Home Blog Page 64

खळवाडी येथे आपला दवाखाना सुरू करावा नागेश्वर पाटेकर(shegaonnews)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव

shegaonnews:ए.बी.एस.क्रांती फोर्स संघटनेने मुख्याधिकारी साहेब नगर परिषद शेगांव यांना निवेदन देऊन केली मागणी त्या वेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नागेश्वर पाटेकर यांनी प्रचार प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नावाने आपला दवाखाना शेगांव शहरातील विविध ठिकाणी सुरू करण्यात आला.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी.(Hingnghat)

असून सर्व वैधकिय सुविधा पोहोचवल्या जात आहे त्या अनुषंगाने रामदेव बाबा नगर चे अकोट रोड खळवाडी येथे पुनर्वसन झाले आहे गाव बाहेर हे पुनर्वसन असून पुनरवशी त्यांना शहरात दवाखान्यासाठी येणे कठीण होत आहे.

त्यासाठी आपला दवाखाना या योजनेचा लाभ खळवाडी पुनर्वसीत यांना मिळावा यासाठी आपण ही योजना त्वरित खळवाडी परिसरात राबवावी व आपला दवाखाना या ठिकाणी सुरू करण्यात यावा.

shegaonnews:खळवाडी परिसरात दलित मुस्लिम व इतर मागासवर्गीय नागरिक असून 300 ते 350 सदनिकांमध्ये 1500 ते 2000 नागरिक वास्तव्य करत आहेत तरी या पुनर्वशीत नागरिकांना आपला दवाखाना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्या ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात यावा व पुनर्वशीत नागरिकांना न्याय द्यावा…

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी.(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट :-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या वतीने मा. मुख्य निवडणूक आयुक्त , महाराष्ट्र राज्य -मुंबई. यांना उपविभागीय अधिकारी ,उपविभागीय कार्यालय हिंगणघाट यांच्यामार्फत उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे तथा तालुकाप्रमुख सतीश धोबे माजी नगरसेवक मनीष देवढे यांच्या नेतृत्वात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुका ह्या ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याकरिता निवेदन देण्यात आले.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

सविस्तर असे की, महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये मोठया प्रमाणात ईव्हीएम मशीन द्वारे घोळ करण्यात आला .बऱ्याच ठिकाणी प्रत्यक्षात मतदान झालेले व मशीन मध्ये यामध्ये तफावत दिसून येत आहे.

तसेच जनतेला या निकालाबद्दल संशय निर्माण झाला आहे .बरेच जण यावर न्यायालयात सुद्धा गेले. तरी काही राजकीय पक्ष या विरोधात आंदोलन करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते डाॅ.श्री. आढाव साहेब यांनी या विरुद्ध आंदोलन छेडले. त्याचप्रमाणे शिवसेना हिंगणघाट च्या वतीने मा. मुख्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांना मा. उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांच्यामार्फत असे निवेदन करण्यात आले की, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुका ह्या ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात. तसेच झालेल्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट या मशीन मधून निघणारे प्रत ची संपूर्ण मशीनची मोजणी करावी. यासाठी निवेदन देण्यात आले.

Hingnghat :निवेदन देण्याकरिता उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाने, गजानन काटवले, अनंता गलांडे शंकर मोहम्मारे, फिरोज खान, नईम शेख ,नितीन वैद्य, अतिक बेग, प्रशांत सुपारे,प्रशांत कांबळे, नरेश तांमगाडगे, विवेक भोयर, नरेंद्र गुळकरी, अमोल वादाफळे, घनश्याम वाघमारे, गणेश कुमरे, अनिल कावडकर, पंकज ठाकरे, संजय खोंडे, निशिकांत नगोसे, सतीश लोणारे, संजय कर्डिले, विशाल माथनकर, भास्कर भिसे, दिनेश दुबे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी गोर-गरीबांच्या कल्याणासाठी आपणच मुख्यमंत्री व्हाल : आनंद गोसकी (devendrafadnvis)

0

 

devendrafadnvis:सोलापूर : देशाचं लक्ष वेधलेल्या महाराष्ट्र राज्याच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर येथील देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय तसेच रुग्णसेवक आनंद गोसकी यांनी मुंबईत सागर निवासस्थानी राज्याचे भावी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन सोलापूरचे टाॅवेल व देवेंद्र फडणवीस यांचं फ्रेम देऊन सत्कार करून अभिनंदन केले.

आपला मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षांचा व उपमुख्यमंत्री अडीच वर्षांचा कार्यकाळ संपूर्ण राज्याने जवळून पाहिला आहे. आपल्या नेतृत्वात महाराष्ट्राने विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

आपल्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात ही अनेक कामे करण्याची संधी मिळेल व आणखीन ताकदीने काम करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना
आनंद गोसकी यांनी म्हटले.

केवळ देवेंद्रजींच्या नावाने अनेकांची कधीच न होणारे कामे वा प्रश्न सहजगत्या निकाली निघाल्याचे आनंद गोसकी यांचा स्वानुभव आहे.

त्याच बरोबर, उपमुख्यमंत्री कार्यालयातून ही खुप सहकार्य मिळाल्याचे गोसकी यांनाही पदोपदी अनुभवास आले.

devendrafadnvis:देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी अनेक गोरगरीबांचे आर्शिवाद आहेत. ते राज्याच्या मुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्राच्या नव निर्मितीचा संकल्प सिद्धीस गेल्याशिवाय राहणार नाही, असंही आनंद गोसकी यांनी त्या भेटीत म्हटले.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

0

 

प्रतिनिधी गुड्डू कुरेशी

Samirkunavar:मध्यप्रदेश मधिल मैहर येथिल पर्वतावरील माँ शारदा देवी च्या दरबारात वर्धा जिल्हा भाजपा चे माजी जिल्हा उपाध्यक्ष राजू गंधारे यांच्यासह भाजपच्या 4 कार्यकर्त्यांनी हजेरी लाऊन हिंगणघाट -समुद्रपूर -सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार श्री. समिरभाऊ कुणावार यांना महाराष्ट्र सरकार मध्ये मंत्रीमंडळात स्थान मिळावे यासाठी साकडं घातलं.

… यावेळी राजू गंधारे यांचे सोबत भाजपा चे आदिवासी मोर्चाचे जिल्हा महामंत्री माजी नगरसेवक सुधाकर वलके, बूथ उपप्रमुख राकेश श्रीवास, युवा मोर्चा चे विपीन पेटकर व चेतन श्रीवास सहभागी होते.

Samirkunavar :मैहर येथिल माँ शारदा देवी च्या कृपेनें आमदार समिरभाऊ कुणावार यांना महाराष्ट्र सरकार च्या मंत्रिमंडळात स्थान मिळेलच असा विश्वास राजू गंधारे यांनी व्यक्त केला आहे.

शेगाव रेल्वे स्टेशनवर लिफ्ट सुविधा सुरू: प्रवाशांसाठी आनंदाची वार्ता (relvenews)

0

 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव

relvenews:शेगाव – शेगाव रेल्वे स्टेशनवर लिफ्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, यामुळे स्थानकावरील प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

या सुविधेच्या उद्घाटनाचे वैशिष्ट्य म्हणजे, लिफ्टचे उद्घाटन रेल्वे विभागातील दिव्यांग कर्मचारी गणेश बेलोकर यांच्या हस्ते करण्याचा निर्णय शेगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक मोहन देशपांडे यांनी घेतला, जो अत्यंत कौतुकास्पद ठरला. त्यांच्या या निर्णयाने उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी वर्गाने त्यांचे अभिनंदन केले.

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

लिफ्टच्या उद्घाटन सोहळ्यात रेल्वे स्टेशनचे ट्रॅफिक इन्चार्ज पी.एम. पुंडकर, स्टेशनचे एसएसई (इलेक्ट्रिकल) शुभम डाखोडे, डेप्युटी एसएस राजेश देशपांडे, सिटीआय एन.आर. कराळे, जॉन्सन लिफ्ट कंपनीचे एमडी बाला ,शेगाव रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार विवेकानंद राळेभात, भिका

बनकर, रमेश उबाळे,राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा, विदर्भ प्रदेशाध्यक्ष मनीषा टाकसाळ, शेगाव तालुका अध्यक्ष प्रीती तिवारी, मलकापूर तालुका अध्यक्ष वैशाली जोशी, परतवाडा तालुका अध्यक्ष रुपाली डांगे ,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार व्यास, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जवाहरलाल थानवी आदी मान्यवर उपस्थित होते

relvenews:या लिफ्ट सुविधेमुळे प्रामुख्याने वृद्ध, दिव्यांग, महिलांसह सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्टेशनवर असलेल्या विविध प्लॅटफॉर्म्सवर जाण्यासाठी ही लिफ्ट अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

शेगाव रेल्वे स्थानकावर संविधान दिन साजरा(relvenews)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव

relvenews:आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी शेगाव रेल्वे स्थानकावर संविधान दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम शेगाव रेल्वे स्टेशनचे प्रभारी प्रबंधक डि.पी. मोहरीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. संविधान दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, प्रवासी, आणि मान्यवरांनी भारतीय संविधानाच्या महत्त्वाबाबत विचारमंथन केले.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. आरपीएफ पोलीस स्टेशनचे पीएसआय डॉ. विजय साळवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

त्यांनी भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी उलगडून सांगितली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय संविधान तयार करण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांनी सर्वधर्म समभाव आणि सामाजिक समतेच्या तत्त्वावर संविधानाची रचना केली. त्यामुळेच दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

डॉ. साळवे पुढे म्हणाले की, संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले आहेत. जात, धर्म, वंश, लिंग या कोणत्याही आधारावर भेदभाव केला जाऊ शकत नाही. संविधानाने दिलेल्या अधिकारांबरोबरच प्रत्येक नागरिकाने आपली कर्तव्ये पाळणेही महत्त्वाचे आहे.

या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबत कर्तव्यांचे पालन करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाला शेगाव रेल्वे स्थानकाचे प्रभारी प्रबंधक डी.पी. मोहरीर, डीपीटीएसएम राजेश देशपांडे, आरपीएफचे एएसआय राजपूत आणि भटकर, मिताली देशमुख, मुख्य आरोग्य निरीक्षक कुणाल निकम, रेल्वे कर्मचारी भिका बनकर, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार व्यास, स्वच्छता विभागाचे श्रीराम उबाळे यांसह अनेक मान्यवर आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

relvenews:कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन आरपीएफचे पीएसआय डॉ. विजय साळवे यांनी केले. संविधान दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे भारतीय संविधानाची महती आणि नागरिकांचे अधिकार व कर्तव्य याबाबत उपस्थितांमध्ये जागरूकता निर्माण झाली.

मध्य रेल्वेचे महाप्रबंधक मीना यांचे शेगाव रेल्वे स्थानकावर स्वागत ,(relvenews)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव

relvenews:शेगाव, 26 नोव्हेंबर – मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक मीना साहेब यांचे विशेष रेल्वेगाडीतून शेगाव रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर सोमवार 25 नोव्हेंबर च्या रात्री आठ वाजे दरम्यान आगमन झाले.

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

त्यांचे स्वागत स्थानक प्रबंधक पीएम पुंडकर, डि पी मोहरीर साहेब, तसेच अन्य रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्साहाने केले. या आगमनावेळी भुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएम यती पांडे मॅडम यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

महाप्रबंधकांच्या या भेटीच्या प्रसंगी शेगाव रेल्वे स्थानकाचे मुख्य आरोग्य निरीक्षक कुणाल निकम , शेगाव रेल्वे स्टेशन सल्लागार मंडळ सदस्य अॅडव्होकेट पुरुषोत्तम डांगरा, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार

relvenews:व्यास, प्रदेशाध्यक्ष जवाहरलाल थानवी तसेच राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा,विदर्भ प्रदेशाध्यक्ष मनीषा टाकसाळ, शेगाव तालुका अध्यक्षा प्रीती तिवारी, मलकापूर तालुका अध्यक्षा वैशाली जोशी आणि अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते. याशिवाय आरपीएफ अधिकारी व रेल्वे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

शालेय कराटे स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिर ची विद्यार्थीनी राज्यस्तरावर.(buldhana)

0

 

जावेद शहा बुलढाणा

Buldhana :शा.प्र. दि. 25 नोव्हेंबर राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा, द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट रायपुर येथील 9 विद्यार्थ्यांचा चमू यवतमाळ येथे झालेल्या विभागीय शालेय कराटे स्पर्धेत सहभागी झाला होता.

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

यात 5 मुली व 3 मुले असे एकुण 9 खेळाडू सहभागी झाले होते. यात एका विद्यार्थिनीने विजय मिळवत तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यात 19 वर्षे वयोगटात सृष्टी किरण मोरे हिने चमकदार कामगिरी करत विजय मिळवला. या विजयाबरोबरच तिची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर शिवानी खंडागळे, साक्षी सोळंके, दिशा सुरडकर, पायल चिकटे, देवयानी सिरसाट, सोहम लोखंडे, शिंगणे व प्रेम ठाकूर यांना द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले.

Buldhana:या विजयाबद्दल संस्था अध्यक्ष मा संदीप दादा शेळके व शाळेचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्यां मुलीचे अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तर या विजयासाठी शाळेचे क्रिडा प्रशिक्षक भुषण सिरसाट यांनी मेहनत घेतली.

जळगाव (जामोद) मतदारसंघ रोजगाराभिमुख बनविणार !व सर्वांगीण विकास करणार :-डॉ संजय कुटे(sanjaykute)

0

 

sanjaykute:संग्रामपूर(अनिलसिंग चव्हाण )ः- गेल्या काही वर्षांपासून ह्या मतदारसंघाचा मी विकास करण्याचा प्रयत्न केला. आणि विकासही केला. परंतु सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न मोठा आ वासून उभा आहे.

राज्यात महायुतीने केलेली लोककल्याणकारी विकास कामे आणि लाडकी बहीण सारख्या अनेक जनहिताच्या योजनांना पंतप्रधान यांनी पाठिंबा दिला असल्यानेच महायुतीच्या उमेदवारांना मतदारांनी भरभरून मतदान करून विजयी केले. याचा मी ऋणी आहे.

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

येत्या पाच वर्षात जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघात विविध उद्योग उभारुन बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न करू.

जळगाव (जामोद) मतदारसंघ रोजगाराभिमुख बनविणार !व सर्वांगीण विकास करणार :-डॉ संजय कुटे(sanjaykute)

sanjaykute:तसेच शिक्षण, आरोग्य’ सिंचन, रस्ते विकास व नवीन इमारती आदींचा सर्वांगीण विकास करून हा मतदार संघ एक मॉडेल म्हणून केला जाईल. असे मनोगत आ.डाॕ.संजय कुटे यांनी विजयी झाल्या नंतर मतदार समोर केले.

विजयी मिरवणूकीवर निशानपुरा येथे टिपू सुलतान चौकात दगदफेक(crimenews)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

crimenews:हिंगणघाट :- हिंगणघाट विधानसभेच्या निकालानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी काढलेल्या विजयी मिरवणुकीला अडथळा निर्माण करीत पत्थरबाजी करुन काही युवकांना जखमी केल्याची घटना काल शनिवारी रात्री नऊ वाजताचे दरम्यान शहरातील निशाणपुरा वार्ड येथे टिपू सुलतान चौकात घडली.

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

जखमी युवकांमध्ये भाजपा कार्यकर्ता वैभव रमेश हिवंज(३३) याचेसह २ कार्यकर्ते गंभीर जखमी झाले तर विजयी मिरवणूक बघणारी एक महिलासुध्दा जखमी झाली असून तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले असल्याची माहिती मिळाली.

दोन गटात मोठा वाद निर्माण झाल्यावर याची माहिती पोलिसांना देण्यात आली, पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून कारवाई करीत स्थिती नियंत्रणात आणली.
रात्री उशिरापर्यंत भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर एकत्र येऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
याप्रकरणी पोलिसांनी ईमराण, शोयब उर्फ बुट्री, हाशीम, भुऱ्या, शाहरुख, वसीम,
४ युवकांना रात्रीच ताब्यात घेतले असून पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा विजयी मिरवणूकिवर तसेच कार्यकर्त्यांवर झालेल्या घटनेची आ. कुणावार यांनी दखल घेऊन पोलिसांना दोषींवर योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

crimenews:या घटनेचे शहरात सर्वत्र पडसाद उमटले असून पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहरात भेट दिली.