Home Blog Page 132

शेगांव अतिवृष्टी अनुदान व पिकविमा लाभापासून शेतकरी वंचित ( pikvima )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव. शिवारातील अतिवृष्टीचे अनुदानाची रक्कम, पिक विम्याची रक्कम पीएम किसान योजनेचे रक्कम आज पर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकरी लाभापासून वंचित आहेत तरी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन प्रलंबित निधी तात्काळ देण्यात यावा अशी मागणी.


पुरुषोत्तम चंद्रभान हाडोळे मा. नगरसेवक तथा ओबीसी मोर्चा जिल्हा भाजपा सरचिटणीस तथा समस्त शेतकरी बांधवांनी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमुद आहे की माहे जून २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत शेगाव व शेगाव शिवारात झालेल्या अतिवृष्टीने पिकाचे प्रचंड आर्थिक नुकसान केले आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

सदर नुकसानी संदर्भात तलाठी कार्यालय, कृषी अधीक्षक कार्यालय यांचे मार्फत सर्वे होऊन काही शेतकऱ्यांना VK नंबर सुद्धा मिळालेले आहेत तथा त्यांनी केवायसी सुद्धा केलेली आहे आणि काही शेतक-यांना बँकेचा पैसे खात्यात जमा झाले चा मेसेज सुद्धा आलेला आहे.

परंतु त्या शेतकरी बांधवांना त्यांचे बँक खात्यात एकही रक्कम जमा झालेली नाही. तसेच काही शेतकऱ्यांना व VKनंबर सुद्धा मिळालेला नाही तसेच पिक विम्याची रक्कम सुद्धा शेगाव शिवारात मिळालेली नाही, व काही शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे आधारसीडींग तथा केवायसी करून सुद्धा त्यांना रक्कम आज पावेतो मिळालेली नाही.

शेतकरी संबंधित अधिकार्याची वारंवार आपल्या तक्रारीच्या संदर्भात पाठपुरावा करत असून त्यांना आजपर्यंत अधिकार्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही किंवा त्या संदर्भात त्यांचे बँक खात्यात कोणतीही रक्कम जमा झालेली नाही.

तरी आम्हा सर्व शेतक-यां तर्फे विनंती आहे को संबंधित अधिकर्याना आपण आदेश देऊन सदर शेतक-यांच्या
तक्रारी संदर्भात अतिवृष्टीच्या अनुदानाच्या रकमेच्या साठी वेगवेगळे कॅम्प तथा पीएम किसान योजनेच्या त्रुटीसाठी वेगळा कॅम्प लावावा व विमा कंपन्यांच्या संदर्भात संबंधित विभागाला आदेश देण्यात यावे ही अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल आणि होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनावर पुरुषोत्तम चंद्रमान हाडोळे माजी नगरसेवक तथा जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस शेगाव,अरविंद इंगळे किसान सरचिटणीस तथा किसान आघाडी तसेच.

Pikvima : राजेंन्द्र महादेव शेगोकार,केशव पुंडलिक वाढोकार,रामेश्वर इरभान शेगोकार,श्रीकृष्ण इरभान हाडोळे,राजेश शालिग्राम सुरवाळे प्रशांत पुष्पाकर काठोळे,गजानन लक्ष्मण पल्हाड़े गोपाल हरभान शेगोकार,अविनाश मुरलिधर काठोळे,रमेश त्रंबक कलोरे,संजय काशीराम काठोळे,मोहन विक्रम पल्हाडे,शशीकला इरभान शेगोकार,महेन्द्र मोहन शेगोकार,अजाबराव आत्माराव शेगोकार,कस्तुराबाई श्रीपद शेगोकार, कमलाकर चव्हाण यांच्या सह्या आहेत.

तू मला आवडते असे म्हणून 32 वर्षीय तरुणीचा विनयभंग करणाऱ्या गुरुदेव ड्रायव्हिंग क्लासचे संचालक ज्ञानेश्वर कुकडे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल.( Crimenews )

0

गुन्हा दाखल होऊ नये म्हणून अनेकांनी केलेले प्रयत्न निष्फळ..

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी


शेगाव: तू मला आवडतेस असे म्हणून फोर व्हीलर चालविणे चा प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या 32 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शहरातील प्रख्यात गुरुदेव ड्रायविंग क्लासेसचे संचालक ज्ञानेश्वर कुकडे यांच्या विरोधात पिडी तेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलीस स्टेशन सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार 32 वर्षीय पीडिता हिने आरोपी ज्ञानेश्वर कुकडे यांच्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये फोर व्हीलर वाहन चालविणे चे प्रशिक्षण घेण्यासाठी क्लास लावलेला होता.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

आरोपी ज्ञानेश्वर कुकडे यांच्याकडे असलेल्या हुंडई कंपनीच्या फोर व्हीलर गाडी शिकवीत असताना आरोपीने फिर्यादी पिढी ते सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला पिढीतेच्या नको त्या ठिकाणी स्पर्श करीत असल्याने पीडीतेने आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला सदर बाप पिढीतेने स्वतःच्या आई-वडिलांना सुद्धा सांगितली मात्र बदनामी होऊ नये.

याकरिता पिढीतेने आज पर्यंत यासंबंधी पोलीस स्टेशनला तक्रार दिली नव्हती 3 फेब्रुवारी रोजी पिढीतही संध्याकाळी साडेपाच वाजे दरम्यान आरोपीच्या ड्रायव्हिंग क्लास समोरून जात असताना आरोपी ज्ञानेश्वर कुकडे याने पीडीतेचा पाठलाग केला व अश्लील हातवारे केले जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

यावेळी सुद्धा पिढीतेच्या नको त्या ठिकाणी स्पर्श करून तू मला आवडतेस असे सांगून पिडीतेचा विनयभंग केला अशा तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी ज्ञानेश्वर विठ्ठल कुकडे वय 45 राहणार जिजामाता नगर शेगाव विरुद्ध अपराध नंबर 73/24 कलम 354 अ 354 509 भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय कर्डिले बक्कल नंबर 12 75 व हेडकॉन्स्टेबल निलेश तायडे हे करीत आहेत..

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Crimenews:विशेष म्हणजे सदर प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये याकरिता काही दिवसापूर्वी शहरातील राजकीय क्षेत्रातील व पत्रकारितेतील काही महाभाग यांनी प्रयत्न केले मात्र त्यांचे हे प्रयत्न निष्पर ठरल्याची चर्चा आज शेगाव शहरात होत होती

स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून शेगावचे नवीन तहसीलदार साहेब.यांचा सत्कार (Tahsildarnews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव:स्वस्त धान्य दुकानदार संघटना शेगाव शहर व शेगाव तालुक्याच्या वतीने शेगाव येथे नुकतेच बदलून आलेले शेगावचे नाव नियुक्त तहसीलदार बाजड साहेब यांचा तहसील कार्यालयामध्ये पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

यावेळी नवीन तहसीलदारांनी सर्व धान्य दुकानदारांचा परिचय करून घेतला.

या सत्कार सोहळ्याप्रसंगी शेगाव स्वस्त धान्य दुकानदार संघटना अध्यक्ष मंगेश लक्ष्मणराव देशमुख, ज्येष्ठ सदस्य श्रीकृष्ण घुईकर

 

Tahsildarnews:शेगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष मोहन विश्वासराव कराळे, सुनील काळे निलेश गणेश यांच्यासह अनेक स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते

सागर सिरसाट यांची रिपाई आंबेडकर बुलढाणा जिल्हा कोषाध्यक्ष पदी नियुक्ती (RPI )

0

 

इस्माईलशेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव . RPI: मा.दीपक निकाळजे, राष्ट्रीय अध्यक्ष (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) यांच्या आदेशानुसार आणि मा.मोहनलाल पाटील, राष्ट्रीय महासचिव,मा.बाळासाहेब पवार, कार्याध्यक्ष,पश्चिम विदर्भ अध्यक्ष संतोष इंगळे बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या जिल्हास्तरीय तालुकास्तरीय पदाच्या नियुक्ती जील्हा अध्यक्ष तथा पश्चिम विदर्भ अध्यक्ष संतोष इंगळे यांच्या हस्ते पदनियुक्त देण्यात आल्या.

त्यामध्ये प्रामुख्याने महिला व पुरुष युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हा माहा सचिव डॉ सचिन रावत,जिल्हा उपाअध्यक्ष राजेश वानखडे,जिल्हा कोषाअध्यक्ष सागर सिरसाट जिल्हा युवा अध्यक्ष प्रदिप तायडे,जिल्हा उपाअध्यक्ष संदीप शिदे, चिखली तालुका अध्यक्ष राजेश डोंगरदिवे,जळगाव (जा) तालुका अध्यक्ष प्रफुल्ल तायडे शेगाव तालुका अध्यक्ष अनिल इंगळे, खामगांव तालुका उपाअध्यक्ष कयुम खान, चिखली तालुका अध्यक्ष,शिध्दाथऺ जाधव,मलकापूर महिला आघाडी तालुका अध्यक्षा सुनिता तायडे,चिखली तालुका उपा अध्यक्ष सचिन अंभोरे,खामगांव महिला आघाडी तालुका उपाअध्यक्ष ज्योती सावदेकर, मलकापूर महिला आघाडी उपाअध्यक्ष सुमन तायडे,खामगांव तालुका सदस्य दयाराम डोंगरदिवे,खामगांव तालुका कार्याध्यक्ष बळीराम धुरंधर. इत्यादी पदाधिकाऱ्यांना पक्षांमध्ये समाविष्ट करत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

 

सामाजिक राजकारण बिघडले असता आपल्याला एकीकरण होण्याची गरज आहे.आपल्या आपल्यात भांडणे करून काही उपयोग नाही त्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागेल या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या नितीने चालण्याची आज गरज आहे.

असे आपले मनोगत जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम विदर्भ अध्यक्ष संतोष इंगळे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाची नियोजन जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर इंगळे यांनी केले. सर्वच राजकीय पक्ष विधानसभा लोकसभेच्या अनुषंगाने आपल्या पक्षाची बांधणी करत आहे. बांधणी करत असताना, पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित व कामाला लागले आहे.

आपणही आमच्या पक्षाची विधानसभा व लोकसभा लढवणार असून जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी जोडण्याची आवश्यकता आहे.

हे लक्षात घेऊन पद न घेता त्या पदाचा गरिमा आपल्याला जाणून घ्यावी.व पक्षाला गालबोट न लागता आपण काम करावे अशी इच्छा जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर इंगळे यांनी व्यक्त केली.

खऱ्या अर्थाने लोकांच्या समस्येकडे जातीने लक्ष घालून त्याला न्याय मिळेपर्यंत त्या गोष्टींचा पाठपुरावा करून न्याय देणे हे खरे कार्य समजले जाते.आपली सर्वानुमते जिल्हा कोषाध्यक्ष करीता नियुक्ती केलेली आहे.

त्याबद्दल मी वतिष्ठांचे आभार मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून तयार झालेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर हा पक्ष आहे. व त्यात मला काम करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे.

RPI :माझ्या सर्व समावेशक कार्याची ओळख महाराष्ट्रभर पक्षाच्या मार्फत एक नवी अवलौकिक छबी तयार झाली याची मला खात्री आहे. हाच पक्षाच्या वरिष्ठांचा विश्वास कायम ठेवून मी पदाची गरीमा राखत निष्ठेने व पक्षाच्या वैचारिक भावनेने माझे कार्य पार करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे.

आॅनलाईन तक्रार करतांना शेतकर्याना होतेय अडचन आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात आरडीसी यांना निवेदन( wardhanews )

0

 

ताबडतोब अडचन दुर करण्याची निवेदनाव्दारे मागणी

सिंदी रेल्वे ता.१२ : शेतीच्या नैसर्गिक नुकसानीची शासन नियमानुसार ७२ तासाच्या आत विमा कंपनीच्या आॅनलाईन संंकेतस्थळावर व टोल फ्री नंबर वर तक्रार नोंदवाला तांंत्रिक अडचन जात असल्याने

रविवारी (ता.११) झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळात शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले सेलु आणि समुद्रपूर तालुक्यातील अनेक शेतकर्याची मोठी गोची झाली आहे.

सदर विमा कंपनीचे संकेतस्थळ आणि टोलफ्री क्रमांक ताबडतोब सुरु करण्याबाबत योग्य ती कारवाई करावी तसेच परिसरातील ज्या शेतकऱ्यांनी पीक वीमा काढला नाही.

 

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

त्याही नुकसान ग्रस्त शेतकर्याच्या शेतात जाऊन महसुल यंत्रनेच्या साहाय्याने पंचनामे करुन शासनस्तरावरुन तात्काळ मदत मिळवुन देण्याच्या मागणीचे निवेदन काग्रेसचे आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता.१२)परिसरातील शेतकऱ्यांनी निवासी जिल्हाधिकारी गणेश खरताडे यांना सादर केले.

 


विशेष म्हणजे झालेले वादळी पाऊस आणि गारपीट ऐवढे मोठे होते की यात परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील गहु हरभरा भाजीपाला आणि उन्हाळी सोयाबीन भुईसपाट झाले आहे.

wardhanews:सदर निवेदन देताना शेतकरी आशिष देवतळे, राजू दांडेकर, प्रदीप झाडे, वामनराव ढोक, राजू सोनटक्के,सुनील बोंबले, खुशाल बोरकर, शंकर झाडे, बालु साठोने, नरेश बानाईत आदी शेतकर्याची प्रमुख उपस्थीती होती

कार्यक्रमात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी,कार्यकर्तानी खुर्च्यांची छत्री करीत पलायन, हजारो खुर्च्या गायब ( Wardha News )

0

 

Wardha News:वर्ध्यात तीन दिवसीय महासांस्कृतिक महोत्सवाचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं.

पण त्या महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला कैलाश खेर यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


मग काय तर परंतु या कार्यक्रमात अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली, मात्र त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

तर या कार्यक्रमात नागरिक पावसापासून बचावाकरिता तेथील कार्यकर्ते खुर्च्या डोक्यावर घेऊन काही वेळ उभे राहिले

मग काय तर अचानक पने पावसाचा जोर वाढल्याने अनेकांनी खुर्चीसह घरचा रस्ता पकडला.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

तर या घटनेत नागरिकांनी एक दोन नव्हे तर एक हजारच्या जवळपास खुर्च्या फुर्रर्रर्र केल्याचं समोर आलं आहे

तर या कैलाश खेर यांचा कार्यक्रम असल्याने नागरिकांनी कार्यक्रम सुरु होण्याच्या एका तासांपूर्वी पासून गर्दी करायला सुरवात केली होती.

तर आता हळूहळू मैदान भरू लागले, पण ठरलेल्या वेळेवर कार्यक्रम सुरु झाला नाही. मग काय या अशातच काही वेळ पावसाच्या सरी बरसल्या पण वर्धेकरांनी धीर राखत तेथेच ठाण मांडून बसून राहिले मग काय तर पावसाची हजेरी.

तर अचानक या पावसाच्या सरी बंद होताच कार्यक्रम सुरु होईलच तर जनरेटरमध्ये बिघाड झाला तर काही वेळेत इलेक्ट्रिक वाद्यामध्ये सुद्धा बिघाड झाला.

मग त्या ठीकाणी वर्धेकर नागरिक कार्यक्रम सुरु होण्याची वाट पाहत असताना वरूण राजाने पुन्हा आपली वाट मोकळी केली आणि मैदानात नागरिकांची तारांबळ उडाली.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा https://www.suryamarathinews.com/manojjarange-2/

तर अचानक पणे नागरिकांनी बचावासाठी आपल्या डोक्यावर खुर्च्या घेत काहीनी दुचाकीवर तर काहींनी पायदळ आपल्या घरी खुर्च्या नेल्या. एवढंच नव्हे काहीनी खुर्च्याची मोडतोड केली तर काहींनी रस्त्यावर खुर्च्या फेकल्या काही तर आपलं डोक्यावर पावसाची हजेरी लावत घरी घेयून गेले.

Wardha News: तर आता या डेकोरेशन मालक दिलीप भातकुलकर यांनी आवाहन करताना म्हटलं की,या कार्यक्रमासाठी मी बारा हजार खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. तर आता यापैकी एक हजाराच्या जवळपास खुर्च्या नागरिकांनी पळवून नेल्या. तर काही नागरिकांनी नेलेल्या खुर्च्या परत कराव्यात’ असे आवाहन देखील करण्यात आले.

शेतात खोदकाम सुरू असताना अचानक सापडला खजिना, शेतकरी राजा रातोरात कोट्याधीश झाला मालक ( Man Found Treasure in Field )

0

 

Man Found Treasure in Field : जगभरातून अनेक अशा घटना समोर येत असतात ज्यात कुणालातरी कुठेतरी अचानक खजिना सापडला आणि रातोरात शेतकरी राजा त्यांच नशीब चमकलं.

या पूर्वी लोकांकडे दागिने आणि सोन्या-चांदीची नाणी असायची.

या चोरांपासून वाचवण्यासाठी लोक ते एकतर घरात किंवा शेतात गाडून ठेवत होते.

पण आता अशाच एका व्यक्तीला त्याच्या शेतात काम करत असताना अचानक खजिना सापडला आहे ज्याद्वारे तो शेतकरी राजा कोट्याधीश बनला.

द सनच्या रिपोर्टनुसार, एका व्यक्तीच्या शेतात खोदकाम चालू होतं. मग काय तर यादरम्यान त्याला कशाचातरी आवाज ऐकू आला.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

तर यात मजूर आणि शेताच्या मालकाने पाहिलं तर त्यांना जे दिसलं ते पाहून हैराण झाले.

मग काय ते एखाद्या दुर्मिळ खजिन्यासारखं होतं. मग आधी व्यक्तीला वाटलं की ते सामान्य नाणी असतील.

मग या सविस्तर पण यांची किंमत इतकी जास्त होती की, एक्सपर्ट्सही चक्क हैराण झाले.

मग काय ही घटना इंग्लंडच्या इसेक्समधील आहे. इथे काही लोक शेतात मेटल डिटेक्टरिट्स घेऊन काहीतरी शोधत होते.

पण आता या ठिकाणावर पोहोचल्यावर त्यांना मशीनवर काही सिग्नल मिळाले. तेव्हा त्यांनी तिथे खोदकाम सुरू केलं. मग काय तर अशात त्यांना खाली गाडून ठेवलेला खजिना सापडला.

मग काय तर त्यांच्या हाती एकूण 122 चांदीची नाणी लागल्या. ही नाणी 950 वर्षआधी जुनी आहेत. तर या चांदीची नाणी 4 इंच आत गाडली होती.

मग या सर्व एकूण 144 नाण्यांमध्ये अशीही काही नाणी सापडली ज्यांची किंमत फार जास्त आहे.

पण आपण किंमत वाचून व्हाल अवाक्

तर लिलाव करणारा ब्रैडले हॉपर म्हणाला की, या नाण्यांच्या मालकाचा मृत्यू युद्धादरम्यान झाला असावा. ते कुणाला देता आले नाहीत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मग तर म्युझिअमकडून एकूण 13 नाणी खरेदी करण्यात आले आहेत. तर 122 नाणी वितळवल्या जातील. यातून मिळणारा फायदा शेत मालकाला दिला जाईल.

Man Found Treasure in Field :तर आता या नाण्यांची किंमत 1 कोटी 88 लाख रूपये मिळण्याचा अंदाज आहे.

सगेसोयऱ्यां’साठी मनोज जरांगेंचं उपोषण, पण प्रकृती खालावली; जरांगेनी सरकारला दिला इशारा; १५ तारखेनंतर…( manojjarange )

0

 

Manojjarange:पुन्हा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगेसोयरेंबाबत अधिसूचनेची लवकरात लवकर या सर्व अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलक मराठा योद्धा मनोज जरांगे पुन्हा एकदा अंतरवलीत उपोषणाला बसले आहेत.

तर आता त्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकतीही पण खालावली आहे.

मनोज जरागे यांनी तसेच उपचार घ्यायला स्पष्ट त्यांनी नकार दिला आहे.

त्यांनी या वेळेस पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे म्हणाले, “15 तारखेला अधिवेशन घेतलं नाही, तर तसंच सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

मात्र आणि हैदराबाद गॅझेट घेतलं नाही तर या महाराष्ट्रात काय होतंय त्यांच्या लक्षात येणार नाही.

पण त्यांनी टप्पे पाडलेत तर मग आम्ही पण टप्पे पाडलेलेच आहेत ना आंदोलनाचे. आम्ही काय दाखवू हे सरकारला चांगलचं माहिती आहे.

तर येत्या १५ तारखेच्या अधिवेशनात जर अंमलबजावणी केली नाही तर मराठे पुन्हा मुंबईला जातील की आणखी कुठे जातील हे मी आत्ताच सांगत नाही, तर सरकार ला वेळेस त्यांना लवकरच कळेल

तर येत्या १५ तारखेला अमित शहा संभाजीनगरला येत आहेत. तर मात्र आम्ही पण कशासाठी त्यांची भेट घ्यायची त्यांनी येऊन आमची भेट घ्यावी.

तर समजून त्यांना आम्ही यापूर्वी खूप विनंती केल्या आहेत. तर आता त्यांनी लक्ष दिलेलं नाही मग ते कोणीही असू द्या.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मग आम्ही त्यांना परत हिंडायला लावायला आम्ही खंबीर आहोत. आता आम्ही १४ राज्यात एकत्र यायला लागलो आहोत.

तर आताच मग त्यांना दाखवतो कचका काय असतो.

( Manojjarange )मात्र यानंतर आता देशात आंदोलन होईल, कारण आम्ही चौदा राज्यात एकत्र येत आहोत, असंही यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

उर्दू शाळेच्या छतावर चार अर्भक आढळले शहरात एकच खळबळ ,पोलिसांचा तपास सुरू !Akola Crime

0

 

Akola Crime: अकोल्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील एका शाळेच्या छतावर चार अर्भकं सापडल्याची माहिती मिळाली आहे.

तर यामुळे संपूर्ण अकोला परिसरात खळबळ माजली आहे. अकोला पोलीस सध्या घटनास्थळी पोहचून या घटनेचा शोध घेत आहेत.

तर ही अर्भकं या ठिकाणी आली कुठून याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे.

तर ही घटना अकोला येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या छतावर घडली आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

4 नवजात अर्भकांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या एकच नवजात अर्भक दिसत आहे.

तर बाकीचे मासाचे तुकडे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र परंतु वैद्यकीय अधिकारी सांगेपर्यंत याची पुष्टी करता येणार नाही.

तर या घटनेने संपूर्ण शहर आणि जिल्ह्यातील सर्वांनाच हादरवून सोडले आहे. ज्या ठिकाणी अर्भकांचे हे अवशेष सापडले तिथून महिला जिल्हा रुग्णालय फक्त 500 किंवा 1000 मीटर अंतरावर आहे.

तर आता पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा करून सर्व अर्भकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करून ही घटना कोणी घडवली याचा तपास सुरू केला आहे.

तर कसा झाला धक्कादायक प्रकरणाचा पर्दाफाश?जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या आवारात काही मुलं क्रिकेट खेळत होती. खेळताना त्यांचा चेंडू छतावर गेला.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यावेळी एक तरूण चेंडू आणण्यासाठी छतावर गेला असता त्याला रक्ताने माखलेली एक प्लास्टिक पिशवी आढळली. त्यानंतर त्याने ती उघडली आणि त्यात अर्भक आढळले.

Akola Crime: त्याने तातडीने फोन करूनपोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले आणि याप्रकरणी गुन्हा नोंद केला. तसंच पुढील तपास सुरू आहे.

 

माध्यम प्राधिकरण सनियंत्रन समिती सदस्य संजय जाधव यांचा सत्कार ( Shegaonnews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी माध्यम प्राधिकरण सनियंत्रन समिती गठीत केले असून या समितीच्या सदस्य पदी साम टीव्ही न्यूज चॅनलचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी संजय जाधव यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

. समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल आज शनिवारी संजय जाधव हे संतनगरी शेगावात आले असता त्यांचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्नित तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

यावेळी टीव्ही ९मराठीचे जिल्हा प्रतिनिधी गणेश सोलंकी, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय संघटक राजेश चौधरी,

 

Shegaonnews:शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष फहीम देशमुख, सचिव नंदूभाऊ कुलकर्णी, धनराज ससानेआदींनी पुष्पहार घालून स्वागत सत्कार केले.