( crimenews )शेगाव: प्रशिक्षण साठी येणाऱ्या महिला व मुलींशी गैरवर्तन करून छेडछाड करणे एका प्रौढ व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले! त्या आंबट शौकिनाला युवती व महिलांनी चांगलेच धुतले व त्याला चपलेचा हार टाकल्याची घटना घडली
याचे ‘व्हिडिओ आता वेगाने सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून त्याला नेटकरींचे भरपूर लाईक्स मिळत आहेत. त्याला चांगलाच धडा शिकविल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
ही विचित्र व आया बहिणीवर बुरी नजर ठेवणारी ही विकृत व्यक्ती बुलढाण्याच्या शेगाव शहरातील आहे.
त्याचे संतनगरीत प्रशिक्षण केंद्र आहे.
तिथे येणाऱ्या महिला मुलींशी हा व्यक्ती अश्लील वर्तन करून छेडछाड करत होता. मात्र इज्जत आणि भीतीपोटी महिला मुली समोर येत नव्हत्या. एका धाडसी युवतीने मात्र काही महिलांसह त्याला भर रस्त्यात बदडले! चपलेचा हार टाकून त्याला पोलीस स्टेशन पर्यंत नेले.
मात्र संबंधित व्यक्तीच्या पत्नी आणि कुटुंबातील व्यक्तींनी विनंती करून, पोलिसांनी त्याला समज देत, पुन्हा अशी चुकी करणार नाही असे स्टॅम्प पेपर वर लिहून घेतले. ,यामुळे गुन्हा दाखल झाला नसला तरी माया बहिणींनी त्याला चांगलीच शिक्षा केली आहे.
PM Kisan Yojana :शेतकरी ला लवकर या योजनेच्या 16 व्या हप्त्याची शेतकरी प्रतिक्षा करत आहेत.
तर त्यांच्यासाठी आनंदवार्ता आली आहे. कधी जमा होणार हा हप्ता?
तर आता या ऑक्टोबर 2022 मध्ये या योजनेतंर्गत 12 वा हप्ता जमा करण्यात आला होता.
तर या फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता जमा करण्यात आला. तर 27 जुलै रोजी 14 हप्ता जमा झाला.
पण या नोव्हेंबर महिन्यात केंद्राने 15 वा हप्ता जमा केला होता. साधारणतः पाच महिन्यांच्या अंतराने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती झाली आहे.
तर आता 16 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये देण्यात येतात. DBT माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होते.
तर आता या अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ बंद झाला आहे. कागदपत्रांची पूर्तता न केल्याने हप्ता थांबविण्यात आला आहे.
तर आता ही अडचण दूर करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय या खास मोहिम राबविणार आहे.
तर नक्की 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी अभियान राबविण्यात येईल.
पण आता या अभियानात प्रत्येक राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा सहभाग असेल. व देशभरातील 4 लाखांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून सर्व गावोगावी हे अभियान राबविण्यात येणार आहे.
16 वा हप्ता कधी मिळणार
तर या मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.
तर आता या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना पोलीस अटक करण्यात आली आहे. तर या दरम्यान, या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपही नेमकं सुरु आहे.
तर आता शेवटच्या सव्वाचार मिनिटांत नेमके काय काय घडले ते जाणून घेउया.
फेसबुक लाइव्हदरम्यान अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नरोन्हा दोघेच त्या कार्यालयात होते.
पण अचानक त्यावेळी मॉरिस याने ट्रायपॉड लावला. मग काय त्यानंतर त्याने फेसबुक लाइव्ह सुरू केले.
तर फेसबुक लाईव्ह सुरु असताना दोन ते तीनदा तो उठून कॅमेऱ्याच्या बाजूला गेला.
मग काय तर लाईव्ह सुमारे चार मिनिटे सुरु होते. तर त्यानंतर मॉरिस याने बंदुकीने पाच गोळ्या घोसाळकर यांच्या दिशेने झाडल्या. तर यापैकी चार गोळ्या त्यांना लागल्या.
मात्र या घटनास्थळी अचानक गोळ्यांच्या आवाज आला. पण यामुळे नागरिकांची पळापळ झाली.
तर आता घोसाळकर खाली कोसळले. तर गोळीबारानंतर मॉरिस याने दरवाजाकडेआपलीच धाव घेतली.
मात्र बाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये मॉरिस दोन ते तीन सेकंद घोसाळकर यांना पाहताना दिसत आहे.
तर ही सर्व त्यानंतर त्याच बंदुकीने मॉरिस स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न करतो.
पण मात्र, बंदुकीतील गोळ्या संपल्याने तो पहिल्या मजल्यावर धावला. व अचानक त्याठिकाणी पुन्हा बंदूक लोड केली.
मग काय तर त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. सव्वाचार मिनिटांचा हा थरार पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे.
या सेलिब्रेशनची तयारी पण आता…
तर आता अभिषेक आणि त्यांची पत्नी तेजस्वी यांना एक मुलगी व मुलगा आहे. तर त्यांच्या लग्नाचा वाढदिवस १४ फेब्रुवारी रोजी होता.
तर या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते मुलांना फिरायला घेऊन जात होते. मग काय तर यावर्षी त्यांनी सेलिब्रेशनची तयारी केली होती.
Abhishek Ghosalkar: पण परंतु आता हे सेलिब्रेशन अपूर्ण राहिले. तर आता अभिषेक यांच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. व त्यांचे वडीलही निशब्द झाले आहेत.
Yatranews: राज्यातील लाखो भक्त भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तालुक्यातील अट्रावल येथील श्री मुंजोबा यांच्या पारंपारिक यात्रेस उद्या शनिवार दिनांक १० फेब्रुवारी पासून प्रारंभ होत आहे.
या देवस्थानच्या विश्वस्तांच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी यात्रेची परिपूर्ण तयारी झाली असून यात्रा स्थळी व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत.
पोलीस उपाधीक्षक अन्नपूर्णा सिंह व यावलचे सहाय्यक पोलीस निरिक्षक हरिष भोये यांनी यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला असून यात्रोत्सव काळात कोणताही अपघात होणार नाही तसेच भाविकांच्या दर्शनासाठी विश्ववस्तांच्या माध्यमातुन काय सोयी सुविधा करणार याबाबतचा आढावा त्यांनी घेतला आहे.
या यात्रा उत्सव वाराच्या काळासाठी यात्रेच्या दिवशी येथील यावलच्या एसटी आगारासह भुसावळ ,फैजपूर , चोपडा ,जळगाव येथून ही बसेस सुरू करण्यात येतात .
या यात्रेसाठी दरवर्षी यात्रेकरूं भक्तांची वाढती गर्दी पाहता वर्षी देवस्थान समितीने चोख व्यवस्था केली आहे. यावल तालुक्यातील अट्रावल येथील प्रसिद्ध मुंजोबा मंदिर म्हणजे नवसाला पावणारा अशी भाविकांची श्रद्धा आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगत असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील बऱ्हाणपूर या जिल्ह्यासह जिल्ह्यातील भाविक यात्रेत हजेरी लावतात. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील शनिवार व सोमवारसह पोर्णिमेला ही यात्रा भरते. माघ शुक्ल पक्षातील पहील्या तीथीलाच शनिवार आल्याने आजपासून यात्रा प्रारंभ होत आहे. यावर्षी यात्रेचे पौर्णिमेसह पाच वार पडत आहेत
यात्रेचे वार
Yatranews :१० फेब्रुवारी (शनिवार), १२ फेब्रुवारी (सोमवार), १७फेब्रुवारी (शनिवार) ,१९ फेब्रुवारी (सोमवार), २३ २४ फेब्रुवारी (पोर्णिमा) असे यात्रेचे वार आहेत यासह यात्रोत्सव काळात गर्दी टाळण्यासाठी तसेच सुटीचे व सोईनुसार मधल्या दिवसात ही येथे भाविकांची गर्दी असते.
जादा बसेस
Yatranews:राज्य परिवहन महामंडळाकडून यावल, भुसावळ, फैजपूर, रावेर येथून एसटी बसेस सोडल्या जातात यात्रेच्या दिवशी येथील पोलीस ठाण्याकडून यात्रास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो यासह देवस्थानचे स्वयंसेवक बंदोबस्तासाठी तैनात केले जातात.
त्यांच्या जागी प्रभारीपदी रावेरचे हरीष भोये यांची नियुक्ती
यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे
policenews: यावल तालुक्यातील दहिगाव गावातील तणावाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मानगावकर यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आले आहे. त्यांच्या जागी प्रभारीपदी रावेरचे सपोनि हरीष भोये यांची नियुक्ती करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
दहीगावात दोन समुदायांमध्ये तणाव यावल तालुक्यातील दहिगाव येथे परवा रात्री दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला.
पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत वातावरण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काल दिवसभर गावात मोठ्या प्रमाणातमध्ये तणावाचे वातावरण दिसून आले.
दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा फैजपुरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अर्पित चौहान यांनी दहिगावात गुरूवार ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेपासून ४८ तासांसाठी संचारबंदी लागू केली आहे.
या संदर्भातील निर्देश जारी करण्यात आले आहेत. संचारबंदीच्या कालावधीत कुणालाही घराबाहेर पडता येणार नसून अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता सर्व दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने देखील बंद राहणार आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ (१) अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक मानगावकर कंट्रोल जमा दरम्यान, या दंगलीच्या विषयाला घेवून यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची जळगाव येथील पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे
policenews:त्यांच्या जागी रावेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये यांची प्रभारीपदी नियुक्त करण्यात आली आहे. अशी माहिती विश्वसनिय सुत्रांकडून मिळाली आहे. या बदलीमुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
sanchar bandi : तालुक्यातील दहिगाव येथे दोन गटांमध्ये निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमिवर, काल सायंकाळ पासून ४८ तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, यावल तालुक्यातील दहिगाव येथे परवा रात्री दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला. पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत वातावरण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
मात्र काल दिवसभर गावात मोठ्या प्रमाणातमध्ये तणावाचे वातावरण दिसून आले.
या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा फैजपुरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अर्पित चौहान यांनी दहिगावात दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सात वाजेपासून ४८ तासांसाठी संचारबंदी लागू केली आहे.
sanchar bandi:या संदर्भातील निर्देश जारी करण्यात आले आहेत. संचारबंदीच्या कालावधीत कुणालाही घराबाहेर पडता येणार नसून अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता सर्व दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने देखील बंद राहणार आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ (१) अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
sanchar bandi:दरम्यान, दहिगावात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त लावला असून गावातील वातावरण आता नियंत्रणात असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
शेगाव.policenews : योगेश हनुमंत जाधव हे मोहाडी तालुका जामनेर या छोट्याशा खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्माला आले. त्यांचे वडील हनुमंत जाधव हे शेती करायचे त्यांच्याकडे दीड एकर शेती होती वडिलांना सन 2005 मध्ये किडनीचा आजार झाल्याने ते मरण पावले.
तेव्हा योगेश यांच्या घरी पुरेसे धान्य सुद्धा नव्हते तेव्हा आईने योगेश याला धीर देऊन मोठ्या संयमाने व कष्टाने आपण पुढे जाऊ असे सांगितले .त्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी योगेश यांच्यावर आली.
योगेश यांचे लहान भाऊ रितेश यांनी योगेश यांना सांगितले की तू हुशार आहेस तू शाळा शिक मी शाळा सोडून शेतीचे व कंपनीचे काम करतो.त्यानंतर लहान भाऊ कंपनीत काम करू लागले.योगेश जाधव हे सुद्धा जळगाव येथील जैन कंपनीत जाऊन सायंकाळी कंपनीतून आल्यानंतर ट्युशन घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागले.
योगेश जाधव यांनी सन 2006 मध्ये पहिली पोलीस भरती जळगाव येथे केली.तेव्हा ते पहिल्या प्रयत्नात त्यांची चेस्ट कमी भरल्याने फेल झाले.त्यानंतर योगेश जाधव यांनी सन 2007 मध्येच घरची परिस्थिती बिकट असल्याने पुणे येथे कंपनीत काम करण्याचे ठरवले.
पुणे येथे गेल्यानंतर योगेश यांना त्यांचा मित्र विठ्ठल तायडे याने मदत केली.परंतु पुणे येथे कंपनीत बीएससी चे शिक्षण अपूर्ण असल्याने मनासारखा जॉब न मिळाल्याने योगेश हा घरी परत आला. त्यानंतर योगेशने आपल्याला आता पोलिसात भरती व्हायचे अशी मनाशी खुनगाठ बांधली.सन 2007 पासून योगेश जाधव यांच्या आयुष्याचा खडतर प्रवास सुरू झाला. योगेश जाधव यांनी सन 2007 मध्ये पुणे येथे पोलीस भरती मारली.
परंतु तेव्हा त्यांचे शरीर हे बळकट नसल्याने त्यांना ग्राउंड ला कमी मार्क आल्याने ते पुणे येथे पोलीस भरतीत अपयशी झाले.
त्यानंतर योगेश जाधव यांच्या मातोश्री शोभाताई हनुमंत जाधव यांनी त्यांना सांगितले की योगेश तू पोलीस भरती व्हायच आम्ही मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करू त्यानंतर योगेश जाधव यांनी सन 2008 मध्ये त्यांच्याजवळ पैसे अपुरे असल्याने लोखंडी गोळ्या ऐवजी दगड घेऊन गोळा फेकची प्रॅक्टिस केली. तेव्हा सर्व मुलं त्यांना हसायचे योगेश वेडा झाला दगड फेकत आहे.
योगेश जाधव यांनी कोणतीही अकॅडमी न लावता स्वतःवर विश्वास ठेवून अत्यंत चिकाटी धरून जिद्दीने प्रॅक्टिस केली.गोळा फेक मध्ये त्यांनी इतकी मेहनत घेतली की ते गोळा फेक मध्ये आजूबाजूच्या चाळीस खेड्यामध्ये अव्वल होते. त्यानंतर योगेश जाधव यांनी सन 2008 मध्ये मुंबई शहर येथे भरती मारली.
परंतु नेमक्या ग्राऊंडच्या दिवशी त्यांच्या पोटात गोळा आल्याने त्यांना ग्राउंड ला पुरेसे मार्क मिळाले नाही ते मुंबई शहर येथे पोलीस भरतीत अपयशी झाले. त्यानंतर योगेश जाधव यांनी मित्र परमेश्वर जाधव,योगेश बागुल यांना सोबत घेऊन पुन्हा जिद्दीने पोलीस भरतीची प्रॅक्टिस सुरू केली. सन 2010 मध्ये योगेश जाधव यांनी बुलढाणा पोलीस भरती केली. येथे ग्राउंड ला 92 मार्क आल्याने योगेश जाधव यांनी त्यांचा पेपर चांगला असल्याने व स्वतःवर विश्वास असल्याने पेपर होण्याअगोदर गावात पेढे वाटून दिले. योगेश जाधव यांच्या खडतर आयुष्याचे पहिले यश बुलढाणा पोलीस दलात सन 2010 मध्ये भरती होऊन त्यांना मिळाले.
त्यानंतर योगेश जाधव यांच्या मातोश्री शोभाताई यांना सन 2015 मध्ये हार्ट अटॅक आला परंतु त्यांचे दैव चांगले असल्याने त्या सुदैवाने त्यामध्ये वाचल्या. त्यानंतर योगेश हे वडिलांनी पाहिलेल्या पोलीस उपनिरीक्षक होण्याच्या स्वप्नाचा पाठलाग करू लागले. तेव्हा योगेश यांना त्यांची पत्नी पूजा यांनी खूप साथ दिली.योगेश यांनी अत्यंत जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर सन 2016 मध्ये डिपार्टमेंटल पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली.
त्यानंतर उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या निकालानुसार ते जानेवारी 2024 मध्ये खऱ्या अर्थाने पोलीस उपनिरीक्षक झाले.
Policenews : एखाद्या छोट्याशा खेड्यातला गरीब कुटुंबातील व्यक्ती जेव्हा पोलीस उपनिरीक्षक होतो तेव्हा त्यांच्या गावातील मित्र मंडळी राहुल पाटील,परमेश्वर जाधव, संदीप राजपूत, योगेश बागुल, रमेश बागुल, प्रदीप सोनवणे दिनेश अहिर,रवींद्र सुतार, मोहन बावस्कर, अमोल राजपूत, प्रदीप अहिर, भरत निंबोळकर, हेमंत दलाल, भूषण शिंपी व समस्त नातेवाईक यांना त्यांच्याबद्दल वाटणारा अभिमान हा चिखलातून कमळ उगवल्यासारखे आहे. योगेश जाधव यांच्या जिद्दीला व मेहनतीला सलाम*
तामगाव पोस्टेचे पीएसआय यांची बदली नको व्हायला नागरिकांमध्ये चर्चा….
पीएसआय सोळंकी ची बदली बद्दल नागरिकांमध्ये नाराजीचा सूर.
policenews: संग्रामपूर तामगाव पोलीस उपनिरीक्षक पीएसआय सोळंके मागील एक वर्षापासून काम व कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडला असून पोलीस उपनिरीक्षक पदाचा अभ्यास येत्या काळात एक चांगला पोलीस अधिकारी तामगाव पोलीस स्टेशनला कार्यरत पाहायला मिळतो.
पोलीस खात्या मध्ये सर्वात जास्त कामाचा भार कोणावर असेल तर तो पोलीस उपनिरीक्षक यांचेवर असतो. मोठ्या शहर सारख्या ठिकाणी पोलीस शिपाई ते हवालदार यांना 8 तास ड्युटी आहे.
या उलट पीएसआय यांना 12 तास ची ड्युटी आहे . पोलीस स्टेशन चे जास्तीत जास्त काम पीएसआय यांनाच करावे लागते उदा. गुन्हे दाखल करून आरोपपत्र सादर करणे,
अप मृत्यू चौकशी, तक्रार अर्ज , बंदोबस्त आणि प्रत्येक पीएसआय कडे त्याच्या क्षमतेपेक्षा दहापट जास्त काम असते.
एका दिवसात दोन किंवा तीन गुन्हे दाखल झाले तर त्यांना त्यादिवशी घरी सुध्दा जायला जमत नाही. अशाच व्यक्तिमत्त्वाचे तामगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय सोळंके
पो उपनिरीक्षक यांनी मागील एक वर्षांमध्ये 376,302, एक एक गुन्हा व वीस ते पंचवीस प्रकरणे 7 ते 8 रात्रपाळी ड्युटी आणि रोजचे 10 ते 12 तास काम करून आपले कर्तव्य खूप चांगल्या प्रकारे पार पाडताना दिसले.
तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांमध्ये आहे की तामगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय सोळुंके यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस वेळेस व सामाजिक असे वेगवेगळे प्रसंग आला.
जनतेमध्ये प्रेमाचे वातावरण निर्माण करणारे अधिकारी या तामगाव पोलीस स्टेशनला असे कर्तव्यदक्ष व्यक्तीची खूप गरज असून त्यांची बदली कशी काय झाली.
Policenews : असून प्रत्येक अधिकारी एका ठिकाणी दोन ते अडीच वर्ष कालावधी होऊन बदली घेतात परंतु सर्व धर्मातील लोकांसोबत चांगल्या प्रकारे वागणाऱ्या व्यक्तीची बदली थांबली पाहिजे तालुक्यातील खेड्यापाड्यातील जनतेमध्ये चर्चा सुरु दिसून येत आहे
रा ज्याच्या राजकारणातील एक अजून मोठी बातमी समोर आली आहे.
तर येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाचा पहिला नवीन चेहरा उमेदवार ठरला आहे.
Lok Sabha Election: महाराष्ट्रातील बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्यात येऊ शकते, अशी सूत्राचे माहिती समोर मिळत आहे.
तर येणाऱ्या नरेंद्र खेडेकर हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात
सिंदी रेल्वे Kabaddi: येथील साई क्रिडा मंडळाने शुक्रवारी ता.९ ते रविवार ता.११ दरम्यान म्यु. नेहरू विद्यालयाच्या मैदानावर भव्य राज्यस्तरीय महीला पुरुष कबड्डी सामन्याचे तिनदिवशीय आयोजन केले आहे.
विशेष म्हणजे कबड्डीचे माहेर घर असलेल्या सिंदी रेल्वे शहरात पहिल्यांदाच आधुनिक पध्दत म्हणजे प्रो कबड्डी प्रमाने “मॅटवरील कबड्डी” पध्दतीने सर्व सामने खेळवले जाणार असल्याने हे समाने पाहने सिंदीवासीयांसाठी पर्वनीच ठरनार आहे.
कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात प्रथम पुरस्कार ७७ हजार ७७७ रुपये रोख तर द्वितीय पुरस्कार ५५ हजार ५५५ रुपये रोख तर महीला गटात प्रथम पुरस्कार ४४ हजार ४४४ रुपये रोख तर द्वितीय पुरस्कार ३३ हजार ३३३ रुपये रोख देऊन अंतिम सामन्यात विजेत्या महीला पुरुष संघाला सन्मानित करण्यात येणार आहे.
याशिवाय वैयक्तिक बक्षिसात संपुर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू,अंतीम सामन्यात उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, पहिली बोनस,पहिली पकड आदी सोबतच प्रेकक्षकांचा आवडता खेळाडू, असे पुरुष व महिला दोन्ही गटातील खेळाडूला रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ९) ला सांयकाळी ६ वाजता होणार असुन याप्रसंगी मिससे इंडिया २०१८ डॉ. रुचाजी सुगंधा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
संपूर्ण स्पर्धेचे लाईव्ह प्रसारन एम.एच.बी.केबल आणि युट्यूब चॅनल वरुन महेंद्र बहेकर करनार असल्याने कबड्डी प्रेमीना घरबसल्या सामने पाहण्याचा आनंद मिळणार आहे.
Kabaddi: स्पर्धेची प्रवेश फी १५०१ रुपये , लेट फी व तक्रार फी २००१ रुपये असुन जास्तीत जास्त कबड्डी संघानी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन साई क्रिडा मंडळाचे अध्यक्ष गंगाधर कलोडे, अशोक चि. कलोडे, अजय कुंभारे,गजानन खंडाळे, सुरज कोपरकर, सागर अंभोरे, चंदन चव्हाण, मुन्ना क्युरेशी ,गौरव कलोडे, पवन कस्तुरे, तारा कोपरकर आदी साई क्रिडा मंडळाच्या पदाधिकााऱ्यांनी केले आहे.