganews /त्यामुळे शहरात दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसून येत होता. अनेक व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे खेड्यातून येणाऱ्या ग्रामस्थांचा ओघ कमी असल्याने शहरातील अनेक रस्ते दुपारनंतर निर्मनुष्य दिसत होते.

Dharashivnews /सर्व शेत शिवार माणसाच्या वर्दळीने फुलून गेले होते. शेतकरी सकाळपासूनच आपल्या शेतात पांडवाची पूजा करण्यात मग्न असल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे सर्वच शेत शिवार शेतकरी, नातेवाईक, मित्रपरिवारांनी गजबूज गेले होते. हा वेळा अमावस्या सण शेतकरी बांधवांनी उत्साहात साजरा केला.

Umrganews /युवा कार्यप्रशिक्षण योजना मतदान घेण्यासाठी राबविले: आमदार प्रवीण स्वामी

0

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मांडलेल्या विविध प्रश्नांची सांगितली माहिती

उमरगा: युवा कार्यप्रशिक्षण योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान घेण्यासाठी ही योजना राबवली आहे. पण आता त्या लोकांना त्यांनी वारंवार सोडले असून, त्या लोकांच्या आंदोलनावर लाठी चार्ज करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातोय.
उबाठा शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विविध महत्त्वाचे प्रश्न मांडल्याची माहिती देताना
उमरगा येथील शिवसेना उबाठा संपर्क कार्यालयात सोमवारी (दि.१५) रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार प्रवीण स्वामी पुढे म्हणाले की, राज्यातील असा एकमेव लोहारा तालुका असून, शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीचा तांत्रिक अडचणीचा प्रश्न आहे. उमरगा- लोहारा तालुक्यातील तलाठी कार्यालयाची अनेक प्रलंबित प्रश्न मांडले आहेत. आश्रम शाळेचे थकित अनुदान द्यावे, पोलीस पाटील यांची शैक्षणिक आणि शारीरिक पात्रतेनुसार नेमणूक करावे, १९९३ च्या भूकंपा नंतर १९९५ पर्यंत

पुनर्वसनाची कामे झाली परंतु नंतर त्या गावांना कसलाही भरीव निधी मिळालेला नाही त्या गावांना विशेष पॉकेज द्यावे.
राज्यामध्ये एन. एच. एम. आरोग्य विभागामध्ये जी.आर नुसार भरती झालेली नसून, त्या कर्मचाऱ्यांना सहा ते दहा हजार मानधन आहे. अशा कर्मचाऱ्यांना सुद्धा जी‌.आर नुसार भरती करावे.

ग्रामपंचायत स्तरावर डाटा ऑपरेटिंग कर्मचाऱ्यांच्या मानधनांमध्ये वाढ करावे, जिल्हा परिषद शाळा ४०-५० वर्षांपूर्वी बांधले गेले असून त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून राज्यातील सर्व शाळा आधुनिक करावे,
लोहारा तालुक्यात कृषी भवन, विश्राम ग्रह, एमआयडीसी तसेच हुतात्मा स्मारकासाठी विशेष पॅकेज द्यावे. शेती संदर्भात राज्य शासनाच्या योजना असून, नगरपालिका नगरपंचायत मध्ये मोडतात म्हणून त्या योजना त्यांना लागू नाहीत तशी तरतूद करावी, महसूल विभागाकडे मागणी केल्याची माहिती त्यांनी सांगितले आहे.

भूकंपग्रस्त कर्मचाऱ्यांच्या वयामध्ये वाढ व्हावे, पंचायत समिती, महावितरण, महसूल मोजणी, आरोग्य विभाग, जलसंपदा या शासकीय कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा असून, रिक्त पदाची माहिती काढून शासनाने तीपदे लवकरात लवकर भरावे,
राज्यातील नगरपालिका नगरपंचायत मध्ये कंत्राटी स्वरूपात कर्मचारी भरले आहेत. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना नोकरीत कायम घ्यावे. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला शंभर टक्के अनुदान द्यावे.

Umrganews /या आयोजित पत्रकार परिषदेला शैलेश नागणे, बालाजी सुरवसे, शिवकांत पतंगे आदी उपस्थित होते.

सूर्या मराठी न्यूजसाठी ऋषिकेश सुरवसे उमरगा

Yavalnews /सांगवी बु!! येथे प्रधानमंत्री सौर घर मोफत वीज योजनेंतर्गत जनजागृती शिबिर

0

 

यावल प्रतिनिधी :- विकी वानखेडे

सांगवी बु!! ता. यावल येथे गुरुवार, दि. 19 डिसेंबर 2025 रोजी महावितरण कंपनीमार्फत प्रधानमंत्री सौर घर मोफत वीज योजना अंतर्गत विशेष जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

हे शिबिर फैजपूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. नितीनकुमार पाटील व सहाय्यक अभियंता श्री. राहुल कवठे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.

या शिबिरामध्ये ग्रामस्थांना विज बिलावरील नाव बदल प्रक्रिया, तसेच प्रधानमंत्री सौर घर योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. सौर ऊर्जेचा वापर करून वीज बिलामध्ये कशी बचत करता येईल, याबाबत उपस्थित नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये सौर ऊर्जेबाबत सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला.

या कार्यक्रमास सांगवी बु!! गावातील मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महावितरणचे कर्मचारी श्री. सुरेश मोरे (लाईनमन), श्री. महेंद्र महाजन, श्री. हर्षवर्धन तळेले, जुबेर ,योगेश बारी, गोविंदा भास्कर,सचिन चौधरी,स्वाती मोरे, ऋषिकेश इंगळे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

तसेच या कार्यक्रमासाठी सांगवी बुद्रुक गावाचे प्रभारी सरपंच श्री. अतुल फिरके, ग्रामविस्तार अधिकारी पुरुषोत्तम तडेले, माजी सरपंच श्री. विकास धांडे व ग्रामविकास अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Yavalnews /या जनजागृती शिबिरामुळे गावातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार असून, सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज खर्चात लक्षणीय बचत होईल, असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.

Breakingnews /हिंगणघाटमध्ये १५ वर्षीय मुलाचा तलावात मृत्यू; कारण अस्पष्ट, पोलिस तपास सुरू

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Wardhanews /हिंगणघाट शहरातील संत गाडगेबाबा वॉर्ड, जुनी वस्ती येथील रहिवासी दक्ष आनंद गिरी (वय १५) हा मुलगा १८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता कोणालाही न सांगता घरातून निघून गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. याबाबत हिंगणघाट पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी समीर कुणावार (आमदार) यांच्या कार्यालयाजवळील तलावात दक्ष गिरी याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार दक्षला पतंग उडवण्याचा छंद होता. पतंग उडवण्याच्या नादात तो तलावाच्या परिसरात गेला असावा आणि त्यातून ही दुर्दैवी घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Policenews /मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सदर प्रकरणाचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.

Umrganews/ /महिलांच्या स्वावलंबनासाठी आरि वर्क्स प्रशिक्षणाचा शुभारंभ

0

गुंजोटी येथे दिक्षा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा उपक्रम

सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा

उमरगा : तालुक्यातील गुंजोटी येथील दिक्षा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना स्वावलंबी, सक्षम व आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने आरि वर्क्स प्रशिक्षण कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विभावरी शाईवाले, प्रमुख पाहुण्या म्हणून सरपंच सौ. कौशल्य सुनील बेळमकर उपस्थित होत्या.

यावेळी व्यासपीठावर डॉ. अनिस नझीर शेख, प्रशिक्षण शिक्षिका
ऋतुजा नरेंद्र पाटील, माजी सरपंच सौ. सरस्वती शरद कारे,जिजाऊ ब्रिगेड धाराशिव सौ. रेखा नंदकुमार पवार, ग्रामपंचायत सदस्य सौ. विजया जीवन चव्हाण, माजी प्रा. मुख्याध्यापक सौ. सुरेखा राजेंद्र भोसले, भावसार समाज अध्यक्षा सौ. शैला लोखंडे,
सौ. शितलताई नागभूषण रंगदळ, सौ. अस्मिता अविनाश सूर्यवंशी
,सौ. विद्याताई ताकमोगे, सौ. वैशाली जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे मार्गदर्शन माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. धनश्री रवींद्र ढंगे यांनी केले.
महिलांनी कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराकडे वाटचाल करावी, तसेच शासकीय योजना, बचतगट, पंचायत राज व्यवस्था आणि महिलांच्या नेतृत्वाची भूमिका महिलांनी केवळ प्रशिक्षणापुरते न थांबता, समाज व गावाच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
दिक्षा बहुउद्देशीय सामाजिक संस्था भविष्यातही महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

Umrganews/कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तन्मय शेटगार यांनी केले. तर प्रास्ताविक सौ. दिक्षा मल्लिकार्जुन साखरे आभार संस्था सचिव सौ गोदावरी मल्लिकार्जुन साखरे यांनी मानले.या कार्यक्रमास गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Buldhananews /बुलढाणा येथून सुरू झालेल्या एका पतसंस्थेत मोठा भूकंप…!

0

 

[१) कोट्यावधीचा घोटाळा,नियमबाह्य कर्ज वाटप

 

सीईओंचा अचानक राजीनामा… तसेच इतर कर्मचारीही संस्था सोडून देण्याचे तयारीत.

३)सदर पतसंस्थेची सखोल चौकशी व्हावी.]

 

पुणे (प्रतिनिधी) @ ः- हजारो कोटी ठेवी असलेल्या आणि नियमबाह्य हजारो कोटी रुपये कर्ज वाटप झालेल्या तसेच बुलढाणा येथून सुरू झालेल्या अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या पुणे ऑफीसमध्ये मोठा प्रशासकीय भूकंप झाल्याची चर्चा सुरु आहे. आतापर्यंत संस्थेची धुरा पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात सांभाळण्याचे काम करणारे तसेच संस्थेच्या स्थापनेपासूनच कार्यरत असलेल्या सीईओ ने अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ह्या राजीनाम्यामुळे संस्थेत मोठी खळबळ उडाली असून, अनेक कर्मचारी देखील संस्था सोडण्याच्या तयारीत असल्याचे समजते. ह्या प्रकारामुळे पतसंस्थेत काहीतरी मोठी गडबड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ह्याबाबत माहिती अशी की,बुलढाणा येथील एका बलाढ्य व राजकारणाशी संबंधअसणा- मोठ्या व्यापा-याने सुमारे 35 वर्षांपूर्वी ह्या बुलडाणा अर्बन को.आॕप,सह. पतसंस्थेची स्थापना केली आहे. तेंव्हापासून एकाच परिवारातील आणि जवळचाच व्यक्ती (विद्यमान सीईओ) यांचेच या बँकेवर वर्चस्व राहिलेले आहे.

गेल्या 35 वर्षांत या बँकेत आतल्या आत अनेक प्रकारचे घोटाळे झालेले आहेत. या घोटाळ्यांची नेहमीच चर्चा होत असते, परंतु प्रत्येक वेळी संस्थापक आणि त्यांचे सहकारी घोटाळे पद्धतशीरपणे मॅनेज करीत असतात. ह्यापूर्वी काही वृत्तपत्र व मीडिया मधून घोटाळ्यांना उजागर केले होते.

ह्या पतसंस्थेच्या अनेक शाखांमध्ये आजवर घोटाळे मॅनेज करण्यात भलेही व्यवस्थापनाला यश आले असावे, परंतु गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील कार्यालयात चाललेल्या घोटाळ्यांवर अध्यक्षांचे नियंत्रण राहत नसल्याचे दिसत आहे. सीईओ हे अत्यंत बेमालूमपणे घोटाळे करीत असल्याची खात्रीशिर माहिती पुण्याच्या वर्तुळात व्यक्त होत आहे.

जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये संबंधित पतसंस्थेचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत. एका माहितीनुसार हा व्यवहार अनेकांच्या अंगलट आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून संस्थापक आणि सीईओ यांच्यात चांगलेच बिनसल्याचे दिसत आहे. या बिनसण्यामागे बँकेत झालेला कोणतातरी मोठा घोटाळा असण्याची शक्यता आहे. सीईओ गेल्या अनेक वर्षांपासून संस्थापकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत आहे.

तसेच संस्थापक अध्यक्ष केवळ आपली मुलगी आणि जावयाला झुकते माप देत असल्याची सीईओंची खंत आहे. सीईओंनी अनेक वर्षे पतसंस्थेवर आपले वर्चस्व येण्याची वाट पाहिली. अखेर सीईओचाही बांध सुटला अन् संस्थापकही वैतागला, त्यामुळे अखेर या प्रकरणाची परिणती ही सीईओंच्या राजीनाम्यात झाली आहे.

या पतसंस्थेत आजवर कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेले आहेत. अनेक कर्ज प्रकरणे नियमबाह्य जिल्ह्यासह इतर भागातही झाले आहेत. संस्थापक, त्याचे कुटुंबीय आणि त्यांचे काही जवळचे हस्तक यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून स्वत:च्या गडगंज संपत्ती बनवून ठेवल्या आहेत. ह्यात सीईओदेखील मागे नाही. सीईओंनी पण घोटाळ्यांची मोठी मालिकाच राबवलेली आहे.

सीईओकडून दिला गेलेला राजीनामा हा सुद्धा अत्यंत गंभीर बाब मानला जात आहे. पतसंस्थेत चाललेल्या घोटाळ्यांचा कुठेतरी मोठा स्फोट होणार यात शंका नाही.

Buldhananews/त्यामुळे आता पतसंस्थेशी निगडित ठेवीदार व खातेदारांनी याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच ह्यापूर्वी संग्रामपूर तालुक्यातील राठी नामक व्यापा-याची फसवणूक झाली आहे, तसेच मोताळा येथे सुद्धा फसवणूक झाल्या प्रकरणी उपोषण सुरु आहे.त्यामुळे ह्या पतसंस्थेची निपक्षपणे चौकशी होवून सर्व संबधितावर कारवाई व्हावी अशी जनतेत चर्चा सुरु आहे.

Friend news/वर्गमित्र – मैत्रिणी तब्बल 29 वर्षानंतर परत एकत्र….

0

 

अनेक मित्र – मैत्रिणीच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या….

सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा

उमरगा : स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या उमरगा शहरातील आदर्श विद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी देश विदेशात विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. १९९५ – १९९६ या वर्षातील दहावीचे वर्गमित्र – मैत्रिणी तब्बल 29 वर्षांनी रविवार दि. १४ रोजी येथे झालेल्या स्नेहमेळाव्यात एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देत गुरुजनाविषयी आदर व्यक्त केला.

कार्यक्रम उमरगा शहराजवळील लातूर रोड लगतच्या बिरूदेव मंदीरासमोरील हॉटेल एम बी रिसाॅर्ट मध्ये रविवारी १४ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. दिवंगत मित्र मैत्रिणी व गुरुजनांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. परिचय देताना अनेकांनी आपल्या यशस्वी कारकिर्दीच्या कथा सांगितल्या तर अनेकांनी शालेय व जुन्या आठवणींना उजाळा देत भावूक झालेले दिसून आले. दिवसभर मनोरंजक कार्यक्रम, शाळेच्या काळातील गाढवाचे शेपूट, मटकी फोड, संगीत खुर्ची, व्हॉली बॉल, गाण्यांच्या भेंड्या असे खेळ खेळले गेले.

सर्व मित्र मैत्रिणींनी ग्रूप डान्स तसेच एकमेकांचा परिचय करुन आनंद घेतला. सर्वांनी आपला नवा परिचय देत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. यात विवेक तपसाळे यांनी सुमधुर आवाजात गाणे सादर करून कार्यक्रमाचा गोडवा वाढविला.

माधुरी तडकले, अबोली नाईक, भाग्यश्री पाटील, ज्योती भांडेकर, राजश्री पाटील, सुलक्षणा पाटील, आरती ठाकूर, संजीवनी पाटील, अनिता मनगुळे, रूपाली शेळके, चंद्रदीप जाधव, शिवशंकर दंडगे, विवेक तपसाळे, लक्ष्मण पवार, प्रेमनाथ सरवदे, देवीदास भोसले, नेताजी ओवांडकर, किशोर नागदे, बालाजी जाधव, दिपक सुर्यवंशी, व्यंकट धुमाळ, संतोष हेबळे, राहूल दिवटे, संजय शेवाळे, धनराज मुळे, दयानंद जाने, सिताराम स्वामी सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपक सुर्यवंशी व मिरा भोसले – चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक लक्ष्मण पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रूपाली शेळके यांनी केले.

सर्व शालेय मित्र मैत्रीणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता आयुष्यातील शेवटच्या टप्प्यापर्यंत दरवर्षी एक दिवस पहिल्या टप्प्यातील मित्र मैत्रिणी ना देण्याचे वचन घेतले — रुपाली शेळके पुणे.
——–
एकाच बेंचवर बसून जीवनाचे सप्तरंगी स्वप्न रांगविणारे मित्र मैत्रीणी मोठ्या संख्येने एकत्र आल्याने खूपच आनंद झाला – चंद्रदीप जाधव वापी गुजरात.
———–
आज ही काही बाल मित्र मैत्रिणी एकमेकांच्या दुःखात सहभागी होतात हे ऐकून मन भारावून गेले. – प्रा. डॉ. दिपक सुर्यवंशी कोल्हापूर.
———–
इतक्या वर्षांनी सर्व मैत्रिणींची भेट झाली, दिवसभर खुप मस्ती केली. सर्वांचा आनंद गगनात मावेनासा होता. — नेताजी ओवांडकर माकणी.
———–
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिवनात सुखरूप वाटचाल सुरू असून अजूनही शाळेत जाऊन बालपणाचे गोडवे गावे असे वाटते. —- प्रेमनाथ सरवदे पुणे.
_________

गुरुजनांच्या संस्काराच्या शिदोरीमुळे आम्हा मित्र मैत्रिणींना आदर्श जीवन शैलीचा मार्ग मिळाला — मिरा भोसले – चव्हाण.
———-
सुखद आठवणी, चेहऱ्यावर हसू फुलविणारे मजेशिर प्रसंग, डोळ्यात आसू आणणाऱ्या हयात नसलेल्या मित्र मैत्रिणींच्या, शिक्षकांच्या दुःखद आठवणी, एकमेकांच्या खोड्या, लटक्या तक्रारी अशा विविध रंगांनी, चवीने भरलेला हा गेट टुगेदर चा दिवस सर्वांनाच एक वेगळी ऊर्जा देऊन गेला. मैत्रीच्या या न संपणाऱ्या उर्जेने आपले जीवन रिचार्ज करण्यासाठी दरवर्षी भेटणे हे आवश्यक आहे.
— लक्ष्मण पवार उमरगा

Wardhanews /खोट्या 90 दिवसांच्या प्रमाणपत्रांवर वर्ध्यात धडक कारवाई; 65 कंत्राटदारांना नोटिसा

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा : बांधकाम कामगारांसाठी 90 दिवसांचे खोटे व बोगस प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी जिल्ह्यातील 65 ठेकेदार व कंत्राटदारांवर सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाने धडक कार्यवाही सुरू केली आहे. संबंधित कंत्राटदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून काहींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत.

या प्रकरणात काही कंत्राटदारांनी आमच्या सही व शिक्क्याचा गैरवापर झाल्याचे लेखी निवेदन सरकारी कामगार अधिकारी कार्यालयास सादर केले आहे. त्यानंतर संबंधित कंत्राटदारांकडून देण्यात आलेली 90 दिवसांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून उर्वरित ठेकेदारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील दलाल, एजंट, कंत्राटदार व काही संघटनांचे धाबे दणाणले आहे.
नियमबाह्य व प्रमाणाबाहेर काम केल्याचे खोटे प्रमाणपत्र ज्या कामगारांना देण्यात आले आहे, त्या प्रकरणात संबंधित कंत्राटदारांवर फौजदारी कारवाईही करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत व नगरपरिषदेमार्फत निर्गमित 90 दिवसांच्या प्रमाणपत्रांबाबत अधिनियमाच्या कलम 1(4) नुसार, कंत्राटदाराकडे 10 पेक्षा अधिक कामगार कार्यरत असतील तर अधिनियम 7(1) व नियम 22(1) अन्वये आस्थापनेची नोंदणी बंधनकारक आहे.

Hingnghatnews /दरम्यान, काही 90 दिवसांच्या प्रमाणपत्रांप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फतही स्वतंत्र कारवाई सुरू असल्याची माहिती सरकारी कामगार नोंदणी अधिकारी सचिन अरबट व रीना पोराटे यांनी दिली.

Court news/संग्रापपूर राष्ट्रीय लोक अदालतीस उस्फुर्त प्रतिसाद.[ १५३ प्रकरणे निकाली २१ लाखाचे वर वसुली.]

0

 

संग्रामपूर(सूर्या मराठी न्यूज ब्युरो)ः- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायाधिश यांचे आदेशावरुन दि.१३/डिसेंबर रोजी दिवाणी फौजदारी न्यायालय संग्रामपूर व तालुका वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकअदालतीचा कार्यक्रम संपन्न झाला.ह्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये १५३प्रकरणे निकाली काढून विविध प्रकराणातील २१ लाखाचे वर वसुली करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.lokadalat

दिवाणी फौजदारी न्यालय संग्रामपूर व तालुका वकील संघाचे सहकार्याने दि.१३ /डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचेआयोजन करण्यात आले होते.ह्यामध्ये दुरावलेले कौटुंबिक संबध आर्थिक व्यवहारातील वाद,धनादेश प्रकरणे,आपघात नुकसान भरपाई सह विविध स्वरुपातील प्रकरणे सामंस्याने मिटवावित ह्यासाठी पक्षकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Court news/ह्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये दिवाणी फौजदारी न्यायालय मधील ३६० प्रकरणापैकी ९३ प्रकरणे निकाली काढून १४ लाखापेक्षा अधिक वसुली करण्यात आली.तसेच दाखल पूर्व १ हजार ९४४ प्रकरणापैकी ४२ प्रकरणे सामोपचाराने मिटवून ३ लाख ४९ हजार २९९ रु.ची वसुली झाली तर तालुक्यातील काही ग्रामपंचायती व नगर पंचायत संग्रामपूर ह्यांची थकीत कर वसुलीची १८ प्रकरणेषनिकाली काढण्यात आली.

व चांगली वसुली करदात्यांनी भरली.ह्या सर्व प्रणां मिळून २१ लाख रु.चे वर वसुली झाली.
सदर लोक अदालतीचे आयोजन खामगाव न्यायालयाचे न्याधिश ए.एन.मुदतसर ,संग्रामपूर न्यायालयाचे न्यायाधिश एस. एल.रामटेके यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले.ह्या लोक अदालत मध्ये तालुक्यातील पक्षकार,नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून संग्रामपूर न्यालयातील अधिकारी ,कर्मचारी तसेच तालुका वकील संघाचे पदाधिकारी व ईतर वकील,तामगाव ,सोनाळा पो.स्टे.चे ठाणेदार पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Court news/[ शक्यतोवर कोणीही गुन्हा न करता वा इतर प्रकरणात पोलीसा स्टेशन व न्यालयाची पायरी न चढता प्रथम आपसातच प्रकरणे मिटवावीत,जेणे करुन आपला वेळ वाया न जाता आर्थिक नुकसान होणार नाही,ह्याची सर्वांनी दक्षता घ्यावी,
एस.एल.रामटेके
न्यायाधिश दिवाणी व फौजदारी न्यायालय संग्रामपूर.]

Wardhanews /लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य

0

 

प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी

मातंग समाज आरक्षण उपवर्गीकरणासाठी नागपूरच्या महामोर्चात वर्ध्यातून हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग

संग्राम अशोकराव कळणे प्रदेश संघटक लहुजी शक्ती सेना

सिंदी रेल्वे : मातंग समाजाला सर्व क्षेत्रात न्याय्य प्रतिनिधित्व आणि हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी उपवर्गीकरणाची मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी येत्या १२ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या मातंग समाज आरक्षण उपवर्गीकरण महामोर्चात वर्धा जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती *लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश संघटक संग्राम अशोक कळणे* यांनी माहिती दिली.

लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे साहेब* यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण उपवर्गीकरणासाठी राज्यभरात आंदोलनाची मालिका सुरू आहे. का आहे. या मुद्याकरिता पूर्वीही समाजाने शासन दरबारी निवेदने, मोर्चे, आंदोलने केली असूनही शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

१४ ऑक्टोबर २०२५ रोजी

शासनाने न्यायमूर्ती अनंत बदर समिती नियुक्त करून तीन महिन्यांत अहवाल देण्याची घोषणा केली होती. मात्र समितीने दिलेल्या मुदतीत ठोस निर्णय न २ घेतल्याने शासनाने मुदतवाढ देऊन समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

याच निषेधार्थ नोव्हेंबरपासून मुंबई ते नागपूर अशी आरक्षण उपवर्गीकरण महापदयात्रा सुरू असून ही पदयात्रा वर्धा जिल्ह्यातून देऊरवाडा, आर्वी, तळेगाव शा. पंत, कारंजा मार्गे नागपूरकडे रवाना झाली आहे. पदयात्रेचा समारोप १२ डिसेंबर रोजी

नागपूर येथे होणार असून त्याच दिवशी विधिमंडळावर भव्य महामोर्चा आयोजित करण्यात येणार आहे.

Wardhanews /वर्धा जिल्ह्यातील सर्व मातंग बांधवांनी या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. राजेशजी अहिव, श्री, दिलीपभाऊ पोटफोडे, सुधाकरजी वाघमारे, श्री. श्रावणजी वानखेडे,श्री. गजाननजी बावणे,श्री. महेशजी खोडके, संग्राम कळणे, अमोल खंदार यांच्यासह सुशील बावणे, हेमंत चावरे, प्रमोद ससाणे, अनिल पोटफोडे, अजय डोंगरे, महेश गायकवाड, पुष्पाताई पोटफोडे, प्रशांत खंडाळे, विजय चन्ने, अजय जाधव, मंगेश प्रधान, मयुर वानखेडे, कैलाश वेरागडे, गणेश खडसे आणि राजू खंडाळे प्रफुल्ल चिंधुजी कांबळे, सागर बावणे यांनी केले आहे