Home Blog Page 167

लाल बाबा देवी मंदिरातील मूर्तीला चांदीचा मुकुट का बसू देत नाही असे म्हणून मुरारका यांना घरात घुसून मारहाण; १० जणांविरुध्द गुन्हा. /Crime news  ..

0

 

 

इस्माइल शेख बुलढाणा जिला प्रतिनिधि

शेगाव: अकोट रोड वरील लाल बाबा देवी मंदिरात मूर्तीला चांदीचा मुकुट का बसू देत नाही असे म्हणून येथील प्रख्यात शैक्षणिक संस्थेचे संचालक असलेले सतीश कुमार उर्फ छोटू मुरारका यांना त्यांच्या जागीच उपस्थित घरामध्ये घुसून आठ ते दहा लोकांनी मारहाण केली व देशातील मोबाईल एटीएम कार्ड नवी 24 हजार 680 रुपये याचप्रमाणे मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या गोपाळ चौधरी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपस केल्याची व घरातील महिलांना लोटपोट करून सामानाची नासधूस केल्याची तक्रार सतीश मुरारका यांनी केली या प्रकरणी मेडिकल रिपोर्ट व आलेल्या तक्रारीवरून कलम 452 323 324 143 147 148 149 327 427 341 504 506 भादवी नुसार गजानन नाईकवाडे प्रमोद सोड व आठ ते दहा जनाविरुद्ध अधिक तपास सुनील अंबुलकर साहेब करीत आहेत

 

शेगाव शहरातील लालबाबा देवी मंदिरातील मूर्तीला चांदीचा मुकुट का बसवू देत नाही, असे म्हणत गांधी चौकातील मुरारका यांच्या घरावर ८ ते १० जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून प्रवेश केला व सतीश कुमार मुरारका यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत घरातील महिलांनाही लोटपाट केली. तसेच घरातील सामानाची तोडफोड व नासधुस करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, खिशातील नगदी पैसे, एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असे साहित्य झटापटीमध्ये काढून नेले. सदर घटना २८ ऑक्टोबर रोजी

■ तर जातीवाचक शिवीगाळची महिलेची मुरारका विरुध्द तक्रार

संध्याकाळी साडेचार वाजे दरम्यान घडली.

याबाबत सतीश कुमार नंदकिशोर मुरारका यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारमध्ये नमूद केले आहे की, शहरातील गजानन नाईकवाडे व प्रमोद सुळ तसेच आठ ते दहा जणांनी माझे घरात घुसून लालबाबा देवी मंदिरातील मूर्तीवर मुकुट का बसवू देत नाही, या कारणावरून वाद घालून १० इसमांनी अचानक हल्ला चढवत मला मारहाण केली.

तसेच खिशातील मोबाईल, एटीएम, नगदी २४ हजार ६८० तसेच मध्यस्थी करण्यास आलेल्या गोपाल चौधरी यांचे गळ्यातील सोन्याची चैन महिलांना लोटपोट करून घरातील सामानाची नासधूस केली. यावरून शेगाव शहर पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ४५२, ३२३, ३२४, १४३, १४७ १४८, १४९, ३२७, ४२७, ३४१, ५०४, ५०६ भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा तपास ठाणेदार सनील

अंबुलकर करत आहेत. तर या विरुद्ध सौ. ज्योती

अमोल तायडे वय २६ राहणार शिवाजीनगर सरकारी फैल शेगाव यांनी तक्रार दिली की, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजेदरम्यान अकोट रोडवरील लालबाबा देवी मंदिरामध्ये दर्शनासाठी गेली असता सतीश कुमार उर्फ छोटू मुरारका यांनी तू मंदिरात येऊ नको, ‘तू खालच्या जातीची आहेस’, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून मंदिरातून बाहेर काढून दिले व माझा व माझे जातीचा अपमान केला, अशी तक्रार दिली. उशिरा रात्रीपर्यंत याप्रकरणी कारवाई सुरू होती. Crime news

PM Kisan yojna: दोन कोटी शेतकऱ्यांना मिळणार नाही पंधरावा हप्ता कारण सरकारने बनवले यादी

0

 

पंतप्रधान किसान सन्मान योजना निधीच्या पंधरावा हप्त्याचे आता चर्चा जोरात आली आहे तरी अंदाज आहे की पुढच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर चे दुसरे आठवड्यात पंधरावा हप्त्यातील दोन हजार रुपये लाभार्थ्याचे खात्यात हस्तांतरित केले जातील. योजना लाभापासून वंचित व ठेवण्यात आले आहे.

लाभार्थी आहेत ज्यांना अनेक वेळा आव्हान करणे सरकारी नियमाचे पालन केले नाही आपण जाणून घेऊया लाभार्थ्याची यादीतून कोण कोणत्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहेत

या योजनेतील वाढते फसवणूक रोखण्यासाठी सरकारने भूलेख पडताळणी सुरू केले आहे काही शेतकऱ्यांना त्यांचे जमिनी विकणे सुद्धा पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळत होता

असे शेतकऱ्यांना शॉर्टलिस्ट करण्यासाठी सरकारने जमीन पडताळणी सुरू करणे आवश्यक केले आहे तरी मात्र अनेक आवाहन मंत्री बऱ्याच शेतकऱ्यांनी कोट्यवधीत आहेत

ज्यांचे ज्यांचे जमिनीचे पडताळणी अद्याप पर्यंत झालेले नाही
तरी असे शेतकऱ्यांनी जमिनीची पडताळणी येणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीची पडताळणी होय पर्यंत योजनाचे लाभ मिळणार नाही तरी सर्व शेतकऱ्यांनी लाभार्थ्याचे यादीतून उघडण्याचे निर्देश सरकारने दिले आहे

एकूण सुद्धा पी एम किसान सन्मान निधीचा लाभ मिळत होता असेच शेतकऱ्यांना शॉर्टलिस्ट करण्यासाठी सरकारने जमिनीचे पडताळणी सुरू केले होते

मात्र आता अनेक आवाहन मंत्री असे शेतकरी कोट्यवधीत आहे ज्यांचे कडे जमिनी पडताळणी अद्याप झालेली नव्हती /PM Kisan yojna

 

माझी माती, माझा देश’ उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रा दिल्लीकडे मार्गस्थ/ EknathShinde

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखविला हिरवा झेंडा

मुंबई, दि. २७ – ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियानअंतर्गत महाराष्ट्रातील विविध गावांमधून मातीचे अमृत कलश जमा करण्यात आले आहेत. हे कलश घेऊन आलेल्या ८८१ स्वयंसेवकांची अमृत कलश यात्रा विशेष रेल्वे आज दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथून राजधानी नवी दिल्लीकडे मार्गस्थ झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.

यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराज, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पश्चिम रेल्वेचे मुख्य महाव्यवस्थापक कुशल सिंह, विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी यावेळी स्वयंसेवकांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. देशभक्ती वाढीस लावणारा ‘माझी माती माझा देश’ कार्यक्रमाची सुरूवात ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती मैदानातून झाली होती. EknathShinde

00000

या स्पर्धेत पोलीस अधीक्षक नुरुल हसन पाच किलोमीटर धावले /nurul Hasan SP

0

 

पोलीस विभागाचे दैनंदिन व्यस्त कामकाजाचे स्वरूप पाहता नोरोल हसन पाच किलोमीटर धावण्याचे स्पर्धा पोलीस विभागाचे वतीने करण्यात आले

या स्पर्धेत कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आभासी पद्धतीने झाले असून वर्धा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व पोलीस पाल्यकरिता धावण्याचे स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.

सदर या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील 48 अधिकारी 442 पोलीस अंमलदार व एका पोलीस पाल्यांनी सभा घेतला होता त्यावेळी पोलीस अधीक्षक नूरुल हसन अप्पर फुले अधीक्षक डॉक्टर सागर कवडे सर त्यांनी टॉर्च किलोमीटर खाऊन सहकार्याचा उत्साह वाढविला अप्पर पोलीस अधीक्षक सागर रतन कुमार कवडे यांनी प्रथम दहा स्पर्धांमध्ये स्वतःचे स्थान निश्चित केले.

सदर या स्पर्धेमध्ये पुरुष स्पर्धा पैकी प्रथम क्रमांक प्रघळून फड द्वितीय अंकित जिभे तृतीय मनोज सावर चांदे तसेच महिला स्पर्धकांपैकी प्रथम क्रमांक सुनेना डोंगरे द्वितीय जयश्री बावणे तृतीय अलका राठोड यांनी पटकावला या स्पर्धेतील विजेत्यांना आढावा बैठकीमध्ये समान चिन्ह व परिस्थिती पत्र देऊन गौरव करण्यात आले.

आपण फिट नसलो तर आपले कर्तव्य व्यवस्थित बजावता येत नाही. सर्वांनी स्वतःसाठी वेळात वेळ काढून कमीत कमी एक तास नियमित व्यायाम करावा, असे आवाहन केले.

यशस्वीतेसाठी पोलिस उपअधीक्षक (गृह) मनोज वाडिवे, पोलिस निरीक्षक कांचन पांडे, संजय गायकवाड, गोपाल भारती, रविंद्र रेवतकर, लक्ष्मण लोकरे, विनीत घागे, बालाजी लालपालवाले, कमलाकर घोटेकर आदींनी परिश्रम घेतले. / nurul Hasan SP

कारागृहातून सुट्टीवर असलेल्या एकाची पूर्व वैमनस्यातून हत्या / murder

0

 

प्रतिनिधी शाम वाळस्कर
सूर्या मराठी न्यूज अकोला

Anchor – मूर्तिजापूर येथील तोलाराम (भगतसिंग ) चौकात पूर्व वैमनस्यातून एकाची हत्या झाल्याची घटना २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली.

Vo – गुन्हेगार प्रवृत्तीचा असलेला सुरेश देशमुख हा अनेक दिवसांपासून कारागृहात होता काही दिवसांपूर्वी तो सुट्टीवर आला होता. तेव्हापासून त्याच्यावर पाळत ठेवून त्याची आज नियोजितपणे हत्या करण्यात आली.अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याचे बोलल्या जात असून सुरेश देशमुख (५२) हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्याने त्याचे अनेकांसोबत खटके उडाले असल्याची माहिती आहे.

तो एका गंभीर गुन्ह्यात कारागृहात एका गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असल्याचे समजते. शुक्रवारी बाजाराचा दिवस असल्याने शहरात सर्वत्र वर्दळ होती याचाच फायदा घेऊन काही अज्ञातांनी सुरेश देशमुख यांच्यावर धारदार शस्त्रानी हल्ला चढविला त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या संदर्भात शहर पोलीसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहेत. Murder

missing girl /  बेपत्ता तरुणी चा अवघ्या चार तासात लावला शोध

0

 

उप निरी विजय साळवे प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांच्या मेहनतीला यश

इस्माइल शेख बुलढाणा जिला प्रतिनिधि

दिनांक 26/10/2023 रोजी अमरावती एक्सप्रेस ने मुंबई बडनेरा असा प्रवास करत असताना एक तरुणी आपल्या सोबत असलेल्या बहिणीला व दाजी ला न सांगता शेगाव स्टेशनवर स्मार्ट .

जाग आल्यावर ती न दिसल्याने ते परत शेगाव ला आले व मिसिंग दाखल करून आरपीएफ शेगाव येथे आपली समस्या घेऊन गेले असता उप निरी विजय साळवे व प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रंजन तेलंग यांनी CCTV च्या आधारे तिचा शोध घेतला.

असता ती शेगाव येथे उतरल्याचे दिसून आले नंतर पूर्ण फुटेज पिंजून काढल्यावर ती गजानन महाराज मंदिराकडे जातांना दिसली त्यावरून रंजन तेलंग यांनी आपल्या गुप्तहेर ना याची सूचना दिली व अवघ्या चार तासात त्या 20 वर्षीय तरुणीला तिच्या नातेवाईकांना सुपूर्द केले. फ्लॅट च्या पैशाची व्यवस्था होत नसल्याने टेन्शन मध्ये ती ट्रेन मध्ये उतरून मंदिरात गेल्याचे त्या तरुणीने सांगितले.

रेल्वे सुरक्षा बलाच्या या कामगीरी ने जनतेत एक सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे  missing girl

Price Hike:देशभरात कांद्याचे भाव पुन्हा वाढले आहे

0

कांद्याचे किमतीत या महिन्यात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दिल्ली एनसीआर देशभरात कांद्याचे किमतीत पुन्हा एकदा लोकांना त्रास देऊ लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या मागच्या आठवड्यात कांद्याचे भाव दुप्पट येणे वाढ झाले असून.

दिल्लीत कांदा 60 ते 500 रुपये पर्यंत विकला जात असून

NCR एनसीआर शहरामध्ये असेच परिस्थिती आहे. सध्या या कांद्याचे भावात कमी होण्याचे शक्यता तरी महाराष्ट्र आणि मध्ये प्रदेशातील कांद्याचे कमी होताना दिसत आहे.

आजादपूर भाजी मंडळ बद्दल बोलायचा झाले तर या ठिकाणी कांद्याचे दर 40 ते 45 रुपये किलोने मोठ्या प्रमाणात मिळतो. आवक लवकर वाढले नाही तर कांद्याचे भाव आणखीन आणखी वाढू शकते असे चित्र दिसत आहे वास्तविक नवरात्राचे काळात कांद्याचे भाव कमी झाले होते कारण या काळात लोक कांदा कमी वापरतात त्याचबरोबर नवरात्र समताच कांद्याचे मागणी वाढू लागले.

भाव का वाढले जाणून घ्या

बाजारात तंत्रज्ञाचे मते नवरात्रीचे काळात दिल्ली एनसीआर मध्ये कांद्याचे भाव 35 ते 40 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होते नवरात्र नंतर कांद्याचे भाव वाढण्याचे दोन कारणे आहेत पहिला कारण मागणीत अचानक वाढ दुसरं कारण आवक कमी

काही दिवसापासून इतर राज्यातून होणारा कांदा येत नसल्यामुळे कांद्याचे मागणी वाढले आहे हवा कमी झाल्याने कांद्याचे भाव वाढले आहे साधारण या महिन्याभरात कांद्याचे भाव कमी होतील काय

महाराष्ट्र मध्य प्रदेश अनेक राज्यातून येणारा कांद्याचा साठा कमी झाल्याचे बाजारातील जाणकाराचे म्हणणे आहे

पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे असा शिस्तीत नवीन पीक येण्यास 20 ते 25 दिवसाचा अजून कालावधी लागणार आहे

असा अस्तितेत नोव्हेंबर चे शेवटचे आठवड्यात कांद्याचे दर खाली येण्याचे शक्यता  आहे. / Price Hike

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी डॉक्टर असलम खान यांची नियुक्ती!  /congress committee

0

 

इस्माइल शेख बुलढाणा जिला प्रतिनिधि

शेगाव येथील डॉक्टर असलम खान यांचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभागचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे महासचिव तथा खासदार मा.मुकुलजी वासनिक साहेब.

राज्यसभा सांसद व अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग इम्रान प्रतापगडी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार डॉक्टर वजहात मिर्झा यांचे आदेशानुसार महाराष्ट्र प्रभारी मोहम्मद अहेमद खान यांचे पत्र अनुसार नियुक्ती करण्यात आली डॉक्टर असलम खान हे सन १९८७ पासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहे डॉक्टर सेलचे शेगाव शहर अध्यक्षपदापासून त्यांची राजकीय कार्यकर्तगी सुरू झाली.

त्यानंतर डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, व नंतर जिल्हा कार्याध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग या पदाची जबाबदारी पक्षांतुन देण्यात आली होती बुलढाणा जिल्ह्यातील डॉक्टर असलम खान राजकारण बरोबरच सामाजिक, वैद्यकीय, व संस्कृती, क्षेत्रातून अग्रेसर राहून लोकांची सेवा करत आहे.

काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरण ते आम नागरिक पर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांची धडपड व कोणत्याही निवडणूक असो

काँग्रेस पक्षासोबत राहून पक्षाची सेवा आणि पक्ष संघटना मजबूत करण्याच्या त्यांच्या धोरण आहे काँग्रेस पक्षाची एक निष्ठा व पक्ष संघटना मजबूत करण्याच्या कार्य पाहून व विविध क्षेत्रात त्यांच्या सक्रिय कार्य पाहून पक्षांनी त्यांची महाराष्ट्र परदेश उपाध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक विभाग या पदावर नियुक्ती केली..congress committee

मराठा आरक्षणासाठी शिंदे सरकारला दिलेल्या अल्टिमेटम संपला, मनोज पाटील आजपासून पुन्हा उपोषणास बसणार / manoj jarange

0

 

सूर्या मराठी न्यूज ब्युरो चीफ

मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्यासाठी मनोज पाटील यांनी शिंदे सरकारला दिलेला अल्टिमेटम आज मंगळवार 24 ऑक्टोंबर ला संपत आहे

मात्र शिंदे सरकारने अजूनही मराठा आरक्षण बाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही

आजचा शेवटचा दिवस हा शिंदे सरकार साठी असणार आहे आरक्षण जाहीर केले नाही तर पुन्हा 25 ऑक्टोंबर पासून मनोज जरांगे पाटील उपोषणास बसणार असल्याची भूमिका घेतली आहे.

यावेळी पाणी व उपचार घेणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे क** स्वरूपाचे असणार आहे हे आमरण उपोषण तसेच यापुढे सरकारला वेळ वाळून दिला जाणार नाही असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

मनोज पाटील म्हणाले की मुख्यमंत्री निर्णय घेतील ते शब्दाला जगणारे आहेत मात्र त्यांनी शब्द पाळला नाही म्हणून 25 ऑक्टोंबर पासून उपोषण बसण्यात तयार आहे.

मग नेत्यांनी आमच्या गावात यायचं नाही गावा गावात मराठा आरक्षण साठी उपोषण संततीने होणार
दिवसभर आणि रात्रीपर्यंत सरकारकडे वेळ आहे.

यापुढे सरकारला एक तास पण वाढून मिळणार नाही सरकार आरक्षण देणार असेल तर आम्ही त्यांच्याशी बोलू ते आरक्षण देणार नसतील तर त्यांना कशाला बोलायचं असे हे पाटील म्हणाले.

त्यामुळे शब्दाला जगून मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजाला आज दसऱ्याचे मोर्चावर आरक्षण दिले पाहिजे होते मुख्यमंत्र्यांनी पदापेक्षा शब्दाला जास्त किंमत द्यावी असे मनोज पाटील यांनी म्हटले होते manoj jarange

मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी अक्षय चव्हाण तर मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी कु. ईश्वरी सहस्त्रबद्धे / Buldhana

0

 

ज्युनिअर बुलढाणा जिल्हा बॉलबॅडमिंटन संघाची घोषणा

 

शेगांव येथे होणार ज्युनियर राज्यस्तरीय बॉलबॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र बालबॅडमिंटन असोसिएशन व बॉलबॅडमिंटन स्पोर्टस असोसिएशन बुलढाणा व माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने माऊली इंजिनिअरिंग कॉलेज शेगाव येथे दिनांक २६ ते २९ ऑक्टोबर २०२३ दरम्यान ज्युनिअर राज्यस्तरीय बॉलबॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर ज्युनिअर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या बुलढाणा जिल्हा संघाची घोषणा बॉलबॅडमिंटन स्पोर्ट्स असो बुलढाणा चे सचिव व महाराष्ट्र बॉलबॅडमिंटन असोसिएशनचे खजिनदार विजय पळसकर यांनी नुकतीच केली.

नुकत्याच संपन्न झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतून प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा जिल्हा संघ तयार करण्यात आला असून हा संघ शेगांव येथील ज्युनिअर राज्यस्तरीय बॉलबॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे . मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी मलकापूर येथील अक्षय चव्हाण तर मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी शेगाव येथील कुमारी ईश्वरी सहस्त्रबद्ध यांची नियुक्ती संघटनेचे अध्यक्ष निलेश महाजन व उपाध्यक्ष राजेश्वर खंगार यांनी नुकतीच केली असुन संघ पुढीलप्रमाणे

मुली संघ
1) ईश्वरी गुलभेले कर्णधार
2) श्रुती गजानन तिजारे
3) आदिती पंकज टावरी
४) तृप्ती संतोष वाणे
५) स्नेहा रवींद्र अवचार
6) अनुजा संतोष पवार
७) तनवी गोवर्धन पाटील
८) यशिका महेश पंजवाणी
९) स्मिता विलास पहुरकर
१०)खुशी मिलिंद जाधव

प्रशिक्षक :- प्रा कैलास पवार व्यवस्थापक:- आकाश ताराडे

मुले संघ
१)अक्षय चव्हाण कर्णधार
२) सौरभ चव्हाण
३) लोकेश चांडक
४) सिंद्वेष बाबर
५) सचिन दिवाने
६) वैभव वसत्कार
७) अनुज हागे
८) प्रणव प्रवीण कडाळे
९) आयुष श्रीकृष्ण पाटील
१०) आदित्य धामोडकर

प्रशिक्षक विश्वजीत सिंह ठाकुर
व्यवस्थापक राजेश्वर खंगार

सदर जिल्हा संघाचे प्रशिक्षण शिबिर दि.२२ ते २६ ऑक्टोबर पर्यंत माऊली स्कूल ऑफ स्कॉलर शेगाव जिल्हा बुलढाणा येथे राहणार असून निवड झालेल्या सर्व खेळाडूंनी स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी बॉलबॅडमिंटन स्पोर्ट्स असो.बुलढाणा चे सचिव विजय पळसकर यांच्याशी संपर्क साधावा असे संघटनेतर्फे आव्हान करण्यात आले आहे. Buldhana