Home Blog Page 129

फटाका फॅक्टरीचा मालक व मुलासह दिल्लीला पळून जात होता; शेवटी पोलिसांनी केले तिघांना अटक( Firecracker Factory )

0

 

Firecracker Factory:मध्य प्रदेशच्या हरदा येथील मोठा फटाका फॅक्टरीमध्ये आज भीषण स्फोट होऊन ११ लोकांचा मृत्यू झाला आहे.

तर आता राजकीय वजन असल्याने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही फॅक्टरी अवैधरित्या सुरु होती.

तर आता यामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत.

तर आता या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तर या फरारी झालेला फॅक्टरीचा मालक दिल्लीला पळून जात असतानाच त्याला पोलिसांनी लगेच अटक करण्यात आली आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

तर या अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये राजेश अग्रवाल, सोमेश अग्रवाल आणि रफीक खान यांचा समावेश आहे. तर आता राजेशला राजगढ जिल्ह्याच्या सारंगपूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

तर कारमधून तो दिल्लीच्या दिशेने जात होता, यावेळी त्याला अटक करण्य़ात आली आहे.

मध्यप्रदेशातील हरदा येथील बेकायदेशीर फटाका कारखान्याचा संचालक राजीव अग्रवाल आणि त्याच्या मुलाला सारंगपूर येथे वेन्यू कारमधून अटक करण्यात आली आहे.

तर या स्फोटानंतर आरोपी फरार झाला होता. तर आता सारंगपूर पोलिसांनी मध्य प्रदेश-उत्तर प्रदेश आणि दिल्लीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रात्री 9 वाजता राजीव अग्रवाल, सोमेश अग्रवाल आणि रफिक यांना अटक केली आहे.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तर या मध्य प्रदेश पोलिसांनी तिन्ही आरोपींना आयपीसीच्या कलम 304, 308, 34 आणि स्फोटक कायद्याच्या कलम 3 अंतर्गत अटक केली असून आहे.

तर या स्फोटात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 175 जण जखमी झाले आहेत. एकामागोमाग एक असे स्फोट होत होते.

Firecracker Factory: तर या आगीची तीव्रता एवढी होती की आजुबाजुला राहणारे, मोबाईलद्वारे शूटिंग करणारे देखील यातं जखमी झाले आहेत.

ऑनलाईन फसवणूक प्रकरणी मध्यप्रदेशातून दोघांना अटक,आरोपींना 8 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी ( Crimenews )

0

 

Crimenews:बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एकाची ऑनलाईन दोन लाख 4 हजार रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणात बुलढाणा सायबर पोलिसांनी मध्यप्रदेशातील इन्दूर आणि भोपाळ येथून दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन मोबाईल जप्त केले आहे.

न्यायालयाने आरेपींना 8 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.चंदा मनोज सोळंकी (42, रा. इन्दूर) आणि तरुण पंकज खरे (रा. भोपाळ) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

खामगाव येथील दाल फैलमध्ये रहाणारे जय रविंद्र किलोलिया यांनी या प्रकरणी बुलढाणा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

१२ ऑक्टोबर रोजी त्यांना जीमेल अपडेट करण्याच्या बहाण्याने एक फोन आला होता. सोबतच व्हॉटस्अपवर त्यांना एक लिंक टाकण्यात आली होती.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

त्याद्वारे आरोपींनी त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवत ॲक्सीस बँकेच्या त्यांच्या खात्यातून २ लाख ४ हजार रुपये काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली होती.

सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी तपासाची चक्रे फिरवून तांत्रिक माहिती संकलीत केली. त्या आधारे सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस हेडकॉन्स्टबेल शकील खान, कुणाल चव्हाण, राजदीप वानखडे, विक्की खरात, संदीप राऊत सहाय्यक फौजदार सायरा शाह यांच्या पथकाने तपास केला. आरोपी चंदा मनोज सोळंकी आणि तरुण पंकज खरे यांना मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले.

 

Crimenews : त्यांच्याकडून २ मोबाईल जप्त करण्यात आले. या आरोपींना अटक करून 5 फेब्रुवारीला खामगाव न्ययालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना ८ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी आज 6 फेब्रुवारीला दिली आहे.

घरकुला पासून यावल तालुक्यातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद( gharkul yojana )

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

gharkul yojana: 6 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावल येथील नगर परिषदेच्या सभागृहात तालुक्यातील सर्व विभागांची आढावा बैठक घेतली त्यामध्ये महसूल पंचायत समिती वनविभाग निवडणूक विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग अशा विविध अधिकाऱ्यांची उपस्थिती होती .

महसूल बाबतीत माहिती सांगताना बल्क साईन डिजिटल नोंदी 100% पूर्ण करणारा यावल तालुका अव्वल ठरला आहे .बल्क साइन डिजिटल करण्यासाठी कोतवाल यांनी रात्रंदिवस मेहनत करून हा डाटा शंभर टक्के पूर्ण केला आहे तसेच वसुलीमध्ये देखील यावल तालुक्याचे काम योग्य प्रकारे सुरू आहे .

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

विशेष करून निवडणुकी संदर्भात सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच तालुक्यातील आंबापाणी या गावांमध्ये जाण्यायेण्यास कोणतीही सुविधा नसल्यामुळे दहा मोटरसायकली उपलब्ध करून देण्यात येणार आहे .

तसेच मतदानाची आकडेवारी घेण्यासाठी ( रनर्स ) ड्रोन ठेवण्याचे देखील प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले . भारत निवडणूक आयोगाच्या आदेशा मार्फत ५०% मतदान केंद्रामध्ये लाईव्ह व्हेब कांस्टिंग करणार असुन त्याचे तिन लिंक जिल्हा स्तरावर राज्य आणि भारत निवडणुक आयोगा कडे जाणार आहे .

तसेच मतदान यादी मध्ये काही चुकीचे नाव नोंदणी झालेले असेल किंवा चुकून कोणाचेही नाव डिलीट करण्यात आलेले असेल त्याबाबत खात्रीपूर्वक माहिती घ्यावी तसेच मतदान केंद्र बाबत काही अडचण असेल तसेच सुविधेमध्ये अभाव असेल त्याबद्दल देखील माहिती सांगण्यात यावी.

तसेच यावल तालुक्यातील घरकुला संदर्भात काही ग्रामपंचायतींनी जागा मागणीसाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत परंतु मोजणी रक्कम भरली नसल्याने जागेसाठी अडचणी निर्माण होत आहे परंतु घरकुला पासून यावल तालुक्यातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत व विनामूल्य जागा कशी उपलब्ध करून देता येईल याचे सुद्धा प्रयत्न सुरू आहे .

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

gharkul yojana: या आढावा बैठकीमध्ये यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर पंचायत समिती गट विकास अधिकारी डॉं मंजुश्री गायकवाड तसेच विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .

अजब गजब पतीच्या निधनानंतर सून सासऱ्याच्या प्रेमात पडली; नेमक घडलं असं की शेवटी प्रकरण पोलिसांत पोहोचले ( love story )

0

 

love story: अजब गजब कहाणी सत्य असं म्हणतात की प्रेम हे नेमक आंधळं असतं.

तर मात्र यात या जोडप्यांना त्यांच्या प्रेमापलीकडे काहीही दिसत नाही.

तर आता या त्यांच्यापुढे कोणतीही मर्यादा नसते, तर मात्र कोणतंही बंधन नसतं किंवा ते आपलं वया ची बघत नाहीत. ते फक्त मना पासून प्रेम करतात.

तर या एकमेकांवर मनापासून प्रेम करतात. शेवटी त्यांच्या प्रेमापुढे जगाला झुकावं लागतं.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

पण प्रकरण असाच एक प्रकार बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात समोर आला आहे.

तर या रविवारी 4 फेब्रुवारीला गोपाळगंजमधील भोरे पोलीस स्टेशनमध्ये लोकांची मोठी गर्दी झाली होती.

तर मात्र यात एक जोडपं एकमेकांशी लग्न करण्यावर ठाम होतं. त्यांना काही लोक विरोध करत होते. ही महिला चार मुलांची आई असल्याचं समोर आलं. तिच्या पतीचं सहा महिन्यांपूर्वी निधन झालं.

तर आता त्यानंतर ती आपल्या चुलत सासऱ्यावर प्रेम करू लागली. यानंतर त्यांनी समाजाची पर्वा न करता लग्न करण्याचा निर्णय घेतला.

तर मग पण नेहमीप्रमाणे समाज आणि कुटुंब त्यांच्या प्रेमाचे शत्रू बनले. ते त्यांच्या नात्याच्या विरोधात गेले.

मग काय तर या समाजाचा धाक दाखवून कुटुंबीयांनी महिलेला या लग्नापासून रोखण्यास सुरुवात केली.

पण मात्र काही वेळातच प्रकरण इतकं वाढलं की लोकांना पोलीस ठाण्यात यावं लागलं. पण नेमके या तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनीही दोघांना खूप समजावलं. पण जेव्हा या जोडप्याने एकमेकांना सोडण्यास नकार दिला तेव्हा त्यांना पोलीस ठाण्यातच लग्न करण्यास भाग पाडण्यात आलं.

तर आता मात्र या पोलीस ठाणे प्रभारींच्या उपस्थितीत दोघांनी पोलीस ठाण्यात बांधलेल्या मंदिरात एकमेकांना पुष्पहार घातला.

परंतु या मिळालेल्या माहितीनुसार, गोपलागंज जिल्ह्यातील भोर पोलीस स्टेशन हद्दीतील दुबवलिया गावातील तरुणाचा सहा महिन्यांपूर्वी ट्रेनमधून पडून मृत्यू झाला होता.

पण मात्र या घटनेनंतर त्यांची पत्नी सीमा देवी विधवा झाली. त्यांना चार मुले आहेत. आता त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी महिलेच्या एकटीच्या खांद्यावर आली.

मग ती स्वतःही एकाकी झाली. तिच्या दु:खाच्या काळात तिचा चुलत सासरा तुफानी देवदूताप्रमाणे आला. त्याने मुलांची आणि त्यांच्या आईची काळजी घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या गरजा पूर्ण करू लागला. हे पाहून सीमा त्याच्या प्रेमात पडली.

मग मात्र या सीमा आणि तुफानीच्या नात्याची बातमी गावात वणव्यासारखी पसरली. याला घरच्यांनी विरोध सुरू केला. त्यांनी कोणाचंही न ऐकल्याने लोकांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेलं.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मग काय तर पोलिसांनी समजावूनही दोघांनी न ऐकल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात फुलांचे हार आणि सिंदूर लावून मंदिरासमोर लग्न लावून दिलं गेलं. महिलेचे सासरे तुफानी साह यांनी सांगितलं की, दोघे गेल्या एक महिन्यापासून प्रेमसंबंधात होते.

love story: तर आता या सीमासोबत लग्न करून ते खूप खूश आहेत. असं केल्याने सीमाप्रमाणे त्यालाही नवजीवन मिळालं आहे.

कमालच! पोलीस दादाने ‘सोशल मीडिया’ वर टाकली जातीयवादी पोस्ट ; पोलीस अधीक्षकांनी केले निलंबित! ( Policenews )

0

 

बुलढाणा: Policenews: समाजमाध्यमावर कार्यकर्ते वा नागरिकांनी आक्षेपार्ह मजकूर टाकण्याच्या घटना आपण वाचतो.

मात्र एका पोलीस कर्मचाऱ्याने असा मजकूर टाकल्याचे निदर्शनास आले असून त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

गजानन खेर्डे असे या बहाद्धराचे नाव असून तो खामगाव येथील पोलीस नियंत्रण कक्षात सहायक फौजदार या पदावर कार्यरत आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

त्याने सामाजिक माध्यमावर दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल असा मजकूर समाज माध्यमावर टाकला. ही बाब निदर्शनास आल्यावर याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी खामगाव नियंत्रण कक्षाकडून मागविला. पडताळणी नंतर खेर्डे याला आज निलंबित करण्यात आले. याचे आदेश आज संध्याकाळी काढण्यात आले.

 

तसेच बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदारांना याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.

Policenews: दरम्यान आज पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या नियमित गुन्हे आढावा बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याचे निर्देश करण्यात आले.

कॅनरा बँक शाखा व्यवस्थापकांकडून ग्राहकांची दिशाभूल( Canara Bank Personal Loan )

0

 

शाम वाळस्कर
प्रतिनिधी मूर्तिजापूर

Canara Bank Personal Loan: मुर्तिजापूर येथील स्टेशन विभागात राहणारे रवी बाळकृष्ण वाकपांजर यांनी १० जुलै २०१९ मध्ये नवीन घर बांधण्याकरीता व कर्जाकरिता गहाणपत्र करून दिले.परंतु बँकेकडून सर्वसाधारण कर्ज खाते मंजूर करण्यात आले.

बँकेने सदर ग्राहकांची दिशाभूल करून तत्सम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता परस्पर कॅनरा बँकच्या मूर्तिजापूर शाखेमध्ये सर्व साधारण कर्ज मंजूर करण्यात आले.

सदर ग्राहक यांना पीएम आवास योजनाचा लाभ मिळू शकला नाही.त्यामुळे त्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

बँक कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी अकोला यांना सदर कर्ज संदर्भात चुकीची माहिती देऊन जिल्हाधिकारी अकोला यांची दिशाभूल करून चुकीची कागदपत्रे सादर करून कायद्यानुसार जिल्हाधिकारी अकोला यांच्या जप्तीचा आदेश पारित करण्यात आला.

 

सदर घटनेबाबत कॅनरा बँक व्यवस्थापक शाखा मूर्तिजापूर यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी अकोला यांना चौकशी करिता निवेदन देऊन सदर घटनेबाबत ग्राहकाने बँक व्यवस्थापकांना २९ जानेवारी २०२४ रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता.

परंतु मूर्तिजापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मध्यस्तीने सदर घटनेचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला.

Canara Bank Personal Loan:: परंतु बँक व्यवस्थापकांच्या अरेरावीमुळे व त्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे सदर ग्राहकाने पोलीस स्टेशन मूर्तिजापूर येथे बँक विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

 

बंद केलेल्या बसेस पुन्हा सुरू करा अन्यथा चुंचाळे फाट्या वरअंकलेश्र्वर बऱ्हाणपूर रत्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल ( busnews )

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

Busnews : याबाबत सविस्तर वृत्त असे सकाळची ७:१५ वा.ची गाडी,बस,(यावल चुंचाळे मार्गे नायगांव जळगांव), तसेच दुपारी १:३० वाजता येणारी बस (यावल चुंचाळे मार्गे नायगांव) आणि संध्याकाळची ८:०० वाजेची बस (जळगांव यावल मार्गे नायगांव चुंचाळे) बसेस सुरू.

करण्यासाठी बोराळे येथील सामाजिक कार्यकर्ते सुपडु संदानशिव यांनी आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी यावल आगार प्रमुख दिलीप महाजन यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले आहे येत्या दोन ते तीन दिवसांत बसेस सुरू न झाल्यास चुंचाळे फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दूखिल निवेदनाद्वारे दिला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून वरील दिलेल्या बसेस रस्ता नादुरुस्तीचे कारण दाखवून बंद करण्यात आले आहेत यामुळे शालेय शिक्षण घेणारे मुले मुली तसेच दोन्ही चुंचाळे व बोराळे नायगाव गावातील नागरिक यांचे यांचे नाहक हाल होत असून दैनंदिन जीवनात होणाऱ्या कामाला अडथळा निर्माण होत आहे.

विद्यार्थी मुला मुलींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, तरी निवेदनात दिलेल्या तिन्ही बबेस लवकरात लवकर सुरू करण्यात याव्या अन्यथा दोन ते तिन दिवसा नंतर चुंचाळे फाट्या वरअंकलेश्र्वर बऱ्हाणपूर रत्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी,

सदर आंदोलनास वेगळे वळण लागल्यास होणाऱ्या नुकसानास सर्वतोपरी आपण जबाबदार राहाल तरी निवेदनात नमूद केलेल्या बसेस लवकरात लवकर सुरू करण्यात याव्या अशी मागणी निवेदनाद्वारे तसेच चुंचाळे ग्राम पंचायत आणि बोराळे ग्राम पंचायत यांच्या लेटर पॅड वरती केली आहे.

Busnews: सदर निवेदन देते वेळी किरण तायडे,पत्रकार प्रकाश चौधरी,पत्रकार विकी वानखेडे व सुपडू संदानशिव आदी उपस्थित होते.

Bajaj ने तर केली आता कमाल, Pulsar आता पेट्रोलवर नाही चालणार तर या इंधनावर धावणार( bajaj motorcycle )

0

 

bajaj motorcycle: आता या नवीन पल्सर बाईक बाजारात आणणार आहे. तर ही बाईक पेट्रोलवर नाही तर दुसऱ्या इंधनावर धावणार आहे.

तर ही यापूर्वी सीएनजी, एलपीजी बाईकवर कंपनी काम करत आहे. पण आता या बाईक लवकरच बाजारात येतील.

तर या दिल्लीत सध्या भारत मोबिलीटी ग्लोबल एक्स्पो 2024 सुरु आहे.

तर आता यामध्ये नवीन बजाज पल्सर सादर झाली तर बजाज डोमिनार हे नवीन मॉडेल पण दिसले. या दोन्ही बाईक पेट्रोल ऐवजी फ्लेक्स फ्युएलवर धावतील.

या बाईकच्या इंजिनमध्ये बदल

तर आता बजाज कंपनीने दोन्ही बाईकच्या इंजिनमध्ये मोठा बदल केला आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

तर या दोन्ही बाईक फ्लेक्स फ्युएलवर धावतील. या नवीन मोटरसायकल इथेनॉल-ब्लेंड पेट्रोलवर धावतील. नवीन पल्सरच्या पेट्रोलमध्ये किती इथेनॉल काम करेल

पण आता याची माहिती समोर आलेली नाही. बजाजने पल्सरच नाही तर डोमिनार हे मॉडेल पण मॉडिफाय लवकर केले आहे.

तर या बजाजने Pulsar NS160 आणि Dominar 400 ला फ्लॅक्स फ्युएल आधारीत बाईक आणली आहे. Dominar 400 27.5 टक्के इथेनॉल-पेट्रोल ब्लेंड फ्यूएलवर धावेल. सध्या ब्राझीलसह 35 हून अधिक देशात Dominar E27.5 पूर्वीपासून रस्त्यावर धावत आहे.

जाणून घ्या किंमत तरी किती असणार ?

या पल्सर बजाज पल्सर आणि डोमिनारच्या फ्लेक्स फ्युएल व्हर्जनच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आलेला नाही.

तर ही दिसायला सध्याच्या मॉडेलप्रमाणेच आहे. तर आता भारतात Pulsar NS160 ची एक्स शोरुम किंमत 1.37 लाख रुपये आहे. तर Dominar 400 या बाईकची एक्स शोरुम किंमत 2.30 लाख रुपये आहे.

पण आता सीएनजी बाईकचा पर्याय का

पण आता सीएनजी बाईकची ही झलक असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही CNG Bike बाजारात दाखल व्हायला एक वर्ष तरी लागण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक बाईकबाबत अजून पण भारतीय साशंक आहेत.

तर आता त्यामुळे पेट्रोल आणि ई-बाईक यामधील सीएनजी हा पर्याय भारतीयांच्या पसंतीला उतरण्याची शक्यता आहे. पण आता तर त्यामुळेच ही बाईक बाजारात हंगामा करेल असा दावा करण्यात येत आहे.

त्तर या कंपनी इलेक्ट्रिक बाईक, सीएनजी बाईकच नाही तर कंपनी एलपीजी, इथेनॉलवर पण बाईक आणण्याच्या तयारीत आहे.

येथे क्लिक करा लाईव्ह पाहण्यासाठी 

नपण या सीएनजी बाईक उत्पादनाचे लक्ष्य पण ठरविण्यात आले आहे. त्यानुसार, कंपनी जवळपास 1 ते 1.20 लाख वाहनांचे दरवर्षी उत्पादन करण्यावर भर देत आहे.

bajaj motorcycle: तर येणाऱ्या भविष्यात ही क्षमता 2 लाख युनिटपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्र्वर टाले सह ३ कार्यकर्त्यांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला.( Crimenews )

0

 

डोणगाव येथील शिक्षक सातपुते पती-पत्नी यांनी अकोला येथून नातेवाईक व गुंडांना बोलावून कट रचून पुर्वनियोजीत हत्तेच्या उद्देशाने केला गंभीर हल्ला.

डॉ.ज्ञानेश्र्वर टाले यांच्या डोक्याला गंभिर इजा असल्याने उपचरासाठी संभाजीनगर येथे आय.सी. यू. मध्ये भरती करण्यात आले.


Crimenews: दिनांक. १फेब्रुवारी २०२४ रोजी अंदाजे सांयकाळी साडेपाच वाजे दरम्यान गजानन सातपुते व छाया सातपुते शिक्षक जिल्हा परिषद प.स.मेहकर यांनी तक्रारीच्या रागातुन अकोला येथील नातेवाईकांना व पैसे देऊन गुंडाना बोलावून जाणीवपूर्वक राजकीय लोकांच्या सांगण्यावरून स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डाॕ.टाले व देवेंन्द्र आखाडे यांची हत्या करण्याच्या उद्देशाने कट रचून.डोणगांव येथे देवेंद्र आखाडे यांच्या सी.एस.सी. सेंटरवर काही दस्तऐवजाची माहिती घेण्यासाठी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डाॕ.टाले गेले असता तिथे सातपुते दांम्पत्यांनी व महिलांनी जाऊन डाॕ.टाले व देवेंन्द्र आखाडे यांच्यासोबत हुज्जत घालून जाणीवपूर्वक वाद तयार केला.

व अकोला येथिल नातेवाईकांना व गुंडांना बोलवुन पुर्वनियोजीत कट रचत कोयत्याने व लोखंडी राॕडने मारहाण करत हत्या करण्याच्या उद्देशाने गंभीर स्वरूपाचा जीवघेणा हल्ला गजानन सातपुते,छाया सातपुते,धृवल सातपुते, रोहिणी सातपुते,निशा चव्हाण,वैष्णव सातपुते, मंगेश इंगळे अकोला येथील त्याचे साथीदार चोरीच्या प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार असलेले चार ते पाच जण यांच्या मदतीने सत्तेचा कट रचून हा हल्ला घडवून आणला यामागे मोठे राजकीय षडयंत्र असून जिल्ह्यातील काही सत्ताधारी पुढार्‍यांच्या सांगण्यावरून हा हत्तेचा कट घडवून आणल्याचा संशय व दाट शक्यता असल्याची शंका स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डाॕ.टाले यांनी पत्रकारांसमोर रुग्णालयात सांगितले याचे कारण असे कि येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका त्या अनुषंगाने स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डाॕ.टाले व सहकारी मेहकर लोणार तालुक्यांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे संघटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीच्या माध्यमातून उभ करत आहेत त्त्यांच वाढतं काम वलय पाहून मेहकर लोणार मतदार संघातील परिस्थिती बदलत चाललेले चित्र पाहुन.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

काही सत्ताधारी पुढार्‍यांच्या पायाखालाची वाळु सरकली असुन त्यांच्या डोळ्यात खूपत असून हा राग सुध्दा मनात धरून या सातपुते दाम्पत्यांना हाताशी धरून रविकांत तुपकर हे लोकसभेचे उमेदवार असुन आपल्याला मात देणार म्हणुन त्यांची बदनामी करुन याला राजकिय रंग देऊन त्यांच्यासह डॉ.ज्ञानेश्वर टाले यांचा राजकिय दृष्ट्या व जिवाने संपवण्यासाठी अडकविण्याचा डाव सातत्याने राजकिय पुढारी करत आहेत. डाॕ.टाले हे रविकांत तुपकर यांचे अंत्यत जवळचे व ताकतीचे सहकारी आहेत.

त्यांना अडकुन त्यांचे या भागातील काम थांबवण्याचा प्रयत्न काही पुढाऱ्यांनी केल्याचा दाट संशय आहे व हे प्रकरण देवेंन्द्र आखाडे यांच्या जागे बद्दल असुन त्यामध्ये इतरांना बदनाम करुन गोवण्याचा प्रयत्न राजकिय दृष्ट्या चालु आहे.माञ खरी परीस्थीती वेगळी आहे.याला राजकिय रंग देऊ नये. सत्तेचा एवढा गैरवापर करणे योग्य नाही.असे मत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.टाले यांनी व्यक्त केले. कारण की सदर घटनेपूर्वी या राजकीय पुढाऱ्यांचे फोन सातपुते दांम्पत्यांना व काही अधिका-यांना गेल्या आठ दिवसापासून सातत्याने सुरू होते.

त्यांच्या फोन डिटेल CDR सुद्धा पोलिसांनी तपासले पाहिजे अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डाॕ.टाले यांनी केली आहे.जेणेकरुन सर्व सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. आणि या राजकीय पुढार्‍यापासून तसेच सातपुते दाम्पंत्यापासून माझ्या व सहका-याच्या जीवाला धोका आहे.कारण आम्ही त्यांच्या कायम विरोधात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत चळवळीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे काम मेहकर लोणार मतदार संघामध्ये उभे केले असून यामुळे राजकीय पुढार्‍यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे हे अतिशय खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करण्याची पद्धत करत आहेत. ही त्यांची स्टाईल फार पूर्वीपासून स्थानिक राजकीय नेत्यांची असल्याचे सांगितले त्यांनी याआधी सुद्धा स्वतःच्या पक्षातील काही लोकांचा घातपात केल्यांचां मतदार संघात सर्वश्रुत आहे.बोगस शिक्षक गजानन सातपुते व छाया सातपुते यांच्या बद्दल शिक्षण विभागातील तक्रार केल्याच्या उद्देशाने देवेंद्र आखाडे यांच्या विरोधातील राग मनात धरून आपली नोकरी जाते असं गजानन सातपुते व छाया सातपुते या शिक्षक पति पत्नीला कळाले यांना चार चार अपत्य असल्यामुळे यांची या तक्रारीमुळे शिक्षण विभागाच्या वतीने चौकशी लागलेली आहे.

त्या भीतीने या राजकीय पुढारी यांना घरी जाऊन ठिक ठिकाणी भेटून मदत घेण्याचा संपुर्ण प्रयत्न केला.त्याबाबत आपल्याकडे पुरावे सुध्दा आहेत व त्या माध्यमातूनच काही राजकिय पुढार्‍यांच्या मदतीने हा हत्या करण्याचा डाव,कट काही दिवसापासुन रचण्यात आला असावा.

अकोल्यातील लोकांचा डोणगाव मध्ये येऊन हल्ला करणे म्हणजे हा किती मोठा हत्तेचा कट असू शकतो यावरून लक्षात येते त्यामध्ये असलेल्या व्यक्ती इंगळे व त्याचे मिञ हे अज्ञात असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे अकोला येथे दाखल आहेत माञ त्यांना पैसे (सुपारी)देऊन डोणगाव मध्ये बोलून घेण्यात आलं यासाठी सर्व मदत स्थानिक राजकीय काही सत्ताधारी पुढार्‍यांनी केल्याची दाट शक्यता असल्याने सदर राजकीय पुढाऱ्यांचे व सातपुते दाम्पत्याचे संपूर्ण कॉल डिटेल्स पोलिसांनी तपासले पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची बाब असून पोलिसांनी या बाबीकडे दुर्लक्ष न करता यांचे पाळेमुळे शोधून याचा खरा सुञधार कोण आहे.

 

तो शोधुन काढून त्या राजकीय लोकांना सुद्धा जेलमध्ये टाकले पाहिजे खऱ्या अर्थाने कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करुन बिघडवण्याचे काम कोण करत आहे व त्यांचे सूत्रधार कोण आहे हे महत्त्वाचं असून पोलिसांनी त्या दिशेने तपास करणे गरजेचे आहे असे. स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी सांगितले. तसेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतांना देखील सातपुते दांम्पत्य व त्यातील इतर आरोपींना त्यांना कुठली दुखापत नसताना सुद्धा मोकाटपणे उघड माथ्याने गावात फिरत आहेत त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली पाहिजे अन्यथा यांना खुले सोडल्यास पुन्हा कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाता बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Crimenews : व सदर आरोपी हे पुराव्या नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतात असा गंभीर आरोप जिल्हाध्यक्ष टाले यांनी केला. शासकिय नोकरीवर असलेल्या या दांपत्यांना अटक करू नये म्हणून राजकीय पुढाऱ्यांचा पोलिसांवर प्रंचड दबाव आहे.परीस्थीती पहाता असे लक्षात येत आहे.माञ पोलींसानी त्यांचे काम राजकिय दबावाखाली न येता कायदेशिरपणे केले पाहीजेत.भविष्यकाळात पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नयेत.शेवटी कायदा हा सर्वांसाठी सारखाच असतो.

द्वारकाधीश नगर व आरोग्य कॉलनी येथे डुकरांचा हैदोस ( shegaonnews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव. shegaonnews: माझी वसुंधरा माझी जबाबदारी हे ब्रीदवाक्य घेऊन संत नगरी शेगाव येथे *स्वच्छ शेगाव सुंदर शेगाव* ही भूमिका बजावत सर्वत्र स्वच्छता करण्यात येत आहे.

 

परंतु शेगाव नगरातून गौलखेड रस्त्याने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला द्वारकाधीश नगर व आरोग्य कॉलनी या भागामध्ये गेल्या सहा-सात महिन्यापासून डुकरांचा अक्षरशः हैदोस सुरू आहे. घरासमोरील झाडं, परसबाग, आणि सुकवायला ठाकलेले धान्य डुकरं नष्ट करून टाकतात.

तसेच बाहेर लहान मुलांना खेळणे सुद्धा अवघड झाले आहे .प्रत्येक रहिवाशाला दररोज डुकरांचा सामना करावा लागत आहे आणि जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छ अशा संत नगरीत द्वारकाधीश नगर व आरोग्य कॉलनी येथे मात्र डुकरांनी जगणे कठीण केले आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

 

याबाबतीत नगरपरिषद शेगाव कडे सहा महिन्यापूर्वी तशी तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे परंतु अजूनही त्या तक्रारीची साधी दखल घेऊन डुकरांचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही.

उलट डूकरांची संख्या पाच वरून ५० झाली आहे तरी कृपया समस्त द्वारकाधीश नगरातील आणि आरोग्य कॉलनीतील रहिवाशी नगर परिषदेकडून अशी आशा करत आहेत.

shegaonnews: की या डुकरांच्या त्रासापासून आम्हाला मुक्ती मिळावी व आम्हाला आरोग्यपूर्ण व सुखाचे जीवन जगता यावे आणि आमच्या लहान मुलांना आमच्या कॉलनीमध्ये स्वच्छंदपणे खेळता यावे एवढी रास्ता पेक्षा धरून आम्ही आपणास विनंती करतो की आम्हाला डुकरांपासून होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळावी.