Home Blog Page 142

Shegaon News लासुरा गावात भक्तिमय वातावरणात वारकरी संप्रदायाचा अखंड हरिनाम सप्ताह तर मारुती मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा थाटात

0

 

 

बुलढाणा जिल्हाप्रतिनिधी इस्माईल

सविस्तर असे कि शेगाव तालुक्यातील ग्राम लासुरा बुद्रुक येथे हनुमान मंदिराचे नूतनीकरणाचे काम चालू होते, ते काम गावकऱ्याच्या सात संयोगाने संपूर्ण पूर्ण झाले असून त्या मंदिरामध्ये मूर्ती स्थापना कलश 21 डिसेंबर रोजी स्थापन करण्यात आले त्यानिमित्त मंदिर प्रशासनाने अखंड हरिनाम सप्ताह चालू केला आहे,

तरी विशेष असे कि, या कार्यक्रमांमध्ये महिला व तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन उत्साहात एकरूप झालेला गावकऱ्यांना दिसून येत असल्यामुळे संपूर्ण गावांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे,

असेच जर प्रत्येक गावातील तरुण वर्गाने इतर गोष्टीकडे लक्ष न देता अध्यात्माकडे जर पाऊल टाकले तर निश्चितच प्रत्येक गावामध्ये संताच्या अपेक्षा प्रमाणे भविष्यामध्ये सुजन शील समाज निर्माण होईल, यात काही शंका नाही.

शासनाची बदनामी केल्याप्रकरणी GST चे असिस्टंट कमिशनर चेतनसिंह राजपूत यांच्यावर होणार कारवाई.GST

या कथेचे वाचक हरिभक्त परायण श्री शिवाजी महाराज मानकर यांच्या अमृततुल्य वाणीतून चालू आहे, ही कथा श्रवणासाठी पंचक्रोशीतील नागरिक व महिला बहुसंख्येने उपस्थित राहुन कथा श्रावणाचा आस्वाद घेतात.

या कथेची सांगता 28 डिसेंबरला होत आहे. अशी माहिती मारुती संस्थानचे विश्वस्त मंडळांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.

Shegaon News लासुरा गाव डुबले भक्ती सागरात,औचित्य मारुती मंदिरामध्ये मूर्ती स्थापनेचे.    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थांचे विश्वस्त मंडळ व गावकरी परिश्रम घेत आहेत.

Buldhana News निमगांव वायाळ येथील रेती विरोधात बसलेल्या उपोषणास छावा जिल्हाध्यक्ष यांची भेट

0

 

जिल्हातील महसुल अधिकारी बिहार मध्ये आहे का छावा जिल्हाध्यक्ष

बुलढाणा सुरेश हुसे

बुलढाणा जिल्ह्यातील निमगाव वायाळ येथील रेती घाटातून शासन निर्णयाला ठेकेदार व महसूल अधिकारी यांनी पायदळी तुडविण्याचा प्रयत्न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई साठी निमगाव वायाळ ग्रामपंचायत सदस्य आज ता 25 डिसेबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली.

 

आज छावा जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव,गोविंदराव टेके,बाळासाहेब शेळके, संजय उगले, बजरंग काळे,शंकर शिंदे यांच्यासह ईतर कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपोषणकर्ते यांनी निमगांव वायाळ घाटासबंधी उपस्थित माहिती दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष यांनी तहसिलदार यांच्याशी भ्रमणध्वनी वर संपर्क साधुन उपोषणकर्ते मागण्या संदर्भात चर्चा केली असता.

मी आज उपोषण स्थळी भेट देतो असे सांगीतले यानंतर छावासंघटनेने रेती घाटाची पाहणी केली यावेळी जेसीबी व विना नंबर गाड्या चालकांनी रेती घाटातून पलायन केले.

शासनाची बदनामी केल्याप्रकरणी GST चे असिस्टंट कमिशनर चेतनसिंह राजपूत यांच्यावर होणार कारवाई.GST

यावेळी निमगांव वायाळ ग्रामस्थांनी छावा संघटनेकडे सदर रेतीघाटातील ठेकेदारांनी या रेतीघाटातून नियमापेक्षा जास्त रेती चे उत्खनन केले असल्याने सदर रेतीघाट तात्काळ बंद करण्याची विनंती केली असल्याने छावा जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव पाटील यांनी गावकरी मंडळी यांना सांगितले.

की आपला जिल्हा का बिहार आहे का तुमचे सहकार्य असल्यास सदर रेती घाट 24तासात बंद करून दाखवू असे ग्रामस्थांना विश्वास दिला

छावा चा काँल अन तहसिलदाराची हजेरी

 

उपोषण स्थळावरून जिल्हाध्यक्ष यांनी तहसिलदार यांच्याशी संपर्क साधला असता सायंकाळी 5:45वाजता तहसिलदार सचिन जयस्वाल यांनी भेट दिली.

Buldhana News रात्री किनगाव राजा चे ठाणेदार दत्तात्रय वाघमारे व त्यांच्या टिमने भेट दिली

Fraud Loan Apps :- फेसबूक, इन्स्टाग्राम, गूगलला दणका;मोदी सरकारचा “सात दिवसांच्या नंतर.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक 

भारतात फ्रॉड लोन अ‍ॅप्सचं (कर्ज देण्याच्या नावाखाली लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करणारे अ‍ॅप्स) आपला जाळं पसरू लागलं आहे. तर या देशभरात लोन अ‍ॅप्सच्या माध्यमातून दररोज शेकडो लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. तरी या माध्यमातून लोकांचा मानसिक छळ झाल्याच्या अनेक प्रकार,घटना घडल्या आहेत.

व या सर्व अशा घटनांची वाढती संख्या लक्षात घेता मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

या देशभरात सक्रीय असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना (समाज माध्यमांना) इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने कठोर आदेश दिले आहेत.

या देशात आयटी मंत्रालयाने मंगळवारी सर्व कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही फ्रॉड लोन अ‍ॅप्सची जाहिरात दाखवू नका असे सुद्धा आदेश दिले आहेत.

शासनाची बदनामी केल्याप्रकरणी GST चे असिस्टंट कमिशनर चेतनसिंह राजपूत यांच्यावर होणार कारवाई.GST

कारण एखाद्या ठिकाणी घोटाळा झाला, तर फसवणुकीचं प्रकरण समोर आलं तर संबंधित फ्रॉड अ‍ॅपसह त्या अ‍ॅपची जाहिरात प्रसिद्ध करणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही तेवढेच जबाबदार असणार आहे, असं आयटी मंत्रालयाने म्हटलं आहे.

तर या पुढच्या सात दिवसांच्या आत यासंबंधीची कार्यवाही करा, असे आदेश माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने मेटा कंपनीच्या फेसबूक, इन्स्टाग्राम आणि गुगलसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सना आदेश दिले आहेत. fraud-loan-apps

तर या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व प्रकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून अशा प्रकारच्या जाहिराती हटवण्यासाठी सरकार माहिती तंत्रज्ञान (आयटी) नियमांमध्ये सुधारणा करण्यावर काम करत आहे. तर त्यानंतर या कंपन्या कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकणार नाहीत असे सक्त आदेश दिले आहे.

या दरम्यान, केंद्र सरकारने या जाहिरातींसंदर्भात काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. व या मध्यस्थ किंवा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सने कर्ज आणि सट्टेबाजीशी (लोन आणि बेटिंग) या संबंधित कोणत्याही जाहिरातींना परवानगी देऊ नये. व या जाहिरातींच्या माध्यमातून नागरिकांची, सोशल मीडिया वापरकर्त्यांची फसवणूक केली जाते.

fraud-loan-apps तसेच त्यामुळे अशी प्रकरणं समोर आली तर त्यास हे मध्यस्थ, जाहिरातदार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पूर्णपणे जबाबदार असतील. असे आदेश मोदी सरकार यांनी सर्व प्लॅटफॉर्म यांना दिले आहे.

स्वअध्ययन हे शिक्षकांना अधिक सक्षम बनविते – गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यावल तालुका प्रशिक्षणास सुरुवात Yaval News 

0

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

शिक्षण प्रणालीतील मुलभूत सुधारणेच्या केंद्रस्थानी शिक्षक असणे आवश्यक आहे.

नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपल्या समाजातील सर्वात आदरणीय आणि आवश्यक सदस्य म्हणून या प्रशिक्षणातून शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत करण्यात मदत झाली पाहिजे. कारण ते आपल्या पुढच्या पिढीतील नागरिकांना खरोखरच आकार देतील.

शिक्षकांना सक्षम बनविण्यासाठी आणि शक्य तितक्या प्रभावीपणे त्यांचे कार्य करण्यास त्यांना मदत करणे आवश्यक आहे.

शासनाची बदनामी केल्याप्रकरणी GST चे असिस्टंट कमिशनर चेतनसिंह राजपूत यांच्यावर होणार कारवाई.GST

तरच ते विद्यार्थ्यांमध्ये अधिक गतीने शिकण्याची प्रेरणा निर्माण करू शकतील असे मार्गदर्शन यावल तालुका गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी सुरु असलेल्या प्रशिक्षणादरम्यान केले .

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन तालुका स्तरीय प्रशिक्षण दिनांक २६ ला शहरातील साने गुरुजी विद्यालयात सुरुवात करण्यात आली.

सदर प्रशिक्षणाचा हा तिसरा टप्पा असून तालुक्यातील माध्यमिक व जिल्हा परिषद या शाळांमधून २४० शिक्षक शिक्षिका यांनी सहभाग नोंदवला आहे.

सदर प्रशिक्षण हे दि २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर असे पाच दिवस सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. यामध्ये उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना दोन वेळा चहा एकवेळ जेवण ही दिले जात आहे.

दरम्यान विविध सांघिक खेळ ही घेण्यात येत असल्याने मनोरंजन होत आहे.

या सर्व प्रशिक्षणार्थी यांना यावल तालुका गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या मार्गदर्शनाखाली सुलभक म्हणून रविंद्र पाटील, योगेश इंगळे, राहुल पाटील, कुंदन वायकोळे , विजय बाउसकर , किशोर चौधरी , वसंत सोनवणे , गिरीश सपकाळे , संदीप मांडवकर हे मार्गदर्शन करीत आहे. तर प्रशिक्षणाचे सनियंत्रण किनगाव केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ प्रमोद सोनार हे करीत आहे. Yaval News

शासनाची बदनामी केल्याप्रकरणी GST चे असिस्टंट कमिशनर चेतनसिंह राजपूत यांच्यावर होणार कारवाई.GST

0

 

GST प्रकरणात सत्ताधारी भाजप आमदार एड आकाश फुंडकर यांची उडी….

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याकडे करणार कारवाईची मागणी आमदार एड आकाश कुंडकर यांची माहिती…

GST कर कमी करण्यासाठी लाच देणाऱ्या मलकपूरच्या व्यापाऱ्यांला अँटी करप्शन विभागाच्या ताब्यात दिल्यानंतर दाळ व्यापाऱ्यांना वाचवण्यासाठी जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकारी काम करीत आहे,

बुलढाणा जिल्हा राज्यकर उपायुक्त मारोतराव राठोड यांच्यानंतर त्यांच्या जागी प्रवीण भोपळे यांना भ्रष्टाचार दाबण्यासाठी वरिष्ठांनी पदभार दिल्याचा धक्कादायक आरोप GST चे असिस्टंट कमिशनर चेतनसिंह राजपूत यांनी केला आहे.

खामगाव स्थानिक.विश्राम भवन येथे.एम.आय.एम.पार्टी.ची जिल्हाआढावा बैठक संपन्न M.I.M

GST  दरम्यान शासनाची बदनामी करण्याचा नैतिक अधिकार चेतनसिंह राजपूत यांना नसून राजपूत यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मांगणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती भाजप आमदार एड आकाश फुंडकर यांनी दिली आहे..

खामगाव स्थानिक.विश्राम भवन येथे.एम.आय.एम.पार्टी.ची जिल्हाआढावा बैठक संपन्न M.I.M

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

खामगांव :-  M.I.M  एम.आय.एम पार्टीची जिल्हा आढावा बैठक दि. २५/१२/२०२३ रोजी स्थानिक विश्राम भवन, खामगाव येथे संपन्न झाली, ही बैठक महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी यांच्या आदेशानुसार घेण्यात आली.

या बैठकीत संपुर्ण जिल्ह्यातील शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष या कामकाजाचा आढावा बैठकीत हजर होते. निवडणुकीचे वारे असल्या कारणाने विदर्भाच्या दौ-यावर महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी यांचा भव्य सत्कार दि. १७/१२/२०२३ रोजी खामगाव एमआयएमच्या वतीने करण्यात आला होता.

( Crimenews )37 वर्षीय विवाहितेचा विनयभंग, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यातील विदर्भ दौ-यासंदर्भात आदेश दिले होते. या आढावा बैठकीला विदर्भ अध्यक्ष शाहीर रंगूनवाला यांनी संबोधले. सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना त्यांनी कसे पक्ष कार्यकर्ते वाढवायचे? शाखा कशी स्थापन करायची? हैदराबाद मध्ये ७ सीट कशा निवडून आणल्या? व त्यासाठी कसे काम केले ? याबाबत त्यांनी सांगितले,

महाराष्ट्र महासचिव अब्दुल नाजीम यांनी म्हटले की, पार्टीत इमाते इतबारे काम करणाऱ्यांना स्थान राहील व पार्टीचे काम न करणा-यांची हकालपट्टी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

M.I.M यावेळी एमआयएम पार्टीचे बुलडाणा जिल्ह्याचे दोन्ही दानीश शेख व डॉ. मुबीन खान यांची भाषणे झाली. यावेळी संचालन अॅड. रियाजउद्दीन कादरी व खामगाव तालुकाध्यक्ष रफीक अरब यांनी केले.

तर आभार प्रदर्शन खामगाव शहर अध्यक्ष आरिफ पहेलवान यांनी केले.

सिंदी रेल्वेला तालुक्याचा दर्जा द्या. अन्यथा जनआंदोलनाचा इशारा Railway

0

 

सिंदी रेल्वे… Railway सिंदी रेल्वेला तालुक्याचा दर्जा प्राप्त व्हावा याकरता वीस वर्षाआधी माजी आमदार राजू तिमांडे यांच्यावतीने शासन दरबारी प्रयत्न करण्यात आले होते त्यानंतर सुधीर मुनगंटीवार जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आमदार समीर कुणावर यांच्यावतीने तालुका निर्मितीची मागणी करण्यात आली.

( Crimenews )37 वर्षीय विवाहितेचा विनयभंग, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

व ती शासन दरबारी पोहचविण्यात आली होती. परंतु शासनाचे नवीन तालुका निर्मितीचे धोरण नसल्याने सदरची मागणी थंडबस्त्यात होती त्यांना हिवाळी अधिवेशनात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात पुढील काळात नवीन तालुका निर्मिती करण्यास असल्याचे सभागृहात जाहीर केल्याने शहरात तालुका निर्मितीची मागणी जोर पकडली.

सिंदी रेल्वेला तालुक्याचा दर्जा द्या

असून त्याकरता गावकऱ्यांच्या वतीने सर्व पक्षीय तालुका निर्मिती संघर्ष समितीची रविवारी झालेल्या बैठकीत बोलवीण्यात बोलावून शहर तालुका समितीची स्थापना करण्यात आली

 

असून या समितीच्या माध्यमातून आधी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्री पालकमंत्री आमदार खासदार व जिल्हाधिकारी यांना तालुका निर्मितीचे निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.

सदर निवेदनावर कुठली सकारात्मक कार्यवाही न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचे सदर संघर्ष समितीच्या वतीने ठरविण्यात आले असून या समितीच्या कार्यकारी सदस्यकांमध्ये अमोल सोनटक्के, अँड.पंकज झाडे, किशोर सोनटक्के, ओमप्रकाश राठी, प्रकाशचंद्र डफ, गंगाधर कलोडे, सचिन लांबट, नीलकंठ घवघवे, आशिष देवतळे,

अमोल गवळी, तुषार हिंगणेकर,नरेंद्र सूरकर, मनोज तिमांडे, धीरज लेंडे, सागर भगत,किशोर प.सोनटक्के, मोहम्मद इकबाल इब्राहिम,अशोक चि. कलोडे गजानन खंडाळे,गुल्लू भंसाली, गजू शिंदे, दत्ता कोपरकर,मोहम्मद इम्रान, महेंद्र ढोक, सुनील शेंडे, जगदीश बोरकर, फिरोज बेरा,सुमित तळवेकर,गौरव कलोडे, स्नेहल कलोडे,राहूल कलोडे, रवि मुदंडा,महेश बेलखोडे, तेजस सोनटक्के,

अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

बबलु खान, प्रशांत कलोडे, रवि राणा,रवि वाघमारे, राजु गंधारे, संदीप खेडकर, देवेंद्र झाडेमनोज पेटकर, हेमंत सोनटक्के, दामु शेंडेसमिर कोपरकर,पंकज बावणे,

प्रकाश सिरसे,
गुडू कुरेशी, वसंता सिरसे,सुधाकर खेडकर, अशोकबाबु कलोडे, रामभाऊ सोनटक्के,सुनिल हिंगे, प्रदीप सोनटक्के आदी कार्यकारणी सदस्य हजर होते… Railway

( Crimenews )37 वर्षीय विवाहितेचा विनयभंग, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

0

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: एका 37 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी भूत बंगला परिसरात राहणाऱ्या आरोपी विरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार एका 37 वर्षीय विवाहितेने शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली.

आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

की मी 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजे दरम्यान माझ्या मुलाला ट्युशन वर घेऊन जात असताना आरोपी जुनेद रहमतुल्ला खान वय 33 वर्षे राहणार भूत बंगला परिसर याने आप हमसे मोहब्बत करे या ना करे हम आपसे मोहब्बत करेंगे असे म्हणून 37 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केला.

सदर प्रकार विवाहितेने तिच्या पतीला सांगितल्यावर पिडितेचा पती आरोपीला समजावण्यासाठी गेला असता आरोपी जुनेद रहमतुल्ला खान याने पिडितेच्या पतीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

( Crimenews )37 वर्षीय विवाहितेचा विनयभंग,

या तक्रारीवरून आरोपी जुनेद रहमतुल्ला खान वय 33 वर्षे राहणार भूत बंगला परिसर शेगाव विरुद्धअप न 648/23कलम 354 ड,504.506 भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crimenews याबाबत अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीसपोनी इंगोले साहेब पोस्टे शेगाव शहर हे करीत आहेत

Gold-Silver6 : सोने खरेदीदारांना पुन्हा झटका, सोने-चांदी झाले आता महाग

0

Gold-Silver Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत रुपये ६३,२९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६३,१२० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. परंतु बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७५,६४० रुपये प्रति किलोने विकली जाते व या किमती मध्ये वाढ दिसत आहे.

सोने-चांदी झाले आता महाग

या मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,४५० रुपये प्रतिकिलो होती. परंतु या उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारत भर बदलतात परंतु या किमतीमध्ये ग्राहकांचे मोठे होताना दिसत आहे.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, आता मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत

प्रति १० ग्रॅम ५७,९१५ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६३,१८० प्रति १० ग्रॅम आहे. व पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,९१५ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,१८० रुपये असेल. विदर्भातील नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,९१५ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,१८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,९१५ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,१८० रुपये इतके आहे.

सोने खरेदीदारांना पुन्हा झटका

आपण जर सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. तर आजच अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधू शकतात.

सोन्याची शुद्धता आपण आता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या आपण माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची व चांदीची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो.

Gold-Silver वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. पण या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळून जात आहे.

नाद करायचा नाय! इतर कंपन्यांची आता झोप उडणार, पुढल्या वर्षी येतात ‘या’ ४ स्वस्त कार; cars

0

पुढच्या वर्षी म्हणजेच सन २०२४ पर्यंत भारतीय वाहन बाजारात अनेक नवीन कार्स लाँच होणार आहेत. अनेक कंपन्यांनी त्यासाठी जोरदार तयारीही सुरू केली आहे. या नवीन वर्षात हॅचबॅक, एसयूव्ही आणि या इलेक्ट्रिक कार्स मोठ्या प्रमाणात लवकरच लाँच होतील.

आता झोप उडणार, पुढल्या वर्षी येतात ‘या’ ४ स्वस्त कार; कार्स

भारतीय बाजारात २०२४ मध्ये एकापेक्षा एक उत्तम कार्स सादर केल्या जाणार आहेत. तर या कारची किमतही दहा लाख रुपयांपेक्षा ही कमी पण आता असं असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जर तुम्ही देखील नवीन कार घेण्याचा आताच विचार करत असाल तर नक्की या खालील पर्यायापैकी तुम्ही एक पर्याय आताच निवडू शकता.

नाद करायचा नाय! इतर कंपन्यांची आता झोप उडणार

Kia जानेवारी २०२४ मध्ये आपन सोनट फेसलिफ्ट सादर करेल. व त्याचे बुकिंग सुरू झाले आहे तर आताच आपण पण वाटपाहू नका या छोट्या एसयूव्हीच्या किमती जानेवारीमध्ये जाहीर केल्या जातील. पण त्या परंतु, त्याची किंमत सुमारे ८ लाख रुपयांपासून पुढे सुरू होण्याची शक्यता आहे. या तथापि, मिड-लेव्हल आणि हाय-स्पेक व्हेरियंटची किंमत १० लाख रुपयांच्या वर असेल. पण त्यात एडीएएस लेव्हल-१ सह बरेच काही फिवचर असणार आहे.

मारुती सुझुकी नवीन वर्षात म्हणजे २०२४ च्या पहिल्या तिमाहीत नवीन जनरेशन स्विफ्ट हॅचबॅक देशात लाँच करेल. हे सुधारित HEARTECT प्लॅटफॉर्मवर आधारित असू शकते. नवीन मॉडेलमध्ये काही डिझाइन बदल आणि सर्व-नवीन इंटीरियर आपण मिळू शकते, जे मारुती सुझुकी स्विफ्ट आणि बलेनो द्वारे प्रेरित असू शकते. मग त्याची सुरुवातीची किंमत ६.५ लाख ते ७ लाख रुपये असू शकनार पण जर आपन विचार करत असाल तर आताच बुकिंग करू सकता.

या केवळ नवीन स्विफ्टच नाही तर मारुती सुझुकी आपली नवीन जनरेशन डिझायर सब-४ मीटर सेडान लाँच करण्याच्या तयारीत आहे.

या नवीन वर्षात २०२४ च्या मध्यापर्यंत ते विक्रीसाठी बाजार मध्ये उपलब्ध केले जाण्याची शक्यता आहे. तर या नवीन मारुती डिझायर नवीन पिढीच्या स्विफ्ट हॅचबॅकसोबत डिझाइनमधील नक्की काही बदल आणि इंटीरियर शेअर करू शकते. व त्याची सुरुवातीची किंमत देखील ६.५ लाख ते ७ लाख रुपये पर्यंत असणार .

टाटा अल्ट्रोझ फेसलिफ्ट

Cars टाटा मोटर्स नवीन म्हणजे पुढील वर्षी २०२४ मध्ये Altroz ​​हॅचबॅक फेसलिफ्ट सादर करू शकते. नवीन मॉडेलमध्ये ताज्या इंटिरियरसह नवीन टाटा कारपासून प्रेरणा घेऊन डिझाइन बदल असू शकतात. यात मोठी १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळण्याची अपेक्षा आहे. तर या नवीन वर्षात सुरुवातीची किंमत देखील १० लाख रुपयांच्या आत असणार या साठी आपण बुकिंग करुंन हक्काची कार घायचं स्वप्न पूर्ण होईल.cars