Home Blog Page 56

मुलीच्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रा वरील क्यू. आर कोड रेखांकित करावी(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे वर्धा :-

शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा यांना शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने तालुकाप्रमुख हिंगणघाट सतीश धोबे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले की,वैवाहिक मुलीच्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रा वरील क्यू. आर कोड रेखांकित करणे गरजेचे आहे कारण आपल्या विभागामार्फत प्रत्येक विवाहाची नोंदणी करून त्यानंतर नवविवाहितांना विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात येते.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

परंतु आमच्या असे लक्षात आले की ,नवविवाहित वधू तिचे आधार कार्ड वरील पूर्वीचे नाव वडिलांचे असल्यामुळें तीचे विवाह झाल्यानंतर वर पक्षाकडील नाव आधार कार्डवर बदलून नवीन कार्ड पाहिजे असते. शासनाच्या वतीने राबविण्यात आलेले आधार केंद्र येथे जेव्हा नाव दुरुस्ती करिता जातात तेव्हा अडचणी निर्माण होतात.

जर आपल्या विभागामार्फत विवाह नोंदणी प्रमाणपत्रावरील क्यू .आर कोड रेखांकित करण्यात आला तर, त्यांना त्या आधार केंद्रावरील वडीलाचे नाव बदलून पतीचे नाव व पत्ता बदलविण्यास अडचण निर्माण होणार नाही. तसेच आधार कार्ड झाले की , त्यांना नव्या ठिकाणी मतदार यादीत मतदार ओळखपत्र तयार करण्यास सोयीचे होईल.

Hingnghat :तरी सदर बाब महत्त्वाची समजून यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. निवेदन देतांना उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने, नगर सेवक मनीष देवडे, शंकर मोहमारे, शहर संघटक गजानन काटवले उपस्थित होते.

माहितीचा अधिकार मध्ये मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळकेल्याने.आमरण उपोषण करणार .मो .राकिब बागवान (Menkar)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव

Menkar:मेहकर/दिनांक २२/ जानेवारी २०२५ सविस्तर वृत्त -: डोणगाव ग्रामपंचायत मध्ये दिनांक १४/ऑक्टोबर/२०२४ रोजी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कायद्याअंतर्गत डोणगाव ग्रामपंचायती मध्ये कचरा कुंडी बाबतीत व १५व्या वित्त आयोगाच्या पूर्ण खाते उतारा चा संपूर्ण सविस्तर तपशील मागीतल परंतु डोणगाव ग्रामपंचायत चे विद्यमान ग्रामसेवक यांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

नंतर बागवान यांनी दिनांक १६/डिसेंबर/२०२४ रोजी विस्तार अधिकारी अधिकारी यांच्या कडे अपिल अर्ज केला तरी सुद्धा संबंधित अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची माहिती किंवा आदेश काढला नाही.

या वरुन ग्रामपंचायती मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते आहे माहिती देण्यास टाळाटाळ करणे सत्य माहीती दडविणे.

Menkar:या विरोधात दिनांक २५/जानेवारी/२०२५ रोज शनिवार पासून मेहकर येथील पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कार्यालया समोर मो. राकिब बागवान आमरण उपोषणाला बसणार आहेत असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

भुमराळा – किनगाव मार्गावर खड्यांचे साम्राज्य ग्रामस्थ शेतकरी विद्यार्थ्यांचे हाल सुरुच विद्यमान आमदारांकडून वाढल्या अपेक्षा(Lonarnews)

0

 

प्रतिनिधी सय्यद जहीर

Lonarnews:सिंदखेडराजा मतदार संघातील शेवटच्या टोकावर असलेल्या व लोणार तालुक्यातील भुमराळा ते किनगाव जटटू या मुख्य भागातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून भुमराळा किनगाव जटटू मार्गावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या नशिबी अजूनही भोग सुरुच आहे या मार्गावर ये जा करणारे वाहन चालक,शेतकरी, विद्यार्थी, अक्षरशा त्रस्त झाले आहे आज घडीला हा मार्ग विद्यार्थ्यांसाठी व वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे.

नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल मध्ये कार्यशाळा संपन्न.(Buldhananews )

भुमराळा येथुन हा मार्ग मुख्य मार्ग व जागतिक लोणार सरोवर ते संभाजीनगर मार्गाला जोडल्या गेला असुन या मार्गाने गावकरी, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थांची मोठी वर्दळ असते परंतु मार्गावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले असून गिट्टी उघडली असल्याने मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे रात्री खड्डे चुकवण्याच्या नादात वाहनधारकांचे अनेक अपघात होत आहेत.

वाहने चालवताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते अशा दुरवस्था झालेल्या मार्गाकडे माजी लोकप्रतिनिधींनी सतत दुर्लक्ष केले.

Lonarnews:असून विद्यमान लोकप्रतिनिधींकडुन वाहनधारकांच्या अपेक्षा वाढल्या असुन संबंधित विभागातील अधिकारी व लोकप्रतिनिधी भुमराळा ते किनगाव जटटू रस्त्याच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे शासनाने निधीची तरतूद करून डांबरीकरणाचे काम पूर्ण करून द्यावे अशी मागणी वाहनधारक, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूरांकडून होत आहे

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

भुमराळा गावानजीक एक किलोमीटर पर्यंत घाट रस्ता असुन त्या घाटातील डांबरीकरण पुर्णपणे उखडून गेले आहे त्यामुळे अनेक मालवाहू गाड्या, मोटारसायकल, एसटी बस, रुग्णवाहिका सह सर्वच वाहनधारकांना या घाटातून वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते आहे.

Lonarnews:अनेक वेळा या घाटात अपघात सुद्धा झाले असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे देऊळगाव राजा येथील इंजिनिअर यांना याबाबत माहिती दिली असून मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे यांना भेटून सर्व समस्या मांडणार असुन आमदार आमच्या समस्या सोडवतील असा विश्वास भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सानप यांनी व्यक्त केला

नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल मध्ये कार्यशाळा संपन्न.(Buldhananews )

0

 

जावेद शहा बुलढाणा

दिनांक २०जानेवारी राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट मध्ये आज पोलीस स्टेशन रायपुर च्या वतीने नवीन फौजदारी कायदे संदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. श्री दुर्गेश राजपूत साहेब व प्रमुख मार्गदर्शक वक्ते मा.मोहम्मद बशीर सर (सरकारी विधी अधिकारी कोर्ट,चिखली)

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

Buldhananews:तसेच शाळेचे सहाय्यक शिक्षक राजेश गायकवाड तसेच फारूक शेठ, इजाज भाई, बालाप्रसाद जयस्वाल, मोहम्मद शमीम, विठ्ठल सोनवणे, सुनील खंडारे त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील प्रतिष्ठित व्यक्ती व पोलीस पाटील व पत्रकारांची उपस्थिती होती.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा.मोहम्मद बशीर साहेब यांनी नवीन कायदे यामध्ये, भारतीय न्याय संहिता कायदा-2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता -2023 त्याचप्रमाणे भारतीय साक्ष अधिनियम-2023 या मध्ये झालेले परिवर्तन त्याप्रमाणे जुन्या कायद्यामध्ये असणाऱ्या नियम या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले.

*त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष राजपूत साहेब यांनी रायपूर पोलीस स्टेशन च्या माध्यमातून विविध कार्यक्रम जिजाऊ ज्ञान मंदिर मध्ये घेतले जातात विद्यार्थी जनजागृती, सुरक्षा सप्ताह, विशेष मुलींसाठी कार्यशाळा, इत्यादी व इतरही कार्यशाळा व शिबीरे च्या माध्यमातून विद्यार्थी कायद्याबाबत जागृत झाले पाहिजे त्यांना पोलिसांचे कार्य माहित असले पाहिजे त्यांचा सर्वांगीण विकास घडला पाहिजेत त्याचप्रमाणे विविध दैनंदिन जीवनातील उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या कार्यक्रमासाठी पोलीस स्टेशन रायपुर येथील श्री कमळकर सर, श्री काकडे सर श्री पडघान सर पोलीस स्टेशन रायपूरचे कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थी , प्राध्यापक व शिक्षक यांची उपस्थिती होती.

Buldhananews :या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष संदीपदादा शेळके व शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी कार्यक्रम सूत्रसंचालन ज्ञानेश्वर भुसारी यांनी केले.

शेख समद शेख अहमद यांची जिल्हा पत्रकार संघाच्या विभागीय संघटक पदी निवड(Lonarnews)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

पत्रकारीतेच्या माध्यमातून अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे हा निर्णय मनाशी बांधून पत्रकारीतेचं व्रत हाती घेतलं. दैनिक नवभारत, नवराष्ट्र, दैनिक मतदार, दैनिक महासागर,मातृभूमी, चिखली दर्पण, अशा वर्तमान पत्रात काम केले आहे पत्रकारितेला सुरुवात केली असून आज रोजी मातृभूमी व मतदार तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. त्यांना पत्रकारितेचा गेल्या 22 वर्षाचा अनुभव आहे.

राजकारण, सामाजिक, सांस्कृतिक, व्यापार, कृषी, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर मंडळीशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध जोपासात
आपल्या कामाचा ठसा उमटविला.

बुलढाणा अर्बन येथील गोडाऊनमधील झालेल्या मालाची अफरातफर बाबतीत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर.चौकशी करुन व दोषींवर कार्यवाही करून न्याय मिळवून देण्यासाठी विनंती.(buldhanaurbanbank)

या अगोदर लोणार तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहिले, तसेच लोणार नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणून, सध्या लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे, तसेच परवाची संघटनेच्या माध्यमातून,या अनेक संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना व समाजातील घटकांना न्याय देण्याचे काम पत्रकार म्हणून त्यांनी समाजातील सर्वच स्तरातरला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

त्याचप्रमाणे विद्यार्थी व शेतकरी यांच्या प्रश्नाला नेहमीच महत्वाचे स्थान दिले आहे. विविध चळवळीतील लोकांच्या
लढ्यांना पत्रकारितेच्या माध्यमातून पाठबळ देण्याचे काम करतात.

याच कार्याची दखल घेऊन जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी मेहकर लोणार विभागीय संघटक पदी शेख समद शेख अहमद, यांची निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांनी निवडीनंतर प्रतिक्रिया देतांना सांगितले की, जिल्हा पत्रकार संघाने जो विश्वास आपल्यावर दाखवला आहे,

Lonarnews :त्याबद्दल मी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष यांनी व त्यांच्या संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी च्या वरिष्ठांनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्याचे मी पुर्णपणे विश्वास सार्थक करुन संघटनेचे विभागीय विस्तारासाठी जोमाने कामाला सुरुवात कराणार असल्याचे प्रतिपादन शेख समद यांनी व्यक्त केले.

बुलढाणा अर्बन येथील गोडाऊनमधील झालेल्या मालाची अफरातफर बाबतीत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर.चौकशी करुन व दोषींवर कार्यवाही करून न्याय मिळवून देण्यासाठी विनंती.(buldhanaurbanbank)

0

 

(अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक सूर्या मराठी न्यूज )

buldhanaurbanbank:बुलढाणा अर्बन येथील झालेल्या मालाच्या अफरातफर संदर्भात हरीष जुगलकिशोर राठी रा.निवाणा, ता.संग्रामपूर जि. बुलढाणा यांनी संदर्भ दिनांक.०९.०६.२०२३ रोजीचा ग्रामीण पो.स्टे. खामगाव व शहर पो.स्टे. खामगाव यांना दि.०१.१०.२०२३ रोजी दि.११.१०.२०२३ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय खामगाव व मा. पोलीस अधिक्षक बुलढाणा यांना दि.११.१०.२०२३ रोजीचे तक्रार अर्जाचा उल्लेख करीत निवेदन सादर केले आहे.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

निवेदनात म्हटले आहे की,मी वरील बुलढाणा अर्बन गोडाऊन टेंभुर्णा येथील धान्य गोडाऊनमध्ये सोयाबीन ६०० क्वींटल व तूर ४८ क्वींटल धान्य गोडाऊनला ठेवली होते. सदर गोडाऊनमध्ये झालेल्या अफरातफर प्रकरणासंबंधी वरील संदर्भाकीत तक्रारी देवून त्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.वरील प्रकरणी लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी.

अन्यथा मला नाईलाजास्तव भारतीय स्वातंत्र्याच्या प्रजासत्ताक दिनी दिनांक २६.०१.२०२५ रोजी आत्मदहन करावे लागेल व होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी. निवेदनासोबत आपण सहपत्र सुद्धा जोडलेले आहे असे अर्जदाराने नमूद केले आहे.

बुलढाणा अर्बन येथील गोडाऊनमधील झालेल्या मालाची अफरातफर बाबतीत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर.चौकशी करुन व दोषींवर कार्यवाही करून न्याय मिळवून देण्यासाठी विनंती.(buldhanaurbanbank)

buldhanaurbanbank:या अफरातफर प्रकरणाची व अर्जदाराच्या मागणीची दखल जिल्हाधिकारी घेतील काय? याकडे सगळ्यांची लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांची नगर परिषदेवर धडक..(Hingnghat)

0

 

शहरातील व्यवसायिक अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण उचलून छोट्या – मोठ्या व्यवसायिकाचे नुकसान करू नका – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक…

प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात व्यावसायिकांनी मुख्याधिकारी यांना दिले निवेदन…

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट:- शहरातील व्यवसायिक अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण उचलून छोट्या – मोठ्या व्यवसायिकाचे नुकसान करू नये, यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात व्यवसायिकांनी मुख्याधिकारी यांना दिले निवेदन…

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

नगर परिषद मार्फत शहरातील अतिक्रमण काढण्याचे काम सुरु आहे. परंतु या छोट्या – मोठ्या व्यवसायिकांचे नुकसान होऊ नये. याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. शहरातील लोकसंख्या जास्त असल्यामुळे तसेच उदरनिर्वाहाचे साधने कमी असल्याने दिवसेंदिवस महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शहरात बेरोजगारीचा प्रश्न उद्भवला आहे.

शहरातच नव्हे तर संपूर्ण देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्य नागरिक छोट्या व्यवसायातून आपला कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवीत असतो. त्यामुळे प्रत्येक नागरिक आपल्या पोटाची खडगी भरण्याकरिता छोटा – मोठ्या व्यवसाय टाकत असतो.

लोकसंख्या जास्त व जागेची कमतरता असल्याने मिळेल त्या ठिकाणी व्यवसाय टाकून आपला उदरनिर्वाह करीत असतात. अशा प्रसंगी शासन / प्रशासन वाटेल तेव्हा अतिक्रमण मोडकडीस काढण्याचे प्रयत्न करतो जर शासनाला अतिक्रमण काढायचे असेल तर संपूर्ण शहरातील अतिक्रमण सरसकट काढा. तसेच नगर परिषद मार्फत अतिक्रमण काढत असताना गोर गरीब नागरिक व सामान्य नागरिकांचे नुकसान न करता अतिक्रमण काढावे.

अन्यथा गोर गरीब अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढून त्यांच्यावर अन्याय करू नका असे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

Hingnghat:यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटिल, समाजसेवक सुनिल डोंगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कोपुलवार, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, माजी नगसेवक बालाजी गहलोत, माजी नगरसेवक राजेश भाईमारे, हिम्मत खान पठाण, अमोल बोरकर, अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस मोह्ममद अली अजानी, प्रदेश संघटक हिमायु मिर्झा बेग, प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, मारोती महाकाळकर, सुनिल भुते,हेमंत घोडे,जितेंद्र रघाटाटे, सुनील घोडखादे, प्रवीण कलोडे, सिद्धार्थ मस्के, संदीप निबांळकर, शोहेब,शेख, नितीन भुते, कुणाल येसंबरे, गजू महाकाळकर, उमेश नेवारे, शाहिद शेख, सुशील घोडे, आकाश हुरले, आदित्य बूटे, दिनेश पिसे, राजेश बैस्वारे, सुनील मुदाफळे, दिपक अंबरवेले, पुंडलिक साठे, रोहित हजारे, मजीद शेख, सलीम पारखी, करीम खान, सचिन घोडे, पंकज भट्ट, विपुल थूल, गोलू भुते, विपूल वाढई, हूकेश ढोकपांडे, अमर धनविज, राहुल बोरकर यांच्यासह सर्व व्यवसायिक उपस्थित होते.

जस्तगाव फाटा १०चाकी टिप्पर व दुचाकी वाहन अपघात प्रकरणी वाहन चालकास अटक व जमानतनवर सुटका.(Policenews)

0

 

Policenews:संग्रामपूर ः- शेगाव -वरवट(बकाल ) रोडवरील जस्तगाव फाट्याजवळ दि.१७/जानेवारी रोजी दहा चाकी मालवाहतूक टिप्पर व दुचाकी वाहनास जबर धडक दिल्याने दोन मजूरांचा मृत्यू तर एक गंभीर झाल्या प्रकरणी टिप्पर जड वाहन चालकास तामगाव पोलीसांनी अटक करुन जमानतवर सोडण्यात आले आले आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की,मृतकाचे नातेवाईक यांनी तामगाव पो.स्टे,ला घटनेच्या दिवशी रात् ७.४५. वा दरम्यान तोंडी फिर्याद दिली की दि.१७/जानेवारी रोजी ११.४५वा.संग्रामपूर तालुक्यातील जस्तगाव फाट्यावर अपघात घडला त्यात वाहन चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविले .

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

त्यामुळे पुंजांजाजी बावणे वय ४५ वर्षे व संजय शालीग्राम बावणे यांचा मृत्यू झाला तर ज्ञानेश्वर एकनाथ कोठे रा मनसगाव ता.शेगाव हे गंभीर जखमी झालेत.ह्या प्रकरणी दहा चाकी वाहन चालकाविरुद्ध तामगाव पो.स्टे.ला विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करुन अशोक लेलँड जड वाहन चालक सागर भारत हिवराळे वय 30 वर्षे रा.वल्ली ता.सावनेर जि.नागपूर ह्यास अटक केली आणि त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास तामगाव पोलीसांनी जामीनवर सोडविण्यात आले.

दोघे मृत व एक गंभीर जखमी शेतमजूर असतांना
एवढा गंभीर अपघात असल्यावरही टिप्पर चालकास तामगाव पोलीसांनी तोही नागपूर जिल्ह्यातील असतांना त्यास न्यायालयात न नेता.

Policenews :घटनेच्या दिवशीच रात्रीचे सुमारास तामगाव पोलीसांनी जमानतवर सोडून दिले हा अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होत आहे, साधा अपघात झाला तरी वाहन चालकास कोर्टात नेतात. मग हे कसे घडले.याचा विचार करण्याची गरज आहे.

हा माझा सत्कार नसून जिल्ह्यातील समस्त नागरिकांचा सत्कार आहे -: ना.पकंज भोयर(Hingnghat)

0

 

वर्धा जिल्हाला मंत्रीपद मिळाले हा आपला बहुमान -: आमदार समीर कुणावार* प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :- भारतीय जनता पार्टी हिंगणघाट तथा नागरी सत्कार समितीच्या वतीने माजी खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे नवनियुक्त राज्यमंत्री ना.श्री. पंकज भोयर व नवनिर्वाचित आमदार राजेश बकाणे व सुमीत वानखेडे यांचा नागरी सत्कार समारंभ स्थानिक निखाडे भवन हिंगणघाट येथे आयोजित करण्यात आला होता या नागरी सत्कार समितीचे स्वागताध्यक्ष आमदार समीर कुणावार हे होते त्याच्याच पुढाकाराने सदर सत्कार सोहळा आयोजित केला केला होता

यावेळी सत्काराला उत्तर देताना ना.भोयर यांनी हा सत्कार माझा नसून जिल्ह्यातील समस्त नागरिकांचा हा सत्कार असल्याची भावनिक प्रतिक्रिया दिली मंत्रीपदामुळे आधीपेक्षा माझी जवाबदारी वाढली

भाविकांसाठी पवित्र लोणार धारातीर्थी स्नानासाठी खुली करा-आमदार सिध्दार्थ खरात(Lonarnews)

असून माजी खासदार रामदास तडस,आमदार समीर कुणावार,आमदार राजेश बकाणे व सुमीत वानखेडे , जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्या साथीने जिल्हाला विकासकांच्या वेगळ्या उंचीवर नेण्याच्या माझा मानस असल्याची प्रतिक्रिया दिली आमदार बकाणे व वानखेडे यांची सुध्दा समायोजित भाषणें झालीत.

स्वागताध्यक्ष कुणावार यांनी ना.भोयर यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीला प्रथमच जिल्ह्याला मंत्रीपद मिळाल्याने हा संपूर्ण जिल्ह्याचा बहुमान असून प्रथमच जिल्ह्यातील चारही विधानसभा काबीज केल्याने आम्हा सर्व भाजप कार्यकर्त्यांना याचा अभिमान असल्याची भावना व्यक्त केली याप्रसंगी मंचावर हिंगणघाट समुद्रपूर सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील प्रमुख मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Hingnghat :यावेळी हिंगणघाट येथील सामाजिक संस्थांनी मान्यवराचा सत्कार केला कार्यक्रमाला सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

भाविकांसाठी पवित्र लोणार धारातीर्थी स्नानासाठी खुली करा-आमदार सिध्दार्थ खरात(Lonarnews)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonarnews:लोणार विकास आराखडा आढावा बैठक संदर्भ लोणार विकास आराखडा समिती ए.डी.पी शर्मा,जिल्हाधिकारी किरण पाटील, पुरातत्त्व विभागाचे अरून मलीक, फॉरेस्टचे राठोड,विभागीय अधिकारी जोगी,तहसीलदार भुषण पाटील, मुख्यधिकारी वि.भा.वराडे यांनी आज लोणार येथे भेट दिली.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

या भेटीची माहीती कार्यकर्ते यांना मिळाली त्या आमदार सिध्दार्थ खरात यांना दिली असता ते तात्काळ येथे दाखल झाले यावेळी आमदार खरात यांनी समितीशी चर्चा केली यावेळी मी लोणारला लोणावळा करेन अशी भुमिका मी मतदारांना मांडली होती माझ्या या भुमिकेची लोकांनी स्वागत केले व भरभरुन मतदान केले.

यामुळे लोणारला लोणावळा करायचा असेल तर या समितीमध्ये स्थानिक आमदार व खासदार यांचा समावेश करण्यात यावा अशी सुचना यावेळी खरात यांनी दिल्या. तसेच तिर्थक्षेत्र धारतीर्थ सर्वांसाठी खुली करण्यात यावी अशी मागणी केली.

स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार, खासदार यांना विश्वासात घेऊनच विकास झाला पाहिजे यामुळे लोकांच्या समस्या भाविक पर्यटकांची समस्या आपल्याला मांडता येईल. समितीमध्ये समावेश होई पर्यंत अनौपचारिक मला प्रत्येक बैठकीला बोलवण्यात यावे अशी विनंतीही त्यांनी केली.

विकास आराखडा समितीच्या समावेशासाठी गरज पडल्यास न्यायालयात याचीका दाखल करू व लोणारचा लोणावळा करू असे आमदार खरात म्हणाले.

Lonarnews:यावेळी मा.नगराध्यक्ष भुषण मापारी, उबाठा शहरप्रमुख गजानन जाधव,काग्रेंसचे शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद, कृषि उत्पन्न बाजार समिति के सदस्य तेजराव घायाळ,राजु बुधवत ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष,प्रा.गजानन खरात, युवा तालुका प्रमुख जिवन घायाळ,गजानन मोरे,शालीक घायाळ,तानाजी मापारी, शे.करामत,एजाज खान,उबेद खान,परविन सरदार, उपस्थित होते.