Home Blog Page 141

Crimenews | रामटेक येथील एका महिलेचा विनयभंग! माना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

0

 

मुर्तीजापुर प्रतिनिधी
शाम वाळस्कर

Crimenews :मुर्तिजापूर तालुक्यातील माना येथून जवळच असलेल्या रामटेक येथील एका महिलेचा बपोरी येथील विकी गणेश ठाकरे या युवकाने विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने दिली.

मिळालेल्या माहितीनुसार रामटेक येथील महिला तिच्या घरी एकटीच असतांना पाहून बपोरी येथील विकी गणेश ठाकरे या युवकाने पीडित महिलेच्या घराजवळ जाऊन त्या महिलेला आवाज देऊन अश्लीश इशारे केले.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

 

Crimenews यावरून या महिलेने थेट माना पोलीस स्टेशन गाठून विकी गणेश ठाकरे या आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली.यावरून माना पोलिसांनी ३५४/२३ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे करीत आहेत.

विकृत चाळे करणाऱ्या इसमास गावकऱ्यांनी केलें पोलिसांच्या स्वाधिन crimenews 

0

 

पोलिसांच्या उदासीन धोरणामुळे घडली घटना.

सप्टेंबर महिन्यातील तक्रारीवर पोलिसांनी केले दुर्लक्ष…

सिंदी रेल्वे….. मागील १ महिन्यापासून आरोपी प्रितम सहारे हा शहरातील नगर विद्यालय समोर शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेवर शाळेतील विद्यार्थ्यांनीना पाहून अश्लील चाळे करायचा. या बाबतची तक्रार २ दिवस आधी शाळेचे मुख्याध्यापक हे पोलिस स्टेशन ला गेले असतां त्यांची तक्रार पोलिसांनी नोदवून घेतली नाही.

व त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र शुक्रवार सकाळीं आरोपींनी सदर चा प्रकार करताना विद्यार्थिनीच्या पालकांनी व नागरिकांनी पाहले व त्याला पकडून पोलिस स्टेशन ला नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिस स्टेशन वर जमलेला जमाव पाहून पोलिस त्वरित अँक्शन मोड वर येत. पिडीत विद्यार्थिनी कडून तक्रार घेऊन आरोपीवर भादवी कलम ३५४ अ व पोस्को कलम १२ अंतर्गत आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

याबाबत सविस्तर वृत्त असे की सदर शहरत मुलींच्या छेडखानीचे प्रकार वाढले असून याबाबत सप्टेंबर महिन्यामध्ये नागो परतेकी यांनी शहरातील नेहरू विद्यालय, नगर विद्यालय व विजय विद्यालयाच्या परिसरात टवाळखोर मुलांची वर्दळ वाढली असून शाळेच्या रस्त्याने जाता येताना मुलींना फिल्मी स्टाईलने आकर्षित करून त्यांना फसविण्याचे प्रकार सुरू असल्याची तक्रार सिंदी पोलीस स्टेशनला दिली होती.

परंतु सदर तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनच्या वतीने कोणतीही उचित कारवाई करण्यात आली नाही. दोन दिवसाआधी नगर विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने शाळेसमोर विद्यार्थिनीना पाहून हा आरोपी घाणेरडे कृत्य करत असल्याबाबतची तक्रार बुधवारी देण्यासाठी गेले असता तक्रार न घेता त्यांना हुसकावून लावले. जर वेळीच तक्रार

घेतली असती तर या सदर घटनेला आळा बसला असता.

crimenews सदर घटनेच्या वेळी जनतेचा पोलिसानं बद्दल रोष पाहायला मिळाला. सदर घटना पुन्हा घडू नये याकरता पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष देण्याची मागणी सिंदी वासियांच्या वतीने करण्यात आली आहे…

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

0

 

viral recording :बुलढाणा:अवैध व्यवसायिकांच्या विरोधातील आंदोलन तथा पीडित महिलेला मदत केली म्हणून कुख्यात गुंड गणेश परसे यांच्याकडून आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे यांना जीवे मारन्याचा कट उघडकीस आला आहे.

आज 30 डिसेंबर 2023 सांयकाळी बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालया समोर कुख्यात गुंड गणेश परसे हा त्याच्या वरली मटका अवैध व्यवसाय करणाऱ्या गुंड साथीदारांसह आला असता त्या ठिकाणी त्याने अँड सतीशचंद्र रोठे यांना जिवे मारण्याचा कट रचला.

यासह अँड रोठेंना बनावट गुन्हात अडकविण्याचा संवाद आझाद हिंद च्या कार्यकर्त्यांनी रेकॉर्ड केल्यामुळे हत्तेचा कट उघडकीस आला आहे.

हेही सविस्तर वाचा

👇👇👇👇👇👇👇👇👇

https://www.suryamarathinews.com/?p=24302

हत्येच्या कट कारस्थानाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांसह संबंधित तपास यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती अँड.रोठें दिली आहे.

viral recording  तीस वर्षापासून आझाद हिंद च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात जनहितार्थ आंदोलन उभारणारे अँड सतीशचंद्र रोठे यांच्यावर यापूर्वीही पाच वेळा प्राण घातक हल्ला झालेला आहे.

त्यातून ते सुदैवाने बचावले तर यावेळी हत्त्येचाकट उघडकीस झाल्याने अँड रोठेंच्या जीवीत्वास धोका असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Crime News विवाहितेचा विनयभंग युवका विरुद्ध गुन्हा दाखल..

0

 

प्रतिक कुऱ्हेकर सूर्या मराठी न्युज अकोला.

Crime News अकोला जिल्हातील मूर्तिजापूर :-तालुक्यात येत असलेल्या माना पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या रामटेक येथील ३० वर्षिय युवकाने विनयभंग केल्याची तक्रार रामटेक वरुन हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गावातील महिलेने माना पोलीसात दाखल केली आहे.

माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रामटेक येथील विक्की गणेश ठाकरे (३०) हा रामटेक पासून हाकेवर असलेल्या नवरंगपूर येथील शिवारात नेहमी प्रमाणे २४ डिसेंबर रोजी बकऱ्या चारण्यासाठी गेला होता, तहानेने व्याकुळ झालेल्या विक्कीने सदर महिलेला पाणी मागीतले आणि तो पाणी पिऊन निघून गेला होता.

press reporter |दैनिक प्रतिदिन वार्ता चे कार्यकारी संपादक जफर खान यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.

परंतु महिलेच्या तक्रारी नुसार आरोपी पाणी पिऊन गेल्यानंतर महिला घरकाम करीत असताना आरोपीने परत येऊन घरात अश्लील चाळे केले.

Crime News  यावरुन माना पोलीसांनी आरोपी विरुद्ध भादवी ३५४ अ, ४४८, व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मूर्तिजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे करीत आहेत.

———————-

accidentnews | ट्रक गॅस टँकरची धडक;मोठा अनर्थ टळला

0

 

मुर्तीजापुर प्रतिनिधी

शाम वाळस्कर

 

accidentnews: ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बालाजी पेट्रोलपंपासमोर गॅस टँकरला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.मात्र सुदैवाने मोठी घटना टळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर बालाजी पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी गॅस टँकरला ट्रक चालकाने जबर धडक दिली.जर या धडकेत गॅस टँकरचा स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

press reporter |दैनिक प्रतिदिन वार्ता चे कार्यकारी संपादक जफर खान यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.

या अपघाताची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखत तहसीलदार शिल्पा बोबडे,ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.

 

 

accidentnews: त्यांनी अपघाताची प्रत्यक्ष पाहणी करून गॅस टँकरमधून कोणत्याच प्रकारचा गॅसचा रिसाव होत नसल्याची खात्री करून घेतली.

Scheme money | 4 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आणखीन या 5 योजनेचे पैसे

0

 

 

महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! या वर्ष अखेरीस राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर आता वाट कशली पाहता तर सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावा.

नवीन वर्षात आपल्यासाठी पुढील 8 दिवसांत प्रत्येक शेतकऱ्याला 5 वेगवेगळ्या योजनांतर्गत 50,000 ते 60,000 रुपये मिळणार आहेत. तर ते कसे जाणून घेऊया त्यामुळे आपल्याला नवीन वर्षाचा पहिला आठवडा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूप खास असणार आहे तर त्यासाठी आपण नवीन वर्षाचे वाट पाहणार आहे.

 

तर ते कोणते पाच योजना आहेत ते जाणून घेऊया

press reporter |दैनिक प्रतिदिन वार्ता चे कार्यकारी संपादक जफर खान यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.

तर सर्व शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – 2017 मध्ये 44 लाख शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 18,762 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ झाला होता. मात्र, सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे ६.५६ लाख शेतकरी मुकले. मुख्यमंत्र्यांनी आता या उर्वरित 6.56 लाख शेतकऱ्यांनाही कर्जमाफी जाहीर केली आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हा लाभ नक्की घ्यावा.

तर सर्व शेतकरी यांनी या योजनेचा म्हणजेच पंडित दीनदयाळ उपाध्याय व्‍याज सावलत योजना – शेतक-यांनी 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज पूर्ण फेडल्‍यास 3% व्याज अनुदान मिळते. मात्र यावर्षी या योजनेसाठी 72 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

 

शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019 मध्ये, सरकारने नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. 14.31 लाख शेतकऱ्यांना 5,190 कोटी रुपयांची देयके आधीच देण्यात आली आहेत. तरी शेतकऱ्यांनी आपले उर्वरित रक्कम लवकरच जमा केली जाईल.

सर्व शेतकऱ्यांनी या वर्षाचे खरीप 2023 मध्ये 1.7 कोटी आणि रब्बीमध्ये 66 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत नावनोंदणी केली. प्रिमियमची रक्कम सरकार भरते. या योजनेचे यंदाचे बजेट ५,१७४ कोटी रुपये इतके आहे.

Scheme money | मात्र शेतकऱ्यांनी त्यामुळे थोडक्यात, नवीन वर्षाची सुरुवात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय सकारात्मकतेने होत आहे, ज्याचा थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात पोहोचणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ नक्की घ्यावा.

press reporter |दैनिक प्रतिदिन वार्ता चे कार्यकारी संपादक जफर खान यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.

0

 

 निवडी बद्दल जळगाव जामोद येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत.

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

 

जळगाव जा. दैनिक प्रतिदिन वार्ता चे कार्यकारी संपादक मा. श्री जफर खान यांनी आपल्या पत्रकारितेच्या लेखणीतून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनांची माहिती प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून प्रसिद्धीस देत असल्याबद्दल व ओबीसी बहुजन महासंघाच्या लोकहिताच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतल्याबद्दल ,

त्यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. निवडी बद्दल जळगाव जामोद येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छाने स्वागत व अभिनंदन करण्यात आले

स्वागतप्रसंगी पोलीस प्रशासनातील मान्यवर
ठाणेदार निलेश झांबरे साहेब, एपीआय पांडुरंग इंगळे साहेब, पी.एस.आय. नारायण सरकटे, पी.एस.आय. अमोल पंडित, पी.एस.आय. शशिकांत दोडके, पीएसआय रंजना आवारे, पोलीस कॉन्स्टेबल शांतीलाल धीरबस्सी, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत व्यवहारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल शेगोकार, पोलीस कॉन्स्टेबल निशिकांत कळस्कार, ए. एस. आय. निलेश पुंडे, सचिन राजपूत, मंगेश सोळंके, सैय्यद तय्यब अली, शेख इरफान, सतीश पातोळे, प्रेमसिंग पवार, अतुल मोहाळे यांची उपस्थिती होती.

शासनाची बदनामी केल्याप्रकरणी GST चे असिस्टंट कमिशनर चेतनसिंह राजपूत यांच्यावर होणार कारवाई.GST

दैनिक प्रतिदिन वार्ता चे कार्यकारी संपादक जफर खान पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून त्यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली असून मंगळवार दिनांक ०२ जानेवारी २०२४ रोजी नागपूर येथे होणाऱ्या कलावंतांच्या महामेळाव्याप्रसंगी त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल ‌ ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.राजकुमार घुले, राष्ट्रीय सचिव दर्शना घुले, राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्वेता रहागंडले ,राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख सुभाष तगाळे ,ओबीसी बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाबाराव दुपारे, उपाध्यक्ष बालाजी सुवर्णकार यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले असून.

 

 

press reporter जाफर खान यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Anand Mahindra viral Post : आनंद महिंद्रांकडे व्यक्तीची पैशांची मागणी; मजेशीर उत्तर देत म्हणाले…सर मला एक लाख रुपये द्याल का?

0

 

Anand Mahindra viral Post : उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. पण अनेकदा ते त्यांच्या फॉलोअर्ससाठी प्रेरणादायी आणि मजेशीर पोस्ट शेअर करत असतात. व त्यांच्या अनेक पोस्ट लोकांनाही खूप आवडतात.

पण अनेकदा आनंद महिंद्रा आपल्या पोस्टद्वारे लोकांना सामाजिक समस्यांची जाणीव करुन देतात, व आज तसेच जीवनासंबंधित चांगल्या गोष्टींची जाणीव करून देतात.

पण अनेकदा त्यांच्या पोस्ट ट्विटरवरही व्हायरल होतात. व आता नुकतीच अशीच आणखी एक मजेशीर घटना समोर आली आहे. तर ते कोणती पोस्ट तर पाहू या.

शासनाची बदनामी केल्याप्रकरणी GST चे असिस्टंट कमिशनर चेतनसिंह राजपूत यांच्यावर होणार कारवाई.GST

व त्याचे झाले असे की, एक्सवरील (पूर्वीचे ट्विटर) एका युजरने आनंद महिंद्रांकडे पैशांची मागणी केली होती. व ती युजरने आनंद महिंद्रांना एक ट्विट करत चक्क एक लाख रुपयांची मागणी केली आहे.

व पण, ज्या कामासाठी व्यक्तीने हे पैसे मागितले आहेत ते जाणून घेतल्यावर कोणीही म्हणेल की यासाठी धैर्य लागते. पण ही मजेशीर गोष्ट आपण जाणून घेऊया.

पण त्या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, सर, मला महिंद्राचे शेअर्स खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये हवे आहेत. तर मग काय, आनंद महिंद्रा यांनी त्याला असे काही उत्तर दिले की, जे आता सोशल मीडियावर व्हायरल हे पोस्ट खूप व्हायरल होत आहे पाहूया.

या दरम्यान @R41534672 नावाच्या एका युजरने आनंद महिंद्रांना एक्सवर टॅग केले आणि लिहिले की, सर, मला महिंद्राचे शेअर्स खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये हवे आहेत.

व यावर आनंद महिंद्रा यांनी उत्तर देत लिहिले की; काय कल्पना आहे सर, तुमच्या धाडसासाठी टाळ्या! विचारण्यात काय हरकत आहे? पण असेच पोस्ट या युजरने आनंद महिंद्रा यांना ट्विट केले आहे.

आता ही पोस्ट खूप चर्चेत आहे तर आता हे पोस्ट खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तर ज्यावर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

एका युजरने लिहिले की, काय आत्मविश्वास आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, सांगू शकत नाही कोण कोणत्या मूडमध्ये असेल आणि तो सहमत झालाच तर.

Anand Mahindra viral Post : अशाप्रकारे अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. तर या पोस्टमुळे हाय गुजर खूप चर्चेत राहिला आहे या पोस्टमुळे आनंद महिंद्रा यांनी प्रत्युत्तर दिले.

ayushman bharat card |डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवार तर्फे मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिर,७५६ लाभार्थ्यांनी घेतला लाभ

0

 

यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे

ayushman bharat card  : यावल येथील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आई हॉस्पिटलच्या शेजारी डॉ. कुंदन सुधाकर फेगडे मित्र परिवारातर्फे नागरिकांकरिता मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात यावल शहर व तालुक्यातील तब्बल ७५६ नागरिकांनी आप आपली नोंदणी केली व त्यांना मोफत कार्ड वितरण करण्यात आले.

यावल शहरात भुसावळ रस्त्यावर आई हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या शेजारी डॉ. कुंदन सुधाकर फेगडे मित्र परिवाराकडून मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी व कार्ड वितरण शिबीर आयोजीत करण्यात आले होते.

शासनाची बदनामी केल्याप्रकरणी GST चे असिस्टंट कमिशनर चेतनसिंह राजपूत यांच्यावर होणार कारवाई.GST

यात यावल शहर व तालुक्यातील मोठ्या संख्येत नागरिकांनी उपस्थिती देऊन आपापली नाव नोंदवली आणि तब्बल ७५६ नागरिकांना या ठिकाणी मोफत आयुष्यमान भारत कार्ड ची नोंदणी करून कार्ड बनवून वितरण करण्यात आले. सदर शिबिरात भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, डॉ.कुंदन फेगडे, युवा शहराध्यक्ष रितेश बारी, परिष नाईक, सागर लोहार, मनोज बारी आदींची उपस्थिती होती.

ayushman bharat card :  सकाळ पासुन या शिबीरात नोंदणी करीता नागरीकांनी गर्दी केली होती तर आलेल्या नागरी

Crime News | नवरी जोमात, तर नवरा कोमात! चक्क लग्नाच्या 5 दिवसा नंतर सासरच्यांना बेशुद्ध करुन नवरीने दागिने, पैसे घेऊन..

0

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक )

Crimenews | गोंडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तर येथे एका नवविवाहितेने सासरच्या मंडळींना नशा आणणारा पदार्थ देऊन चक्क बेशुद्ध केलं. व त्यानंतर नवरीने सर्व सोने दागिने सह पळून गेली होती.

सासरची मंडळी नंतर शुद्धीवर आल्यावर जेणे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. व त्यांनी तत्काळ पोलिसांत जाउन संपूर्ण प्रकरनाची माहिती दिली. व तक्रार दाखल केली.

सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार, खरगुपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पांडेपुरवा बेदौरा मार्केटमध्ये ही घटना घडली आहे, व जिथे 5 दिवसांपूर्वी एक लग्न झाल्यानंतर एक नववधू घरात प्रवेश केल.

शासनाची बदनामी केल्याप्रकरणी GST चे असिस्टंट कमिशनर चेतनसिंह राजपूत यांच्यावर होणार कारवाई.GST

व तिने सासरच्या लोकांच्या जेवणात नशा आणणारा पदार्थ मिसळून परिवार ला बेशुद्ध केलं व त्या नंतर सर्व सोने चांदी व इतर सामान घेऊन पळ काढला.

व या घटनेत वधूला तिच्या कुटुंबीयांनी आणि एका मैत्रिणीने मदत केल्याचं दावा व सहकार्य म्हटलं जात आहे.

या तक्रारीनंतर पोलिसांनी आपलं शोध मोहीम सुरू केला असता आरोपी वधूला पकडण्यात यश आलं. परंतु तिच्यासह चार जणांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. व या चोरीचा मालही जप्त करण्यात आला आहे.

व संपूर्ण पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली आहे. व चौकशीत जे सत्य बाहेर आले आहे. ते पाहून तर आपलीच पायाखाली जमीन सरकते.

 

या प्रकरणी अतिरिक्त पोलिस अधीक्षक राधे श्याम राय यांनी सांगितलं की, ब्रृजभूषण पांडेचं लखीमपूर येथील एका तरुणीसोबत 17 डिसेंबर रोजी लग्न झालं होतं. व 22 डिसेंबरच्या रात्री नववधूने जेवणात काही पदार्थ मिसळून सासरच्या मंडळींना बेशुद्ध केलं.

व त्यानंतर तिने घरातील सर्व सामान घेऊन पळ काढला. व या घटनेपूर्वी वधूसोबत चार जण सोबत आले होते.

तर पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून ताबडतोब तपास सुरू केला आहे. व या तपासासाठी तीन पथकं तयार करण्यात आली. पोलिसांना त्यानंतर यश मिळालं.

Crime News नववधू आणि तिच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली. या चौकशी दरम्यान नववधू आणि तिचे साथीदार जहर खुरानच्या टोळीतील सदस्य असल्याचे उघड झालं. पुढील तपास पोलीस करत आहे. Crime News