Home Blog Page 118

अमिताभ बच्चन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, नेमकं काय बरं झालं..?(amitabh bachchan )

0

 

बिग बी अमिताभ बच्चन यांची ॲंजिओप्लास्टी करण्यात आली आहे. मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार ८१ वर्षीय अमिताभजींना खांद्याच्या समस्येमुळे शुक्रवारी सकाळी ११ च्या दरम्यान मुंबईतील नामांकित कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अमिताभ बच्चन व त्यांच्या आप्तेष्टांकडून याबाबत अजून कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही.


अलीकडे अमिताभ बच्चन यांची तब्येत फारशी ठीक नसल्याने ते सतत चर्चेत असतात. हल्लीच त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे आज त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले गेले.amitabh bachchan

यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवरून एक ट्विट सुद्धा केले आहे. “आपणां सर्वांचे मन:पूर्वक आभार” असे त्यांनी या ट्विट मध्ये लिहिले आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

अमिताभजींचे ट्विट वाचून सर्वांना बरं वाटत आहे. थोडक्यात म्हणजे, अमिताभ बच्चन यांना ऑपरेशन नंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याचे वाटत असेल, म्हणूनच त्यांनी ट्विट च्या माध्यमातून सांगितले.amitabh bachchan

अमिताभ बच्चन यांचे चित्रपट तर सुपर डुपर असतात, हे तर आपल्याला ठाऊक आहेच. मात्र कित्येकदा ते चित्रपटांच्या सेटवर जखमी झालेले आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

amitabh bachchan:सर्वात पहिल्यांदा “कुली” या चित्रपटाच्या सेटवर त्यांना गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांना खांदेदुखीचा त्रास असल्याचे म्हटले जाते. अमिताभजींच्या कुटुंबियांपासून ते अगदी चाहत्यांपर्यंत सर्वांनाच त्यांच्या तब्येतीची काळजी लागलेली असते.

शेख मतीन यांना मारहाण करण्याऱ्यास अटक करा -अबू आझमी…( abu asim azmi )

0

[मुख्यमंत्री यांचे कडे केली मागणी.]

 

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्या पातुर्डा बु.येथील सर्व साधारण घरातील आॕटो रिक्षा चालवून आपल्या सह आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या चालकास आपसी वादावरून पोलिसांनी तामगावं पोलीस स्टेशन ला बोलावून बेदम मारहाण केली.

अश्या मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचा-यास अटक करुन सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी आबु आझमी यांनी दि.५ / मार्च रोजी जळगाव (जा.)येथे झालेल्या सभेत सांगितले .

गेल्या काही दिवसांपूर्वी संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बु.येथील सर्व सामान्य घरातून अॕटोरिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारे चालक शेख मतीन शेख मोबीन यांचेत आपसी वाद झाला. याबाबात पोलीस स्टेशन तामगावं येथे तक्रारही दाखल करण्यात आली होती.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

या वरून दि.2 /मार्च 2024 रोजी सदर प्रकरण आपसात घेण्याकरिता पोलीस कॉ नंदकिशोर तिवारी यांनी तामगाव पोलीस स्टेशन ला बोलावून दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून शेख मतीन शेख मोबीन यांस बाजीराव पट्याने जबर मारहाण केली.abu asim azmi

याबाबत पो.काॕ.तिवारी व मारहाण करतांनाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांनी सदर पोलीस कर्मचा-यास त्वरीत निलंबीत करुन दोघावर गुन्हा दाखल केला आहे.

पो,हे.काॕ.तिवारी यास बडतर्फ करण्याची मागणी अबु आझमी यांनी केली.परंतु कोठे माशी शिंकली व आतून काय झाले?एकदम मारहाण झालेल्याचे बाबतीत बाजू पलटल्याचे समजते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 प्रतिक्रिया

[शेख सईद शेख कदीर यांच म्हणणं आहे कि या प्रकरण मध्ये संबंधित पोलीस बिट जमादार तिवारी याला निलंबित केले.पण तिवारीला आदेश कोणी दिला. ठाणेदार पवार यांच्या बोलण्यावर या शेख मतीन ला मारहाण केली.त्याची चौकशी करून बडतर्फ करा.]

मुलाविरुद्धची विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी १० लाखांची मागणी; मुलाच्या वडिलांनी केली आत्महत्या! शेगाव तालुक्यातील थरारक घटना ( crimenews )

0

 

इस्माईल शेख शेगाव

शेगाव: शेगाव तालुक्यातील त्रितव गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल एका १४ वर्षीय मुलाला मुलीचा विनयभंग झाल्याची तक्रार शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.

तक्रारीवरून वैभव हिंगणे या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे, ज्या मुलीचा विनयभंग झाल्याची तक्रार देण्यात आली होती.

त्या मुलीच्या वडिलांनी वैभवच्या वडिलांना प्रकरण आपसात करण्यासाठी १० लाख रुपये मागितले, त्यामुळे वैभवच्या वडिलांनी आत्महत्या केली.crimenews

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

आज १४ मार्चला ही घटना घडली. विठ्ठल शालिग्राम हिंगणे (५२) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.

यासंदर्भात मृतक विठ्ठल हिंगणे यांची पत्नी शारदा हिंगणे यांनी आज शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून “त्या” १४ वर्षीय मुलीच्या वडिलांसह मुलीच्या कुटुंबातील ५ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल, १३ मार्चला मृतक विठ्ठल हिंगणे यांचा मुलगा वैभव विरुद्ध गावातीलच एका मुलीने तक्रार दिली होती. “शेतात जात असताना आपल्याला वैभवने अडवले, माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुला मारून टाकतो, माझ्या जीवाचे बरेवाईट करतो” अशी धमकी वैभवने दिल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले होते,शिवाय त्याने वाईट उद्देशाने हात धरल्याचा दावाही मुलीने तक्रारीत केला होता.

तक्रारीवरून वैभव विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान हेच प्रकरण आपसात करण्यासाठी मुलीच्या वडिलांनी वैभवच्या वडिलांना १० लाख रुपये मागितले, पैशाचा तगादा लावल्याने वैभवचे वडील विठ्ठल हिंगणे यांनी आज शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. गळफास घेण्याआधी विठ्ठल हिंगणे यांनी पुतण्या सागर हिंगणे याला फोन केला.

मुलीच्या वडिलांसह ५ जणांची नावे घेत “ते” आपल्याला प्रकरण आपसात करण्यासाठी १० लाख मागत आहेत, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, तू आता माझ्या मुलाला व बायकोला सांभाळून घे ” असे सांगितले.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Crimenews:पुतण्या सागर हिंगणे याने घडला प्रकार विठ्ठल हिंगणे यांच्या पत्नी तक्रारदार शारदा हिंगणे यांना सांगितला. शारदा हिंगणे यांच्या तक्रारीवरून “त्या” मुलीच्या वडिलांसह तिच्या कुटुंबातील पाच जणांविरुद्ध आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.

शिक्षक सन्मान अभियान अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना जीवन प्रेरणा शिष्यवृत्तीने सन्मानित. (Gadchirolinews)

0

 

घोट:-गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्या अंतर्गत घोट केंद्रातील गरजूवंत विद्यार्थांना आज दिनांक 14/03/2024 रोज गुरुवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेटतळा (माल)येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान प्रणित,” शिक्षक व समाज सामुहिक दत्तक पालक योजने” अंतर्गत किसन सोनटक्के मुख्याध्यापक यांनी कु. प्रणाली देविदास गेडाम वर्ग ६ वा या हुशार व गरजु विद्यार्थिनीची निवड केली.

मान्यवरांच्या हस्ते NMMS & MTSE चे स्पर्धा परीक्षा तयारी पुस्तक व निवडपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर विद्यार्थिनीला सत्र 2023 – 24 ची जीवन प्रेरणा शिष्यवृत्ती बहाल करण्यात आली.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश तोकलवार,घोट केंद्राचे केंद्रप्रमुख भगवान मेश्राम, महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान चे राज्य कार्याध्यक्ष बापु भोयर,पेटतळा शाळेचे मुख्याध्यापक किसन सोनटक्के,प्राथमिक शिक्षक,सुरेश झाडे व पुरुषोत्तम किरमे व पालक, विद्यार्थी मोठ्या सख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान प्रणित “शिक्षक व समाज सामुहिक दत्तक पालक योजने अंतर्गत जास्तीत जास्त समाज घटक तथा शिक्षक बंधु भगिनींनी “गरीब,गरजू, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्यासाठी याजनेमध्ये सहभागी व्हावे,

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

असे आवाहन राज्याध्यक्ष विजय ठाकुलकर,महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान चे राज्य कार्याध्यक्ष बापु भोयर यांनी केले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Gadchirolinews:सोबतच सदर प्रेरणादायी उपक्रमासाठी जिल्हा अध्यक्ष बिदूर अधिकारी व राज्य समन्वयक चांगदेव सोरते यांनी अभिनंदन केले आहे.

सुधारित आदेश! ८५ वर्षावरील ज्येष्ठाना घरपोच मतदानाची सुविधा! ( Voternews )

0

 

अनिलसिंग चव्हाण बुलढाणा

Voternews:बुलढाणा : यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी ( मतदारांसाठी) काढण्यात आलेल्या आदेशात सुधारणा करण्यात आली असून आता ८० ऐवजी ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना घरपोच मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २३ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मतदार यादीमध्ये ८० ते ११० वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. जिल्ह्यातील या वयोगटातील मतदारांची संख्या ५९ हजार ६२५ आहे. यापैकी काही जण चक्क शतायुषी आहेत. यातही विशेष म्हणजे ज्येष्ठा मध्ये महिलांची संख्या जास्त म्हणजे ६१ टक्के आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

ज्येष्ठ मतदारांमध्ये २३ हजार ६१३ पुरूष तर ३६ हजार १३ महिला मतदारांचा समावेश आहे.

यातील ८५ वर्षावरील मतदारांना घरपोच मतदानाची सुविधा देण्यात येणार आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

पात्र मतदारांना त्यांच्या मागणीनुसार घरपोच मतदानाचा पर्याय वापरण्यासाठी ‘फॉर्म १२ डी’ प्रदान केला जाणार आहे.

Voternews:जिल्हा निवडणूक अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी ही कार्यवाही करणार आहे.

सुधारित आदेश! ८५ वर्षावरील ज्येष्ठाना घरपोच मतदानाची सुविधा! ( Voternews )

0

 

अनिलसिंग चव्हाण बुलढाणा

Voternews:बुलढाणा : यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी ( मतदारांसाठी) काढण्यात आलेल्या आदेशात सुधारणा करण्यात आली असून आता ८० ऐवजी ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना घरपोच मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २३ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे..

मतदार यादीमध्ये ८० ते ११० वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. जिल्ह्यातील या वयोगटातील मतदारांची संख्या ५९ हजार ६२५ आहे. यापैकी काही जण चक्क शतायुषी आहेत.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

यातही विशेष म्हणजे ज्येष्ठा मध्ये महिलांची संख्या जास्त म्हणजे ६१ टक्के आहे. ज्येष्ठ मतदारांमध्ये २३ हजार ६१३ पुरूष तर ३६ हजार १३ महिला मतदारांचा समावेश आहे.

यातील ८५ वर्षावरील मतदारांना घरपोच मतदानाची सुविधा देण्यात येणार आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

पात्र मतदारांना त्यांच्या मागणीनुसार घरपोच मतदानाचा पर्याय वापरण्यासाठी ‘फॉर्म १२ डी’ प्रदान केला जाणार आहे.

Voternews:जिल्हा निवडणूक अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी ही कार्यवाही करणार आहे.

७७ गावांत पाणी पेटले! चिखली, देऊळगाव राजामध्ये अधिक तीव्रता ( waternews )

0

 

अनिलसिंग चव्हाण बुलढाणा

waternews: बुलढाणा: मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यातच जिल्ह्यातील पाणी टंचाईची दाहकता वाढली असून एक लाखावर ग्रामस्थांना याची झळ पोहोचत आहे.

लोकसभेच्या निवडणुकीचा माहौल असल्याने पाणी टंचाईची समस्या आणि ग्रामस्थांचे होणारे बेहाल याकडे लक्ष द्यायला नेतेमंडळींना सवड नाही. मार्चच्या पूर्वार्धातच टँकरची संख्या दुहेरी झाली आहे.

सध्या ४ तालुक्यातील १३ गावांना टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठयावर तहान भागविण्याची वेळ आली आहे. यामध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील कुंभारी, पिंपळगाव चिलमखा, सुरा,चिखली मधील हातनी, कोलारा, सातगाव भुसारी, डोंगरशेवली, धोडप, पळसखेड, बुलढाणा मधील वरवंड, पिंपरखेड,

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

या गावांतील एकूण ३५ ,३४६ गावकऱ्यांचे बेहाल होत आहे. टँकरद्वारे होणारा पुरवठा तोकडा पडत असल्याने गावकरी प्रामुख्याने आया बहिणींना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

दुसरीकडे ७ तालुक्यातील ६४ गावांची तहान अधिग्रहित खाजगी विहिरीद्वारे भागविली जात आहे. यासाठी ८१ विहिरी अधिग्रहित करण्यात आली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील १९ गावांना तब्बल ३१ विहिरीद्वारे पुरवठा होत आहे.

waternews: चिखलीत १४ गावांना १९ तर मेहकर तालुक्यातील १९ गावांना १९ विहिरीद्वारे पुरवठा करण्यात येत आहे.

अभिनेता सलमान खान याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात, चित्रपटाचे नाव मात्र अद्यापही गुलदस्त्यातच ( salmankhannewmovie )

0

 

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. सलमान खान हा साजिद नाडियालवालाच्या मेगा बजेट ॲक्शन चित्रपटात दिसणार आहे.

ज्याचे दिग्दर्शन ए मुरुगादास करणार आहेत. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. नाडियालवाला यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली.


या पोस्टच्या कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिले आहे की, “सलमान खान सोबतचे आमचे दीर्घकालीन कामकाज पूढे नेण्यासाठी उत्सुक आहोत. सलमान सोबतचा आमचा हा चित्रपट महत्त्वकांक्षी चित्रपटांपैकी एक आहे.

जो २०२५ च्या ईद ला प्रदर्शित होणार आहे. परंतु त्याचे नाव मात्र अजूनही उघड केले गेले नाही.”
या चित्रपटाची बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये कित्येक दिवसांपासून चर्चा सुरू होती.salmankhannewmovie

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा साजिद नाडियालवालाने दिग्दर्शक ए आर मुरुगादास यांसोबत चित्रपटाची चर्चा केली, तेव्हा त्यांच्या मनात सर्वात पहिल्यांदा सलमान खानचे नाव आले.

पुढे साजिद यांनी सलमान खान सोबत चित्रपटाविषयी चर्चा केली व त्यानंतर सलमानने या चित्रपटासाठी होकार दिला.

या चित्रपटाचे शूटिंग भारतात तसेच पोर्तुगाल आणि इतर युरोपीय देशांमध्ये करण्यात येईल.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

salmankhannewmovie: या चित्रपटाच्या बजेटविषयी म्हणायचे झाले, तर सुमारे ४०० कोटी बजेटमध्ये हा चित्रपट होणार आहे. परंतु या चित्रपटाच्या शूटिंग शेड्युल्ड आणि बजेटविषयी पुरेशी माहिती समोर आली नाही. एकंदरीत १० वर्षांनंतर साजिद नाडियालवाला आणि सलमान खान हे एकत्र काम करणार आहेत.

लग्नसराईचा मौसम झाला सुरू, चला करू या आकर्षक पारंपरिक दागिन्यांची खरेदी..( oxidejweellary )

0

 

स्त्रियांना नटायची भारी हौस असते बुवा… त्यासाठी त्या नवनवीन काहीतरी ट्राय करून पाहत असतात. आजकाल ऑक्साईड ज्वेलरीची खूप क्रेझ आहे. हल्ली तर बहुतेक साड्यांना चंदेरी रंगाचे काठ आपल्याला पाहायला मिळतात.

त्यामुळे अशा साड्यांवर ऑक्साईड ज्वेलरी तुम्ही हमखास घालून मिरवू शकता. लग्नसराईच्या सिझनमध्ये काही पारंपरिक दागिने तुमच्या कलेक्शन मध्ये आवर्जून असायलाच हवेत.

यापैकी सर्वात पहिला दागिना म्हणजे नथ.. पारंपारिक तसेच आधुनिक ऑक्साईड ज्वेलरी मध्ये आपल्याला अनेक नथीचे नवनवीन प्रकार पाहायला मिळतात.oxidejweellary

महाराष्ट्राची ओळख गाजवणारा दुसरा दागिना म्हणजे कुड्या…
काही वर्षांपर्यंत फक्त मोत्याच्याच कुड्या पाहायला मिळत होत्या. परंतु आता ऑक्साईड मध्ये देखील कुड्यांचे नवनवीन प्रकार पाहायला मिळतात. ऑक्साईड ठुशीचे अनेक प्रकार तुम्हांला बाजारात मिळतील.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

तसेच ऑनलाईन साईट्स वर देखील हमखास मिळतील.
आजकाल ट्रेण्ड मध्ये असलेली बुगडी…

बुगडीची भारी हौस बाई या स्त्रियांना… कानाला जड का होईना… पण बुगडी मात्र हवी. हल्ली तर नवनवीन डिझायनर बुगड्या मार्केट मध्ये आलेल्या आहेत.

शोभून दिसणारी चिंचपेटी….
चिंचपेटीला गुलाबी खडा असतो, त्याला वर- खाली मोती असतात. तो खडा चिंचपेटी म्हणून ओळखला जातो. पारंपरिक चिंचपेटीला १६ पेट्या असतात. हेवी दागिने घालणार्यांना चिंचपेटी घालायला नक्कीच आवडते.
असा ठसठशीत कोल्हापूरी शृंगार लग्नकार्यात खूपच सुरेख दिसतो.

यामधील एकच दागिना घातला तरी पुरेसे आहे. आपल्या पारंपरिक दागिन्यांमध्ये एकदाणी, बोरमाळ, ठुशी यांचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. लग्नसमारंभात असे दागिने साडीवर खूपच आकर्षक दिसतात.

oxidejweellary:बाजारात आता तर पारंपरिक मॉर्डन लक्ष्मीहार सुद्धा पाहायला मिळतात.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने चामोर्शी येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धि तालुका स्तरीय प्रशिक्षण.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:-राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली.
यांच्या विद्यमाने गट साधन केंद्र चामोर्शी येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक क्षमता वृद्धि तालुका स्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक १२ मार्च ते १४ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

आज दिनांक १२ मार्च २०२४ ला प्रशिक्षणाच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष प्रा डॉ विठ्ठल चौथाले हे होते तर उद्घाटक म्हणून गटसमन्वयक चांगदेव सोरते हे होते,प्रमुख अतिथी संजय कुनघाडकर, हेमंत पेटकर,श्री शिवराम मोंगरकर,प्रा राकेश इनकणे, प्रमोद भांडारकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रविण पेटकर यांनी केले.

प्रशिक्षणाचे सुलभक चांगदेव सोरते,हेमंत पेटकर,संजय कुनघाडकर,डॉ विठ्ठल चौथाले,प्रा राकेश इनकणे,शिवराम मोंगरकर,प्रमोद भांडारकर हे होते.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० चे वैशिष्ट्यै(श्री चांगदेव सोरते) यांनी घेतले,राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा-२०२० शालेय शिक्षण(श्री हेमंत पेटकर) यांनी ही तासिका घेतली.आंतरसमवाय क्षेत्रे(श्री संजय कुनघाडकर) यांनी या विषयावर मार्गदर्शन केले. व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशनया बाबत (डॉ विठ्ठल चौथाले यांनी मार्गदर्शन केले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक क्षमता वृद्धि तालुका स्तरीय प्रशिक्षणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार राज्यात विविध उपक्रमांची अंमलबजावणी होत आहे.सदर धोरणामध्ये अपेक्षित केल्याप्रमाणे प्रत्येक घटकाची धोरणानुसार प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने समग्र सक्षमीकरण होणे आवश्यक आहे.

सदर प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – 2020 ची ओळख,राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण,कृतीसंशोधन व नवोपक्रम,नवनवीन अध्यापन पद्धती,माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,विविध सर्वेक्षणांच्या माध्यमांतून दृष्टीक्षेपात आलेली संपादणूक स्थिती,अध्ययन-अध्यापनात येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय,शंका समाधान इत्यादी विषयांवर सलभकांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.शिक्षक सक्षमीकरणासाठी सदर प्रशिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व असून नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांना सक्षम होणे आवश्यक आहे.सोबतच राष्ट्र आव्हाणांचे रूपांतर संधीमध्ये करण्यासाठी आणि सक्षम नागरिक घडविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० समजून घेणे गरजेचे आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

पहिल्या दिवसाचे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी चामोर्शी तालुक्यातील सर्व उपस्थित माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी उत्तम सहकार्य केले.

तर तालुका प्रशिक्षण समन्वयक विवेक केमेकर यांनी योग्य व्यवस्थापन केले तर विशेष शिक्षक रवी खेवले यांनी उत्तम सहकार्य केले.