Uriya fertilizer Disadvantage: अलीकडे फळ पिकासमवेत विविध प्रकारचे मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर केला जात असून रासायनिक खताचा अंदाधुंद होणारा वापर हा पिकासाठी भविष्यात मोठ्या प्रमाणात घातक ठरत आहे.
रासायनिक खताच्या अंदाधुंद वापर त्यामुळे जमिनीचे सुपीकता देखील भविष्यात कमी होऊ लागले आहे.
खरंतर या पिकातून अधिकचे उत्पादन मिळवण्यासाठी विथ प्रकारचे रासायनिक खताचा वापर केला जात आहे.
यामध्ये हिवरे या खताचा सर्वाधिक वापर होत आहे.
तरी या युवऱ्याखात पिकातून विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी अतिशय आवश्यक असलेले हिवरे हे खत नायट्रोजनचा पुरवठा करते.
खरंतर नायट्रोजन हे पिकाच वाढीसाठी अतिशय उपयुक्त असते त्यामुळे नायट्रोजन अर्थातच नत्राचे कमतरता भासू लागले हे तर या पिकातून अपेक्षित असणे उत्पादन मिळत नाही.
Uriya fertilizer Disadvantage: अशा परिस्थितीत नत्राचे कमतरता दूर करण्यासाठी युवरा खताचा वापर काही पिकामध्ये खूपच कायदेशीर ठरते तर ह्या नत्राचा अर्थातच हिवर्याचा जर सुयोग वापर झाला तर या पिकातून निश्चितच विक्रमी उत्पादन मिळवता येते हे भविष्यात काही शंका युरिया वापर करू नये असे देखील सल्ला कृषी तंत्रज्ञान दिले आहे.
farmernews: बरेच दिवसापासून जर्मनीत शेतकऱ्यांचे आपला मोठे आंदोलन सुरू आहे. तर या जर्मनीत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात कपातीच्या विरोधात देशभरात शेतकरीआंदोलने होत आहेत. राजधानी बर्लिनपासून अनेक मोठ्या शहरांमध्ये शेतकऱ्यांनी रस्ते अडवले आहेत. या मागणीसाठी होत आहे आंदोलन
या देशात शेतकऱ्यांनी रस्त्यावर खत टाकून ते आंदोलन करत आहेत. तर जर्मनीच्या सर्व १६ राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीत शेतकरी ट्रॅक्टरच्या ताफ्यासह शेतकरी रस्त्यावर आहेत.
तर यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांशी झटापट करत आपल्या मागण्या मान्य न केल्यास आणखी कठोर भूमिका घेणार असल्याचा इशारा सरकारला दिला पण दिले आहे.
या देशात तर जर्मन सरकारने गेल्या काही वर्षी डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात कपात जर्मनी सरकार ने केली होती. तर या शेतीमध्ये वापरल्या जाणार्या डिझेलवरील कर परतावा आणि ट्रॅक्टरवरील कर सूट रद्द करण्यात आली. पण त्यासाठी सरकारी पैशांची बचत झाल्याचा हवाला देण्यात आला.
परंतु शेतकऱ्यांना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या अनुदानातून सरकारला प्रत्यक्षात सुमारे ९० कोटी युरो वाचवायचे आहेत. अनुदानातील कपात लवकरात लवकर पूर्ववत करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होतं आहे. तर गेल्या वर्षी १८ डिसेंबरपासून शेतकऱ्यांनी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले होते.
तर या यावर्षी जर्मनीत होणाऱ्या निवडणुकीत विजयाची शक्यता शोधत असलेल्या AfD या पक्षाने शेतकऱ्यांच्या या निदर्शनाला पाठिंबा दिला आहे. तर आता या सध्याच्या सरकारबद्दल जर्मन लोकांच्या असंतोषाचा पुरावा म्हणून पक्ष या आंदोलनाचा वापर करत आहे.
farmernews : तर जर्मन इन्स्टिट्यूट फॉर न्यू सोशल ऑनर्सचे हर्मन ब्लिंकर्ट यांनी सांगितले की, सरकार सध्या कोंडीत सापडले आहे. सरकारने ही कर कपात परत घेतली तर त्यांना ते योग्य वाटणार नाही. जर्मण या सरकारची अडचण अशी आहे की त्यांनी आधीच जनतेच्या विश्वासाशी खेळ केला आहे तर म्हणून या शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केले.
शेगाव: लोकशाहीमध्ये पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असे म्हटले जाते पत्रकार हा समाजाचा आईना असतो समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांना आपल्या लेखणी द्वारे सर्व समाजासमोर आणत असतो.
बदलत्या जमान्यात डिजिटल युगामध्ये पत्रकारांवर फार मोठी जबाबदारी आलेली आहे या जबाबदारीचे भाण ठेवून पत्रकारांनी गोरगरीब शोषित वंचितांना न्याय देण्यासाठी आपल्या लेखणीचा उपयोग करावा
असे प्रतिपादन. मौलाना आझाद विचार मंच चे जिल्हाध्यक्ष हाजी मुजमील खान यांनी शेगाव येथे केले पत्रकार दिनानिमित्त स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्राम भवन येथे मौलाना आझाद विचार मंच च्या वतीने कर्तुत्वान पत्रकारांचा छोटेखानी कौटुंबिक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
journalist: यावेळी मार्गदर्शन करताना हाजी मुजम्मिल खान हे बोलत होते या कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ पत्रकार राजकुमार व्यास सूर्या मराठी न्यूज चॅनलचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी इस्माईल शेख पत्रकार समीर शेख यांचा हाजी मुजम्मिल खान यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला अतिशय छोटेखानी झालेल्या या सत्कार सोहळ्याला मजहर खान, चांद ठेकेदार उपस्थित होते
ATM SBI : संग्रामपूर येथील एटीएम चोरी प्रकरणी काही तासांतच दोन आरोपींना एटीएम व त्या वाहनासह पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यांना ताब्यात घेण्यासाठी तामगाव पोलीस ठाण्याचे विशेष पथक जालना कडे रवाना झाले आहे.
तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रमोद उलेमाले यांनी’सूर्या मराठी न्यूज ‘ सोबत बोलताना ही महत्वपूर्ण माहिती दिली. जालना पोलिसांनी दोघा आरोपींना एटीएम व मालवाहू वाहनासह पकडले. त्याची माहिती मिळताच जालना येथे विशेष पथक रवाना करण्यात आले.
पथकात पोलीसासह स्टेट बँकेच्या संग्रामपूर शाखा व्यवस्थापक, एटीएम तंत्रज्ञ यांचा समावेश आहे. घटनेतील तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.पकडण्यात आलेल्या दोघा साथीदारकडून त्यांची माहिती घेऊन त्यांनाही लवकरच जेरबंद करण्यात येईल अशी माहितीही ठाणेदार उलेमाले यांनी दिली.
आज पहाटे पोलिसांच्या गस्त मध्ये संग्रामपूर येथील स्टेट बँकेचे एटीएम त्यातील रक्कमेसह चोरीस गेल्याचे आढळून आले. याची माहिती मिळताच ठाणेदार यांनी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.तसेच जालना, अकोला, जळगाव आदी सीमावर्ती जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करण्याची विनंती केली. यामुळे आरोपी लवकर पकडण्यात यश आले.
ATM SBI :ही घटना तपासाच्या दृष्टीने आव्हानात्मक होती. त्यातच केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव आज संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे संकल्प यात्रेवर आहे. त्यामुळे पोलीस दुहेरी दडपणात होते. मात्र दोन आरोपी, एटीएम व वाहन सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आहे
दुस-या दिवशी बावनवीर येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन_
bhupendra yadav: शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांचा विकास करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कामगार व रोजगार आणि पर्यावरण, वन व जल वायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज येथे केले.
संग्रामपूर तालुक्यातील बावनवीर येथील विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव बोलत होते. यावेळी आमदार अँड. आकाश फुंडकर, आमदार श्रीमती श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सन २०४७ पर्यंत मजबूत भारत बनवण्याचा संकल्प आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकांना आयुष्यमान कार्ड, किसान क्रेडिट कार्ड, आदिवासी बांधवासाठीच्या योजना, जात प्रमाणपत्र यासारख्या विविध योजनाचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
त्यासाठीच शासन या यात्रेच्या माध्यमातून आपल्या दारात आले आहे. शासनाने पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक लाभ डिजिटल स्वरुपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रत्येक गावात रस्ते, वीज, सिंचनाची सोय झाली असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. यादव यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या अनेक योजनांमुळे गावातच रोजगार मिळण्याची सोय झाली आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक गावातील छोट्या वर्गासाठी विश्वकर्मा योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून परंपरागत व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शासनाने स्त्री-पुरुष समानतेवर जोर दिला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महिला आधारित विकासाचे स्वप्न आहेत. आतापर्यंत ८५ लाख महिला बचतगटाची स्थापना केली आहे. केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरु केली आहे. देशातील गरिबी दूर होण्यासाठी शासनाचे पैसे खऱ्या अर्थाने गरीब माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा गावागावात नेण्यात येत असल्याचे श्री. यादव यांनी सांगितले.
सामान्य माणसांचा शंभर टक्के विकास करण्यासाठी शासनाच्या योजना सामान्य नागरिकांपर्यत पोहोचविण्याची जबाबदारी अधिकारी, कर्मचारी यांची आहे. अगोदर आपले घर स्वच्छ करावे त्यानंतर गाव स्वच्छ करावे आणि आपला देश स्वच्छ करण्यासाठी गावागावात व्यवस्था निर्माण करुन स्वच्छता अभियान राबविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय कामगार व रोजगार आणि पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार अँड. आकाश फुंडकर, आमदार श्रीमती श्वेताताई महाले व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन अमोल बनसोडे यांनी केले, तर गटविकास अधिकारी एस. व्ही. देशमुख यांनी आभार यांनी मानले.
याप्रसंगी ‘हमारा संकल्प विकसित भारत’ची प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी या विकसित भारत संकल्प यात्रेत उभारण्यात आलेल्या सर्व विभागाच्या स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली.
आज विकसित भारत संकल्प यात्रेत आज बावनवीर येथे केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध विभागाच्या विविध योजनांची माहिती गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरिता शासनाने पाठविलेल्या एलईडी रथामधून देण्यात आली. याप्रसंगी गावातील महिला व पुरुष मंडळींनी या एलईडी रथासोबत आलेल्या विविध योजनांचा लाभ घेतला.
जिल्हा परिषद सोनाळा येथील सृष्टी चिंचोलकार व तिच्या चमूने देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले.
bhupendra yadav: या कार्यक्रमास जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
SBI ATM| सर्वसामान्य माणसाला विचारात पाडणारी घटना संग्रामपूर तालुक्यात घडली असून आता जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा आणि आपण सुरक्षित आहोत की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे ,
ज्या प्रमाणे चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत अश्यात आव्हानात्मक चोरी करत ATM गायब करणाऱ्या चोरांनी संग्रामपूर पोलीस सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे ,
त्यामुळे खरोखर ह्या घटनांचा बंदोबस्त करून गुन्हेगारांना संग्रामपूर पोलीस कशे वठणीवर अनातात याकडे आता लक्ष आहे , नाहीतर सर्वसामान्य जनतेतील विश्वास संपून जाईल असे म्हटले तर चुकीचे नाही , त्यामुळे दबंग कारवाही करून गुन्हेगारांच्या मुसक्या अवळण्याचे आव्हाहन आता संग्रामपूर पोलिसांसमोर असून त्यांनी ताबडतोब शोध मोहीम हाती घेऊन घटनेचा छळा लावणे गरजेचे आहे.
संग्रामपूर येथील चोरीच्या घटनेत चोरटे अति हुशार आहेत. त्यांना माहित होतं की,तामगाव आणि सोनाळा या दोन पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त बावनबिरच्या कार्यक्रमात आहे. म्हणून त्यांनी अख्खी एटीएम मशीनच उचलून नेली…!
तामगाव तत्कालीन ठाणेदार गावंडे यांच्या कारकीर्दीत चोरट्यांनी आवाहन केलं होतं. पण आता मात्र महत्त्वाचं असलेल्या तहसील विभाग “ट्रेझरीत” झालेली चोरी ची घटना… आता पर्यंत तपास लागलं नाही परंतु हे सर्वांना चांगले प्रकारे माहित आहे.. परंतु संग्रामपूर येथे रात्री म्हणजे पहाटे दरम्यान झालेली ही मोठी चोरी असून
SBI ATM : या चोरट्यानी तर चोरी करून चक्क पोलिसांना , आवाहन केलं एवढे मात्र खरं.. वृत्त लिह पर्यंत स्थानिक घटनेची काहीच कारवाई झाली नाही. पुढच्या तपास तामगाव पोलीस करत आहे.
Journalism Award : श्री कालिका देवी मंदिर संस्था नाशिक यांच्या वतीने आयोजित पत्रकार दिनानिमित्त कैलासवासी कृष्णराव पाटील कोठावळे उत्तर महाराष्ट्र पत्रकार पुरस्कार यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वृत्तपत्र पत्रकारिताक्षेत्रातून यावल जिल्हा जळगाव येथील दैनिक देशदूतचे तालुका प्रतिनिधी अरुण पाटील यांना.
व त्यांची प्रतिनिधी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक एसटी पाटील यांनी स्वीकारला येथील जेष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा व अण्णासाहेब पाटील अध्यक्ष श्री कालिका देवी मंदिर संस्थान नाशिक यांच्या हस्ते 5 जानेवारी 24 शुक्रवार रोजी नाशिक येथील जुना आग्रा रोडवरील श्री कालिका मंदिर सभागृहात संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आला.
अरुण पाटील या कार्यक्रमाला पोचू शकणार नव्हते म्हणून त्यांनी त्यांची त्यांचे प्रतिनिधी म्हणून सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक एस टी पाटील( राहणार तरडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे हल्ली मुक्काम नाशिक )हे या पुरस्कार समारंभाला उपस्थित होते.
त्यांनी हा पुरस्कार त्यांच्या वतीने स्वीकारला अरुण पाटील यांनी गेल्या 36 वर्षात यावल तालुक्यात विविध क्षेत्रात लिखाण करून सहकार क्षेत्र तालुक्यातील कारखानदारी पतसंस्था शेतकरी शेतमजूर व जनसामान्यांच्या प्रश्नावर जे सडेतोड लिखाण केले.
आणि 36 वर्षात वस्तुनिष्ठ अशी आणि जनसामान्याचे न्याय हक्कासाठी निष्कलंकीत पत्रकारिता केली त्या निमित्ताने त्यांना उत्कृष्ट पत्रकारिता हा पुरस्कार जाहीर झाला होता तू आज या ठिकाणी प्रदान करण्यात आला
Journalism Award : अरुण पाटील यांना मिळालेल्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारा संदर्भात वृत्तपत्र क्षेत्रातून तसेच राजकीय व अराजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील त्यांच्या मित्रमंडळी परिवारांनी अभिनंदनचा वर्षाव केला आहे
Murder News: पुणे हादरलं या हत्या प्रकरणात सूत्रधार म्हणून त्याचा सहकारी साहिल पोळेकर याचे नाव समोर आले आहे. पण मात्र या हत्या करण्यापूर्वी शरद मोहोळ याच्यासोबत त्याच्या साथीदारांनी सोबत बसून जेवण केले.
मात्र त्यानंतर सर्व जण घरातून बाहेर पडले बाहेर पडतंच गोळीबार सुरु झाली.
पुणे येथे घरातून बाहेर पडताच त्यांनी शरद मोहोळ यांच्यावरचक्क गोळीबार केला. परंतु या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या सर्व प्रकरण मध्ये सीसीटीव्हीमध्ये अगदी जवळूनच शरद मोहोळ याच्यावर हल्ला केल्याचे दिसत आहेत. सदर हे आरोपींना एकूण चार गोळ्या झाडल्याचे दिसत आहे.
मात्र त्यानंतर हल्लेखोरांनी या ठिकाणावर पळ काढला. पण मात्र घरासमोर घडलेला हा प्रकार घरच्या मंडळींनी पाहिला. व त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सदर जखमी झालेल्या शरद मोहोळ याला त्वरित रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरु असताना मोहोळ याचे निधन झाले.
पुणे येथील शरद मोहोळ याच्यावरील हल्लाचे फुटेज शनिवारी समोर आले. असून ही सदर घटना पोलिसांना शुक्रवारीच हे फुटेज मिळाले होते. या फुटेजमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शरद मोहोळ याच्यासोबत असणाऱ्या त्याच्या दोन साथीदारांनी गोळीबार केल्याचे दिसत आहे.
परंतु या लोकांनी शरद मोहोळ यांच्यावर गोळ्या झाडून घटनास्थळावरुन पळ काढला. व या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन हल्लेखोर दिसत आहे. मात्र ही सर्व प्रकरण आर्थिक व्यवहारातील वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे. सदर हे घटनेचा तपास सुरू आहे.
दोन वकील असल्याचा दावा
पुणे येथील शरद मोहोळ याच्या हल्ला प्रकरणात दोन वकिलांचा सहभाग असल्याचा दावा केला जात आहे. रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशी त्यांची नावे आहेत. दोघेही शिवाजी नगर सत्र न्यायालयात प्रँक्टीस करतात.
पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांनाही इतर आरोपींसोबत रात्री अटक केली. यामुळे या प्रकरणास नाटयमय वळण मिळाले आहे.
Murder news : दरम्यान या प्रकरणात आठ आरोपींना अटक केली आहे. त्या सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सदर या प्रकरणांमध्ये पोलीस आरोपींची कोठडी मागणार आहेत. अशी माहिती सूत्र करून पुढे आले आहे.
हे आहेत आठ आरोपी
साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर(वय २०, रा. सुतारदरा, कोथरुड)
विठ्ठल किसन गडले (वय ३४, रा. सुतारदरा, कोथरुड)
अमित मारुती कानगुडे (वय २४, रा. धायरी)
नामदेव महिपत कानगुडे (३५, रा. भूगाव)
चंद्रकांत शाहु शेळके (वय २२, रा. जनता वसाहत, पर्वती),
विनायक संतोष घवाळकर (वय २०, रा. कोथरुड),
रवींद्र वसंतराव पवार (वय ४०)
संजय रामभाऊ उउ्डाण (वय ४५, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड)
ambulance accident: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या बुलढाणा अर्बन बँकेच्या गोडवूनजवळ रुग्णवाहिका व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहू ट्रकची समोरासमोर जबर धडक होऊन भीषण अपघात झाला.
या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक ठार तर तीन जण किरकोळ जखमी झाले.ही घटना शुक्रवार ५ जानेवारीला सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली.
शिरूर (पुणे) येथील रुग्णवाहिकेत बिहार येथील मृतदेह शिरूर येथून बिहार येथे पोहचवून रुग्णवाहिका क्रमांक एमएच ०४ एफके ५६२४ ने परत शिरूर कडे जात असता.
समोरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहू ट्रक क्रमांक एमएच ४० एन ८४६३ च्या चालकाने मालवाहू एसटी भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून समोरून येणाऱ्या रुग्णवाहिकेला जबर धडक दिली.
यात रुग्णवाहिकेचा चालक पियूष विकास सातकर वय ३२ राहणार शिरूर (पुणे) हा जागीच ठार झाला तर रुग्णवाहिकेमधील रामदास रवींद्र धुळे वय २३ राहणार शिरूर (पुणे) यासह तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळताच.
शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी,हेड पोलीस कॉन्स्टेबल सुरेश पांडे,संजय वाघ,कुमरे,अनिल राठोड,पोलीस कॉन्स्टेबल हरिदास सोळंके,नामदेव आडे.
ambulance accident : व सुनिल सगणेसह गजानन महाराज बहुद्देशिय संस्था अध्यक्ष आमदार हरिष पिंपळे संचालित पथकाचे अमोल खंडारे,सेनापती शेवतकर,नारू अण्णा,सुनिल लछूवाणी यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.पुढील तपास मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
Murdernews : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यात भर दिवसा दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. कारण कि या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मात्र शरद मोहोळ याच्यावर त्याच्या घराजवळच कोथरुडच्या सुतारदरा भागात 150 मीटर अंतरावर गोळ्यांचे चार राऊंड फायर करण्यात आले. व त्यांचं या गोळीबार मध्ये जागीच मृत्यू झालं.
गोळीबारानंतर मोहोळला कोथरुडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पुणे येथील शरद मोहोळ याच्यावर नेमका कुणी हल्ला केला? कारण याबाबत पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे. पुणे येथील मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
याप्रकरणी स्थानिक पोलीस मुन्ना पोळेकर आणि इतर हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. तर या सर्व गोळीबार प्रकारणी व दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद मोहोळ याच्यावर त्याच्याच साथीदाराने हल्ला केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर या हल्लं मध्ये सत्यता समोर आली.
पोळेकर-मोहोळमध्ये काय वाद झाला?
हा सर्व प्रकार जमिनीच्या वादावरून आठ दिवसांपूर्वी पोळेकर आणि शरद मोहोळ याची या प्रकरण मध्ये बाचाबाची झाली होती, व त्याच वादातून हा खून करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर सर्व मुळशी तालुक्यातील मुठा हे शरद मोहोळ याचं गाव आहे, त्याच्याच आसपास पोळेकरची जमीन आहे.
Murdernews: या सर्व जमिनीच्या खरेदी विक्रीवरून वाद सुरू होते. पण काही दिवसांपूर्वी शरद मोहोळने मुन्ना पोळेकरला बोलवून त्याला या प्रकरणात मारहाणही केली होती, त्याचाच राग धरून पोळेकरने शरद मोहोळची हत्या केली आहे, असं स्थानिक पोलीस कडून या सर्व प्रकरणी सह सांगितलं जात आहे…