Home Blog Page 121

कारंजा शहरात होते R K ब्रांड गुटख्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी ( rkgutkha )

0

 

 

अक्रम रेघीवाले कारंजा तालुका प्रतिनिधी

 

कारंजा शहराला ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जात होते, काही वर्षांपूर्वी शासनाने गुटखा, सुगंधीत तंबाखू वर बंदी घातली आहे,

गुटखाबंदीचा आदेश हा केवळ कागदापुरताच र्मयादित राहिला आहे की काय असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे, कारंजा शहरामध्ये सर्रास शासनाने राज्यात गुटखा बंदी केली आहे.

मात्र, कारंजासह जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची सर्रास विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणत्याच प्रकारची कार्यवाही होत नसल्याचे अवैध गुटखा विक्रीवरून दिसून येते.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

कारंजा हे तस्करीचे प्रमुख केंद्र मानल्या जात आहे. हा गुटखा दुचाकी आणि चार चाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, तस्करी करणारे वाहन हे कारंजा पर्यंतच येते. तेथून जिल्हाभर गुटख्याचे वितरण होत आहे.

त्यामुळे गुटख्याची छुप्या विक्रीही अव्वाच्या सव्या भावाने होत आहे. यावर आता निर्बंध कोण घालणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

गुटखा विक्रेत्यांवरील कार्यवाही हि फक्त चिल्लर विक्री करणाऱ्या वरच होत आहे का? म्हणजे मी मारल्यासारखे करतो तु रडल्यासारखे कर अशी काहीशी स्थिती येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांची झाली असल्याची चर्चा आहे.

कारंजाचे तत्कालीन तहसिलदार धिरज मांजरे यांनी एक मोहीम हाती घेऊन कारंजा शहरातील लाखो रुपयाच्या गुटखा गोदामावर धाडी टाकुन मोठ मोठे गोडावुन सिल केले होते,

चॅनेल व्हाटसप ग्रुप आताच जॉईन्ड करा 

त्यावेळी फीरोज नावाच्या व्यक्तीवर ही कार्यवाही करण्यात आली होती, तेव्हा पासुन आज पर्यंत गेल्या एक वर्षात अवैध गुटखा विक्री करणार्या मुख्य तस्करावर कार्यवाही केल्याचे दिसत नाही,

rkgutkha: ज्या कारंजा शहरात लाखो रुपयाचा गुटखा जप्त केला जावु शकते तर आज ही जागो जागी गुटखा सहज मिळते तर मग कार्यवाही का होत नाही असा प्रश्न सामान्य नागरीक विचारत आहे

इमोशनल जोडीदाराला सांभाळण्याची झक्कास ट्रिक, नक्कीच वाढेल नात्यातील गोडवा (Love )

0

 

प्रेमाची नाती ही खरेच खूप हळवी असतात .या नात्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि आपुलकी असेल तर ती निभावणे खूप सोपे असते. रिलेशन मध्ये दोन्ही व्यक्तींचा स्वभाव एकसारखा असेल तर मात्र फारसा फरक पडत नाही.

परंतु दोघांपैकी एकजण इमोशनल असेल तर मग मात्र काहीशा अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या कोणत्या गोष्टीमुळे आपला जोडीदार दुखावला जाईल याची भीती वाटते.

काही वेळा तर खूप नाजूक परिस्थिती अशा कपल्स मध्ये पाहायला मिळते. यासाठी आम्ही तुम्हांला नात्यातील काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा नेहमी टिकून राहील.

समजूतदारपणा खूप महत्वाचा आहे.
स्वभावाने इमोशनल असलेल्या व्यक्तीला समजून घेणे खूप गरजेचे असते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांना राग येवू शकतो.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

यावेळी त्यांना खूप जास्त समजून घेणे गरजेचे असते.बरेचदा आपला जोडीदार सारखा इमोशनल होतो म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो व त्यामुळेच नेमके वादाला फाटे फुटतात.

त्यासाठी अशा वेळी आपल्या जोडीदाराला अजिबात एकटे पडू देवू नका. त्यांच्या भावनांचा अपमान करू नका. प्रत्येक गोष्ट त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करा.

प्रेमाने जोडीदाराचे मन जिंकावे.
प्रेम ही अशी गोष्ट आहे,ज्यामुळे सगळं जिंकता येते.त्यामुळे तुमचा जोडीदार इमोशनल असेल तर त्याला वेळोवेळी आपले प्रेम शेअर करत जा. त्याला गिफ्ट देत जा, कधीतरी एखादे सरप्राईज देत जा.

आपल्यासाठी ती व्यक्ती किती महत्वाची आहे,हे त्याला पटवून देत जा.कारण इमोशनल व्यक्तीला फक्त प्रेमाची गरज असते,ते मिळाले की त्या व्यक्तीचा मूड सांभाळणे खूप सोपं असते.
आपल्या जोडीदाराची बाजू समजून घ्या.

जेव्हा आपला जोदार खूप हळवा होतो,तेव्हा त्याला राग आलेला असतो. यावेळी त्याला ज्या गोष्टीचा राग आलेला असेल, ती गोष्ट त्याला नीट समजून सांगा.बहुतेकदा आपल्याला नको असलेल्या गोष्टी कराव्या लागतात.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Love: एखाद्या वेळेला काही गोष्टी हळव्या करून जातात. मग खूप रडू येते आणि खूप बेचैन वाटू लागते. अशावेळी आपल्या जोडीदाराजवळ बसा त्याची मनस्थिती सांभाळा

वंचित बहुजन आघाडी जळगाव जा.विधानसभा नेते डॉ.प्रवीण पाटील साहेब यांची शेगांव शहरातील भीम नगर मिलिंद नगर परिसरात सदिच्छा भेट drpravinpatil

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव.धम्मसेवा गायन पार्टी सर्व कलावंत यांना भेटण्यासाठी तथा निवृत्त भारतीय सैनिक नायक राजेश शंकर शेगोकार यांचा निवृत्ती सन्मान करण्यासाठी युवा शहराध्यक्ष यांच्या विनंती वरून डॉ.प्रवीण पाटील साहेब परिसरात आले.

होते.यावेळी वंचित चे जेष्ठ नेते दादारावजी शेगोकार,जेष्ठ नेते राजेंद्र शेगोकार,जेष्ठ नेते गजानन शेगोकार,युवा शहराध्यक्ष संदेश शेगोकार,क्षितिज निर्वाण, जेष्ठ कलावंत हिम्मत

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

 

शेगोकार,भारसाकळे विजय शेगोकार,अमोल मास शेगोकार,पवन शेगोकार,अभिजित शेगोकार,राज सर शेगोकार,अनमोल शेगोकार,जयकांत सावळे,आनंदा

drpravinpatil:तायडे,शुभम शेगोकार,सचिन शेगोकार,विकास वानखडे, प्रकाश शेगोकार तथा असंख्य कार्यकर्ते व युवक उपस्थित होते.

आमदार गायकवाड म्हणतात, मिरवणुकीत युवकास मारहाणीचा पश्चाताप नाहीच, ती तर भूषणावह बाब! म्हणाले, ‘तो’ दात प्लॅस्टिकचा…MLA sanjaygaikwad )

0

 

बुलढाणा: शिवजयंती मिरवणुकीत आपण ‘त्या’ युवकास केलेल्या मारहाणीचा, आपणास अजिबात पश्चाताप नसून उलट ती भूषणावह बाब असल्याचे प्रतिपादन आमदार संजय गायकवाड यांनी केले.

आज शनिवारी आपल्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या’ भरगच्च’ पत्र परिषदेत आमदारांनी या मारहाणीचे ठासून समर्थन करतानाच त्याची कारणमीमांसा केली. बुलढाण्यात गांजा पिऊन मिरवणुकीत माता भगिनीवर चाकूने हल्ले करणारे एक टोळके कार्यरत आहे.

यंदाच्या मिरवणुकीपूर्वी आपण पोलिसांना याची कल्पना दिली होती. मात्र पस्तीस हजराचा मिरवणुकीत पोलिसांना त्यांचा लवकर ‘ट्रेस’ लागला नाही. जयस्तंभ चौकात एक महिला व तिच्या मुलीने याची आपणास माहिती दिली. ‘ते’ चाकूने हल्ला करण्याचा बेतात असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतली.

त्यातील एकाने माझे अंगरक्षक योगेश मुळे यांना खाली पाडले.त्यामुळे मी त्यांच्या हातातील लाठी घेऊन त्या युवकाला मारहाण केली. मात्र मताबहिणीच्या रक्षणासाठी केलेली ती कृती होती, नव्हे तर जयंती समिती अध्यक्ष व आमदार म्हणून ते माझे कर्तव्यच होते.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

यामुळे उपद्रवी युवकास केलेल्या मारहाणीचा मला अजिबात

पश्चाताप नसून उलट माझ्यासाठी ती भूषणावह आहे. यापुढे ही कोणी सार्वजनिक कार्यक्रमात कुणी असा उपद्रव केला तर आपण ‘कारवाई’ करणारच असे ते ठासून म्हणाले.

वाघ दंत अन जमीन ताबा

बातमी पाहण्यासाठी एकच क्लिक करा 

जयंती दिनी मी केलेल्या वक्तव्यावरून वन विभागाने गुन्हा दाखल केला, माझ्या गळ्यातील कथित वाघ दंत जप्त केला. मात्र तो दात प्लास्टिक चा असल्याचा दावा करून प्रथमदर्शनी तसे आढळून आल्याचे आमदारांनी स्पष्ट केले.मोताळा तालुक्यातील जमीन ताबा प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले.

MLA sanjaygaikwad:ते ‘क्रॅश’ करण्यासाठी आपण लवकरच ‘हायकोर्टा’त जाणार असल्याची माहितीही आमदारांनी दिली. त्या जमिनीचा वाद फिर्यादी उपाध्याय व चौबे यांच्यातील आहे, माझा त्याच्याशी काही संबंध नसल्याचा खुलासा त्यांनी केला.

कारंजा तहसील परिसरात भरदिवसा चाकुने हल्ला ( murdernews )

0

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी मोहम्मद बेग मिर्झा

कारंजा तहसील कार्यालयासमोर कारकून म्हणून कार्य करणारे कारंजा तालुक्यातील ग्राम मेहा येथील रहिवासी मेश्राम वाईंडर यांच्या वर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून प्राण घातक हल्ला केला होता.

दरम्यान वैद्यकीय तपासणीनंतर मेश्राम यांना मृत घोषित करण्यात आले आहे,याबाबत कारंजा शहर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून प्राप्त झालेल्या तक्रारीवरून अवघ्या पाच तासात आरोपीला गजाआड करून आपल्या कार्याची चुणूक दाखवली.

शहराच्या वर्दळी चा ठिकान चाकूने सपासप तहसील कार्यालय समोर भर वार दुपारी अज्ञात इसमाने तहसील गंभीर जख्मी परिसरात खाजगी दस्तलेखक काम करनाऱ्या वर चाकू हल्ला करुन गंभीर हल्ला केल्याची घटना घडली.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

असून या हल्ल्यात सदर इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.करुण सविस्तर माहिती नु- सार दि. १ मार्च दुपारी १ वाज् ाता तहसील परिसरात काम काज सुरु असताना एक युवकानी दस्तलेखा चे काम करत असलेल्या हरिचंद्र विलास मेश्राम वय ४२ रा. केले.

या वेळी परिसरात उपस्थित असलेले लोकानी वाचवण्याचे प्रयत्न केल्यावर आरोपीनी त्याचावर दगडफेक करीत घटना स्थळावरुण पळ काढला.

बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

घटनेची माहिती मिळताच पोलिसा नी नागरिकाचा मदतीनें जख्मी व्यक्तिला कारंजा उपजिल्हा रुग्णालय दाखल केले रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी तपासनी केल्या नतर जख्मीला मृत घोषित केले.

murdernews:चाकू हल्ला करणारा अज्ञात व्यक्ति घटना स्थळा वरुण पसार झाला असून बातमी लिहेपर्यन्त घटनेचा तपास कारंजा शहर पोलिस करित होते. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली.

अपुऱ्या बस फेऱ्यामुळे ग्रामीण भागातील महिला प्रवाशी त्रस्त, बस फेऱ्या वाढविण्याची. राष्ट्रीय महिला बस प्रवासी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी..(Busnews)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: ग्रामीण भागासाठी अपुऱ्या बस फेऱ्या सोडण्यात येत असल्याने ग्रामीण क्षेत्रातील शाळा कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींसह महिला प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

राज्य परिवहन महामंडळाने या बाबीची दखल घेऊन ग्रामीण भागामध्ये बस फेऱ्या मध्ये वाढ करावी अशी मागणी राष्ट्रीय महिला प्रवासी संघटनेच्या वतीने विभागीय नियंत्रक अकोला यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

याबाबत विभागीय नियंत्रकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की अकोला ते पिंपळगाव खुटा गावासाठी केवळ तीनच बसलेल्या सुटत असल्याने प्रत्येक बस फेरीमध्ये जवळपास 120 ते 150 प्रवासी यांना जातीवादी उभे राहून प्रवास करावेलागते.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील विशेषता विद्यार्थिनी व महिलांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झालेला दिसत आहे याचप्रमाणे गायगाव भारत येथून अकोल्या येण्यासाठी बस फेरी नसल्याने विद्यार्थिनी महिला यांना ऑटो रिक्षा काळी पिवळी या खाजगी वाहनाने येणे जाणे करावे लागते

बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यामुळे वेळ पैसा खर्च होतो या बाबीची गंभीरतेने दखल घेऊन ग्रामीण भागातील बस फेऱ्या वाढवून जिथे बसलेली उपलब्ध नाही तिथे बसलेल्या सुरू कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत

Busnews :या निवेदनावर राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संगीता नानोटे, महाराष्ट्र प्रदेश सचिव व माधुरी क्षीरसागर, महाराष्ट्र प्रदेश संघटक सौ. पुष्पा काळे, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अकोला जिल्हा सचिव ज्योती मानकर, जिल्हा उपाध्यक्ष सौ सुनीता दळवी यांच्या सह्या आहेत

पांढऱ्या केसांना काळेभोर कसे करावे बुवा…. खोबरेल तेलात एकदा हे वापरूनच बघा. ( black hair )

0

 

वय वाढत चालले की केस देखील पांढरे होत जातात. मात्र केमिकलयुक्त हेअर डायर चा वापर करून आपल्या केसांचा हरवलेला रंग पुन्हा येत नाही.

तीव्र उन्हात राहणे,अपुरे पोषण यामुळे केस पांढरे होऊ लागतात.त्यानंतर मग केस पुन्हा काळे करण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात.

अतिशय महागडे घटक केमिकलयुक्त प्रोडक्ट्स आपल्या केसांसाठी वापरण्यापेक्षा फक्त नारळाचे तेल केसांना लावून सुद्धा तुम्ही सुंदर, दाट आणि काळेभोर केस मिळवू शकता.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

हेंल्थलाईनच्या रिपोर्टनुसार नारळाचे तेल हे केसांसाठी एक बेस्ट कंडिशनरचे काम करते.त्यामुळे एक्स्ट्रा मॉइश्चर कमी होते व केसांच्या समस्या उद्भवत नाहीत.नारळाचे तेल हे आयुर्वेदिक तेलांपैकी एक आहे.

black hair:या तेलाच्या वापराने केसांना मुळापासून ते अगदी लांबी पर्यंत कित्येक फायदे मिळतात. या तेलात एंटी ऑक्सिडंट असतात. नारळाच्या तेलामुळे हानिकारक घटकांपासून बचाव होतो व फ्री रेडिकल्स पासून देखील बचाव होतो.

नारळाचे तेल आणि आवळा
आवळ्यामध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. म्हणून नारळाच्या तेलामध्ये आवळा एकत्रित करून लावल्याने केस काळेभोर होतात.

3 चमचे नारळाच्या तेलात 2 चमचे आवळ्याची पावडर मिसळून लावा आणि १ तासभर तसेच केसांवर लावू ठेवा. प्रत्येक आठवड्यातून एकदा हा उपाय नियमितपणे केल्यास केस काळेभोर आणि घनदाट होतील.

नारळाचे तेल आणि मेहंदी
मेहंदी चे आपल्या आयुर्वेदात खूप महत्व आहे. त्यामुळे मेहंदी आपले केस काळे करण्यासोबतच केसांना मुलायम आणि दाट बनवते.

बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

black hair:तसेच मेहंदीने जर केस लाल होण्याची समस्या उद्भवत असेल तर 3 चमचे नारळाच्या तेलात 2 चमचे लिंबाचा रस मिसळून त्याची पेस्ट केसांना लावा व त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.यामुळे केसांना सुंदर चमक व लकाकी मिळते.

शेगावात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा व्हॉलीबॉल, कबड्डी व रनिंग मध्ये युवकांचा उत्स्फूर्त सहभाग ( Shegaonnews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव : राष्ट्रमाता इंदिरा गांधी नगर परिषद महाविद्यालय येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
नेहरू युवा केंद्राच्या वतीने शेगावात २९ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कबड्डी, हॉलीबॉल, १०० मीटर धावणे, मुले – मुली ह्या स्पर्धा महाविद्यालयाचे प्राचार्य विजय साळवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या. त्यामध्ये हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल यांनी पटकावला तर

कबड्डी मध्ये प्रथम क्रमांक राष्ट्रमाता इंदिरा गांधी नगर परिषद महाविद्यालय यांनी पटकावला. १०० मीटर धावणे मुली प्रथम क्रमांक ऋतुजा गोपाल इंगळे या खेळाडूंनी पटकावला तर मुलांमध्ये अजय संतोष नागरगोजे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला सदर स्पर्धेमध्ये पंच म्हणून क्रीडा शिक्षक पुंजाजी कोल्हे, शेखर खराटे, राजेश गवई यांनी काम पाहले.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

क्रीडा स्पर्धेचे आयोजन नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक सुरज बोरसे यांनी केले होते.

बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Shegaonnews:यावेळी शिक्षक शितलकुमार वासनिक, श्रीकृष्ण वाघ, वर्षा पिंपळकार, बोबटकर मॅडम यांच्यासह युवक युवती खेळाडू उपस्थित होते.

गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पाहणी करून मदत देण्याची मागणी ( vashimnews )

0

 

मोहम्मद बेग मिर्झा वाशिम जिल्हा प्रतिनिधी

सोमवारी मध्यरात्री मानोरा व कारंजा तालुक्याला वादळी वा-यासह पावसाने झोडपले. दरम्यान झालेल्या गारपिटीचा मानोरा व कारंजा तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी व बागायतदारांना फटका बसला. यात शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

 

या नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुसाकान भरपाई देण्याची मागणी प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हर्मेद्रा ठाकरे यांनी केली आहे २ ६ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यरात्री मानोरा कारंजा व तालुक्याला वादळी वा- यासह पावसाने झोडपले.

दरम्यान आलेल्या गारपिटीमुळे तालुक्यातील गहू, हरबरा, ज्वारी तसेच पपई, संत्रा, ऊस यासह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मानोरा तालुक्यातील कुपटा-इंझोरी मंडळातील चोंढी, धानोरा, चौसाळा, भोयणी, नायणी, मोहगव्हाण, पारव्हा, खापरी इत्यादी शेतशिवारात तर कारंजा तालुक्यातील सर्व कृषी मंडळात येणाऱ्या शेतशिवारातील शेतक- यांचे व बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या वर्षी शेतमालाला योग्य तो भाव मिळाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच वारंवार अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतक-यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

vashimnews:या मागणीकडे दुर्लक्ष केल्याच मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हमेंद्र ठाकरे यांनी दिला आहे.

आम आदमी पार्टी ची यवतमाळ येथे 03 मार्च 2024 ला जाहीर सभा (aam aadmi party )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

आम आदमी पार्टीची यवतमाळ या ठिकाणी आणि राज्यातील व विदर्भातील लोकसभेच्या दृष्टीने पहिली सभा होणार आहे.

या सभेसाठी महाराष्ट्रातील राज्य अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित राहणार असून या सभे मध्ये राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या हाती येणारे पीक याची प्रचंड नुकसान झाले.

असून राज्य सरकारनि शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली नाही आहे बेरोजगार, कामगार यांच्या न्याय हक्कासाठी या सभेचे आयोजन केलेले आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी महाराष्ट्र मध्ये संपूर्ण ताकतीने लोकसभा लढणार आहे या सभेसाठी राज्यातील असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यवतमाळ ठिकाणी येणार आहेत आहेत तसेच बुलढाणा जिल्हातून सुद्धा आम आदमी पार्टीचे हजारो कार्यकर्ते यवतमाळच्या दिशेने रवाना होणार आहे.

बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

aam aadmi party:ही सभा दिनांक 3 मार्च 2024 रोजी आझाद मैदान दुपारी 5 वाजता यवतमाळ ठिकाणी होणार आहे या सभेला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पदाधिकारी यांनी सुद्धा उपस्थित राहावे असे आव्हान बुलढाणा आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजाराम भानुदास पवार यांनी केले आहे

प्रसाद घेवदे
जिल्हा प्रसिद्धी प्रमुख
आम आदमी पार्टी
बुलढाणा
9689375358