इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगाव.तहसीलदारांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले निवेदन
शेगाव: पुरवठा विभागाकडून मार्च महिन्याचे धान्य वाटप करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी शेगाव शहरातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने केली आहे.
याबाबत शेगाव येथील तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
की शेगाव शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांना द्वारपोच योजनेअंतर्गत 29 मार्च रोजी धान्य प्राप्त झाले दोन दिवसा त त्यांनी वाटप करणे शक्य नसल्याने मोठ्या संख्येने काढणारा धान्य घेण्यापासून वंचित राहिलेले आहेत.
चालू एप्रिल महिन्यात गुढीपाडवा व ईद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सारखे धार्मिक सण,उत्सव येत असल्याने मार्च महिन्यातील धान्य वाटपाची मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
revenue:निवेदनावर स्वस्त धान्य दुकानदार शहर अध्यक्ष मंगेश देशमुख विनोद लांजुळकर श्रीकृष्ण भोईकर संजय सोनोने व इतर अनेकांच्या सह्या आहेत