Home Blog Page 148

जळगांव जामोद ठाणेदार यांना सकल धनगर समाजाचे निवेदन

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात चराई बंदी करणेबाबत
बुलढाणा जिल्ह्यातील सह्या करणार समस्त धनगर समाज बांधव विनंतीपूर्वक निवेदन देतो की आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक मेंढपाळ असून बुरहानपुर मध्य प्रदेश मधून येणारे मेंढपाळ मेंढी चारण्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये येतात व ईथला चारा संपूर्ण उद्ध्वस्त करून समोर निघून जातात त्यामुळे आम्हा स्थानिक मेंढपाळांना चराईसाठी वन वन भटकावे लागत आहे

यासह परंप्रातातून येणाऱ्या मेंढपाळांच्या जनावरांच्या पासून विविध रोगाची लागन सुद्धा होत आहे सध्या हिवाळा व पुढे उन्हाळा असल्याने आम्हास मेंढ्यांसाठी चराई जमीन उपलब्ध असणे आवश्यक आहे परंतु परप्रांतीतून येणारे मेंढपाळामुळे आमच्या जनावरांना कोणतेही चराईक्षेत्र शिल्लक राहत नाही परिणामी जनावरांचे उपासमारी होऊन कित्येकदा शेकडो जनावरे दगावत आहे.

त्यामुळे येत्या दहा दिवसात प्रशासनाने या परंप्रातीय मेंढपाळांना आपल्या हद्दीतील काढून द्यावे अन्यथा आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मेंढपाळ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू त्यानंतर होणाऱ्या परिणामास शासन व प्रशासन हेच एकमेव जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन जळगाव जामोद पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले

असून निवेदनावर सुभाष मस्के नंदू भाऊ लवगे शिवदास सोनोने सोनाजी डोमाळे गंगाराम कोकरे राजू कोकरे नाना कोकरे
भाऊराव मांगोजी खरात राजू मल्हारी डोमाळे श्याम राजिराम कोकरे महादेव खरात बंसी डोमाळे सोनाजी डोमाळे गजानन डोमाळे सोनाजी मदने गंगाराम डोमाळे बाळकृष्ण खरात राजू डोमाळे तानाजी मोरे अंबर डोमाळे बंडू झिंटे बोंहर कारंडे हनुमान डोमाळे तानू मारकळ महादेव पोकळे सदाशिव डोमाळ यांच्या सह बहुसंख्येने घनगर समाज बांधव उपस्थित होते news

राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या प्रदेश अध्यक्षपदी.ऍड.ज्योतीताई ढोकणे यांची नियुक्ती OBC 

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

जळगाव (जामोद):दि.८ बुलढाणा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष तथा काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी ,माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड.ज्योतीताई ढोकणे यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महिला प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव तायवाडे, राष्ट्रीय महिला महासंघाच्या अध्यक्षा सुषमाताई भड यांनी दिनांक ३ डिसेंबर रोजी नागपूर येथे राष्ट्रीय महिला अधिवेशनामध्ये ऍड.ज्योतिताई ढोकणे यांच्या नावाची घोषणा केली. ह्यापूर्वी प्रदेश अध्यक्ष असलेल्या सौ.कल्पनाताई मानकर यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.

ऍड.ज्योतीताई ढोकणे ह्या गत तीन दशकापासून सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय आहेत. तालुक्यातील अग्रगण्य अशा क्रांतीज्योती महिला पतसंस्थेच्या त्या बऱ्याच काळापासून अध्यक्ष सुद्धा आहेत.

राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये सुद्धा गेल्या पाच वर्षापासून सक्रिय आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महिला विभागाचे संघटन अधिक मजबूत होईल, असा आशावाद यावेळी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ OBC

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, मुलगी ४ महिन्याची गर्भवती crimenews 

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव तुझे सोबत लग्न करतो असे म्हणून
अरबाजखान अबीउल्लाखान रा. पिंपळगावराजा जि. बुलढाणा या युवकाने शेगांव येथील १६ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याने ती ४ महिन्याची गर्भवती असल्याची बाब दि.१८ डिसेंबर रोजी उघडकीस आली .

हकीकत अश्या प्रकारे आहे की अरबाजखान अबीउल्लाखान रा. पिंपळगावराजा तामगाव जि. बुलढाणा या आरोपीने फिर्यादीस तुझ्या सोबत लग्नकरतो असे म्हणुन फिर्यादीस जबरदस्तीने मोटारसायकलवर नेवून फिर्यादी हीचे वर दि.८/१२/२०२३ पूर्वी वारवार शारीरीक संबंध केले असुन फिर्यादीची खाजगी रूग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता.

https://www.suryamarathinews.com/crimenews-19/

फि ही चार महिन्याची गर्भवती असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगीतले असता मुलीच्या तोंडी रिपोर्ट फिर्यादी वरून शहर पोलिसांनी आरोपी
अरबाजखान अबीउल्लाखान रा. पिंपळगावराजा तामगाव जि. बुलढाणा याचे विरुद्ध अप नं ६०५ /२३, कलम ३७६, ३७६ (२) (n) सह कलम ३,४ पोक्सो अधिनीयम सन २०१२ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास मा पो नि सा यांचे आदेशने पोउपनि सविता कुवारे यांच्या कडे देण्यात आला आहे.crimenews

५० हजार रू साठी विवाहितेचा शाररिक व मानसिक छळ, पतीसह सासरच्या ७ जनांवर गुन्हे दाखल crimenews 

0

 

इस्माईलशेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव माहेरवरुन ५० हजार रुपये घेवुनये या कारनावरुन पतीसह सासरच्या क्र १ ते ७ लोकांनी विवाहितेचा मानसिक व शारीरीक छळ केल्याची घटना दिनांक ७/४//२०१९ ते दिनांक १९/६/२०२३ दरम्यान तेल्हारा तालुक्यातील ग्राम बेलखेड येथे घडली.

हकिकत अशा प्रकारे आहे की मा.पोअधि बुलडाणा यांचे कार्यालयात चौकशीअंती दि.७/१२/२०२३ रोजी शेगांव शहर पो.स्टे ला प्राप्त पत्रावरील आदेशा अन्वये शेगांव येथील माहेर असलेल्या विवाहितेस माहेरवरुन पैशे घेवुन ये.

या कारनावरुन मो.असलम मो.साबीर (पती)वय ३० वर्षे धंदा – मोटार मेकनीकल , २). साबीर शे महेबुब वय ६५ वर्षे (सासरे )धंदा शेती,, ३) जैबुन्निसा मो साबीर वय ५७ वर्ष ( सासु ) धंदा कटलरी दुकान ,,४)मो. आसिफ मो साबीर वय ४२ वर्ष (जेठ) धंदा शेती, ५)मो.अफसर मो साबीर वय ३५ वर्ष (जेठ) धंदा शेती, ६) शकीलाबानो मो आसिफ (जेठाणी) वय ४१ वर्ष धंदा घरकाम ,७)शहनाजबानो मो अफसर (जेठाणी )वय ३० वर्षे धंदा

घरकाम सर्व रा.बेलखेड ता.तेल्हारा जि.अकोला हे मानसिक व शारीरीक त्रास देवून संग्नमत करुन फि हीस मारहान करत शिवीगाळ करुन जिवाने मारुन टाकन्याची धमकी देत माहेरवरून ५० हजार रु घेवुन ये असे म्हणत होते या प्रकरणी विवाहित महिलेच्या रिपोर्ट वरून उपरोक्त सासर कडील ७ जनांवर शहर पोलिसांनी अप.नं ६०४ /२०२३ कलम ४९८ अ,३२३,५०४,५०६,३४ भादंवि अन्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास मा.पो.नी सा यांचे आदेशाने नापोका निलेश गाडगे यांचेकडे देण्यात आला आहे.

crimenews

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, मुलगी ४ महिन्याची गर्भवती crimenews 

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव तुझे सोबत लग्न करतो असे म्हणून
अरबाजखान अबीउल्लाखान रा. पिंपळगावराजा जि. बुलढाणा या युवकाने शेगांव येथील १६ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याने ती ४ महिन्याची गर्भवती असल्याची बाब दि.१८ डिसेंबर रोजी उघडकीस आली .

हकीकत अश्या प्रकारे आहे की अरबाजखान अबीउल्लाखान रा. पिंपळगावराजा तामगाव जि. बुलढाणा या आरोपीने फिर्यादीस तुझ्या सोबत लग्नकरतो असे म्हणुन फिर्यादीस जबरदस्तीने मोटारसायकलवर नेवून फिर्यादी हीचे वर दि.८/१२/२०२३ पूर्वी वारवार शारीरीक संबंध केले असुन फिर्यादीची खाजगी रूग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता फि ही चार महिन्याची गर्भवती असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगीतले असता मुलीच्या तोंडी रिपोर्ट फिर्यादी वरून शहर पोलिसांनी आरोपी

अरबाजखान अबीउल्लाखान रा. पिंपळगावराजा तामगाव जि. बुलढाणा याचे विरुद्ध अप नं ६०५ /२३, कलम ३७६, ३७६ (२) (n) सह कलम ३,४ पोक्सो अधिनीयम सन २०१२ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास मा पो नि सा यांचे आदेशने पोउपनि सविता कुवारे यांच्या कडे देण्यात आला आहे.लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, मुलगी ४ महिन्याची गर्भवती crimenews

शेख रफिक यांची उदयनगर (उंद्री) काँग्रेस शहराध्यक्षपदी निवड..congress

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (उंद्री) उदयनगर शहर कांग्रेस अध्यक्षपदी क्रियाशील कांग्रेस कार्यकर्ते शेख रफिक यांची निवड करण्यात आली आहे . चिखली येथे पार पडलेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली.

यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विष्णू काका पाटील ,उदयनगर गावचे लोकनियुक्त सरपंच तथा चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनोज लाहुडकर, चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष समाधान सुपेकर चिखली तालुका युवक काँग्रेस सचिव इल्यास भाई ,सोराब सय्यद ,माजी सरपंच भाई प्रदीप अंभोरे उदयनगर ग्रामपंचायत सदस्य नदीम अन्सारी उदयनगर काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बुडन भाई काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर निवडीनंतर शेख रफिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की भाऊंनी माझ्यावर उदयनगर शहर काँगेस कमिटीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली ती मी समर्थपणे पार पडणार काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण पक्षाची विचारधारा समजाच्या शेवटच्या माणसापर्यंत नेण्याचा काम मी करेन congress

१४ डिसेंबर पासून ग्रामसेवक संघटना जाणार बेमुदत संपावर जुनी पेन्शन योजनेसाठी

0

 

यावल ( प्रतिनिधी) विकी वानखेडे

राज्य सरकारचे सर्व शासकीय कर्मचारी,निमशासकीय,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांसाठीची नविन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी यासह विविध न्यायिक मागण्यांसाठी दि.१४ डिसेंबर २३ गुरुवार पासुन बेमुदत संपावर जात असुन या संपास यावल तालुका ग्रामसेवक संघटना सहभागी होणार असल्याबाबतचे निवेदन ग्रामसेवक संघटनेच्या वतीने नुकतेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.

यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राज्य शासनाच्या अंतर्गत प्रशासकीय सेवा बजावणाऱ्या शासकीय,निमशासकीय,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांना शासनाने लागू केलेली नविन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागु करावी यासह विविध न्यायिक मागण्यांसाठी येत्या १४ डिसेंबर गुरुवार रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार असल्याचा निर्णय नुकताच संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे.

https://www.suryamarathinews.com/crimenews-17/

सदरहू या संपात मध्यवर्ती जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांनी पुकारलेल्या संपात यावल तालुका ग्रामसेवक संघटना सहभागी होणार असल्याबाबतचे निवेदन काल दि.८ डिसेंबर शुक्रवार रोजी यावल पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर निळे व कार्यालय अधिक्षक जि.एम.रिंधे यांना देण्यात आले.

यावेळी तालुका ग्रामसेवक संघटनेचे सचिव लक्ष्मीकांत महाजन,उपाध्यक्ष रविंद्र बाविस्कर,मानद अध्यक्ष शिवाजी सोनवणे,जिल्हा उपाध्यक्ष दिपक तायडे,ग्रामसेवक पतपेढी पारोळाचे संचालक भाईदास पारधी,मानद सचिव राजु तडवी,तालुका कार्याध्यक्ष डी.डी.पाटील,वरिष्ठ सहाय्यक पि.आर.चौधरी, पगारदार नोकरांच्या पतपेढीचे व्हाईस चेअरमन पी.व्ही.तळेले,संघटनेच्या महीला संघटक सुषमा कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. Gramsevak sanghatna

चोरीच्या सात दुचाकीसह आरोपी पती-पत्नीला मलकापूर पोलिसांनी केली अटक..crimenews

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

मलकापूर पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून केलेल्या कारवाईत चोरीच्या सात मोटरसायकलीसह संशयित आरोपी पती-पत्नीला ताब्यात घेऊन अटक केली.

याबाबत मलकापूर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 05/12/2023 रोजी सुधार रामचंद्र मंडवाले वय 61 वर्ष रा. शास्त्री नगर मलकापुर ता मलकापुर जि. बुलढाणा यांनी दिलेल्या रिपोर्ट वरुन मलकापूर पोलिसांनी पोस्टे अप क्र 612/2023 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदर गुन्हयातील पोलीस विभागाकडून तपास सुरू असताना पोलिसांना खात्रीशीर व गुप्त माहीती मिळाली की, सदर गुन्हयातील मोसा घेवुन एक इसम व त्यांचे पत्नी मोसा चोरी करुन घेवुन जात आहे अशी माहीती मिळाल्याने मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून इसमांचा शोध घेवुन त्यास मोसा सह पकडण्यात आले व त्याचे कडुन काही बनारवट नंबर प्लेट व पाना पेनचिस मिळुन आल्याने त्यास पोस्टे मलकापुर शहर येथे आणले व विचापुस केली.

असता त्याने त्याचे नाव श्रीकांत अजबराव आवरे वय 36 वर्ष व त्याचे पत्नीचे नाव सौ. सोनु श्रीकांत आवरे वय 26 वर्ष दोन्ही रा. जवाहर नगर अकोला असे सांगितले त्यांना पोलिसी खाक्याने विचारपुस केली असता त्यांनी शेगाव येथुन 03 मोसा व खामगांव येथुन 01 मोसा व मलकापुर येथुन 03 मोसा असे एकुण 07 मोसा चोरी केल्याचे कबुल केले. मलकापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्यांचे कडुन 07 मोसा किमत. अं 3,50,000/- जप्त करण्यात आले आहे.

तसेच आणखी मोसा जप्त करणे बाकी असुन पुढील तपास पोलीस स्टेशन मलकापुर शहर येथील सपोनि. के.पी. तायडे व डिबी पथक करीत आहेत.

https://www.suryamarathinews.com/buldhananews-3/

पोस्टे हददीत मोसा चोरीचे प्रमाण वाढल्याने मा. सुनिल कडासने सा. पोलीस अधिक्षक बुलढाणा, मा. अशोक थोरात सा, अपर पोलीस अधिक्षक सा. खामगांव, मा. देवराम गवळी सा. उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापुर व पोलीस निरीक्षक विलास पाटील पो.स्टे मलकापुर शहर यांच्या सुचना मार्गदर्शनाखाली डि.बी पथकाचे सपोनि करुणाशील तायडे, पोकॉ/311 आसिफ शेख, पोका/2312 ईश्वर वाघ, पोकॉ/994 प्रमोद राठोड पोका./2732 प्रविण गवई पोका./1013 संतोष कुमावत, पोकॉ/25 गोपाल तारुळकर यांनी सदर कारवाई यशस्वीरित्या पार पाडली crimenews

गांधी चौक परिसरात अनोळखी वृद्ध इसमाचे प्रेत आढळले.. ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन.. Crimenews 

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: येथील गांधी चौक परिसरामध्ये ओम दूध डेअरी जवळ अनोळखी 70 ते 72 वर्ष वयाच्या वृद्ध इसमाचे प्रेत आढळून आले.. सदर प्रत्येकाची ओळख पटविण्याचे आवाहन शेगाव शहर पोलीसाकडून करण्यात आले आहे..

https://www.suryamarathinews.com/buldhananews-3/
याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार भिक्षा मागून ओम दूध डेअरी जवळ सहा डिसेंबर रोजी रात्री झोपलेला वृद्ध इसम सात डिसेंबरच्या सकाळी उठलाच नाही याबाबत शहर पोलीस स्टेशनला सूचित करण्यात आल्यानंतर पोलिसांनी सदर घटनास्थळी जाऊन वृद्ध इसमाची पाहणी केली.

असता तो मृत असल्याचे आढळून आले याबाबत शहर पोलीस स्टेशन मध्ये मार्ग दाखल करून याबाबतचा अधिक तपास Crimenews

पँथर सेना शोले स्टाईल ने पाण्याच्या टाकीवर प्रशासनाची तारंबळ

0

 

अनिलसिंग चव्हाण ( सूर्या मराठी न्यूज )

बुलढाणा: रखडलेल्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ व तातडीने काम सुरू करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया पँथर सेनेतर्फे आज ‘शोले आंदोलन करण्यात आले. पदाधिकारी वकाना ( ता संग्रामपूर) येथील पाणी पुरवठा योजनेच्या टाकीवर चढल्याने प्रशासनासह तालुक्यात खळबळ उडाली.

मागील तीनेक वर्षापासुन रखडलेल्या चांगेफळ ते रूधाना, वकाना, खामगाव रस्त्याचे काम करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, जिल्हा निरीक्षक विजय वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली गावकरी आंदोलनात सहभागी झाले.

तालुक्यातील चांगेफळ ते रूधाना वकाना खामगाव रस्त्याचे काम मागील दोन तीन वर्षापुर्वी मंजूर होवुन त्याचे काम देखील सुरू झाले होते. आजपर्यंत या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

येथे क्लिक करून पहावे

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Crimenews /खामगाव तालुक्यातील रोहना येथे गोळीबार, एक जण ठार दोन जण गंभीर…

अपघातांची मालिका सुरू असून शेकडो वाहनधारकांना जीव मुठीत घेवुन प्रवास करावा लागत आहे. वाहन धारकासह ग्रामस्थ त्रस्त झाले आहे.buldhana news