Home Blog Page 147

शेगांव वैद्यकीय अधिकार्यास शिवीगाळ करत केबिन ची काच फोडली, मद्यपी चंद्रशेखर विरूध्द गुन्हा दाखल crimenews 

0

 

इस्माइल शेख बुलढाणा जिला प्रतिनिधि

शेगांव .स्थानिक खडकपुरा येथील चंद्रशेखर गणगणे यांनी मद्यधुंद अवस्थेत कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल पाटील यांना शिवीगाळ करत अपघात कक्षाचे काचा फोडून नुकसान केल्याची घटना दि.१०/१२/२०२३ रोजी रात्री दरम्यान घडली. असून दि..११/१२/२०२३ रोजी दुपारी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हकिकत अशाप्रकारे आहे की डॉ. अतुल गोपालकृष्ण पाटील वय ३८ वर्षे वैदयकीय अधिकारी स.मो.सा.रु. शेगांव रा. गांधीचौक शेगाव हे सामान्य रुग्णालय शेगाव वैद्यकीय अधिकारी म्हणून अपघात कक्षामध्ये कर्तव्यावर हजर असताना चंद्रशेखर विजय गणगणे वय ४० वर्षे रा खडकपुरा शेगाव याने दारू पिऊन वैद्यकीय अधिकारी यांना शिवीगाळ करून अंगावर धावून आला.

व शासकीय कामात अडथळा निर्माण केला व इतर कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालून शासकीय रुग्णालयातील अपघात कक्षातील कॅबिनची काच फोडून अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान केले.

याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल पाटील यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यावरून पोलीसांनी आरोपी चंद्रशेखर विजय गणगणे वय ४० वर्षे रा खडकपुरा शेगाव याचे विरुद्ध अप नं ६११ /२०२३ कलम ३५३,४२७, ५०४ भादवि अन्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोउपनि कुणाल जाधव हे करीत आहेत.crimenews

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघ राज्यव्यापी संपास वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव . महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांच्या दि. १४ डिसेंबर, २०२३ पासून राज्यव्यापी संपास वंचित बहुजन आघाडी कडून जाहीर पाठींबा देण्यात आला आहे.

मा.तहसीलदार यांचे मार्फत मा.मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे की
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघ निवेदनामधील मागण्या या संवैधानीक असून सदरच्या मागण्या मान्य व्हावे तसेच एन. पी. एस. रदद करन जुनी पेंशन योजना [ओ. पी. एस. ] लागू करावी व पी. एफ. आर. डी. र. कायदा रदद करण्यात यावा.कंत्राटी पध्दत बंद करन कंत्राटी कर्मचा-यांना नियमीत करण्यात यावे व समान काम समान वेतन लागू करावे.

राज्या कर्मचा-यांच्या हितासाठी उमादेवी – विरुध्द – कर्नाटक सरकार याबाबाच्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाची अंमलबजावणी व्हावी.खाजगीकरणाचे धोरण व आउटसोर्स पध्दत पुर्णत: कायम बंद करण्यात यावी.

लिपीक, लेखा, आरोग्य कर्मचारी, वाहन चालक, चतुर्थश्रेणी कर्मचारी, ग्रामसेवक व कर्मचा-यांच्या वेतनश्रेणीतील वेतन त्रुटी तात्काळ दूर करावी. चतुर्थश्रेणी कर्मचारी, वाहनचालक पदाच्या भरतीवरील बंदी उठवीण्यात यावी.

मंजूर आकृती बंधाप्रमाणे ४ लाख रिक्त पदे कायमस्वरूपी भरावी. शिक्षणाचे खाजगीकरण [दत्तक योजना व समुहशाळा पोजना] धोरण रदद करावे.

अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाअट करा, भरती प्रक्रिया वेत पुर्ण करण्यात पावी, यकीत महागाई भत्ता देण्यात यावा व ८ व्या वेतन
आयोगाचे गठन करण्यात यावे. कामगार कर्मचारी संघटनेचे लोकशाही अधिकार सुनिश्चीत करावे व त्यांचे विरोधी कायदे रदद करावे.

जि. प. कर्मचारी वेतन व निवृत्ती वेतन दरमहा १ तारखेला होण्याचे सक्त आदेश व्हावेत.अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले असून निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे ॲड. अनिल ईखारे, तालुका उपाध्यक्ष, विजय मोतीराम गवई, मोहन विश्वासराव कराळे, आशिष शामराव खंडेराव, रतन पुंडलिक सावदेकर,आशिष साहेबराव शेगोकार , संजय प्रकाश सुरवाडे आदींच्या सह्या आहेत vanchitbahujan

लाखपुरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची स्व.अरूण वानखडे यांच्या परिवाराची सात्वन पर भेट

0

 

अरुण वानखडे यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षासाठी ४० वर्षांपासून अविरत काम केले

प्रतिनिधी/मूर्तिजापूर
शाम वाळस्कर

तालुक्यातील लाखपुरी येथील वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावंत कार्यकर्ते अरुण वानखडे यांच दि.०७ डिसेंबर रोजी लाखपुरी येथे दुखद निधन झाले.अरूण वानखडे नेहमी गोर गरीबांचा मदतीला धावून जात असे त्यांच्या निधन झाले हि बातमी कळताच तालुक्यात शोककळा पसरली होती.

अरूण वानखडे यांच व्यक्तिमत्व,अभ्यासु,मनमिळावू,नेहमी हसत मुख व एक कुशल राजकारणी असुन कधी कोणाशी वैर नव्हतं.अरूण वानखडे सर्वांचे प्रिय होते.अरुण वानखडे गेल्या मुळे मुर्तिजापूर तालुका पोरका झाला.त्यांच्या जाण्याने त्यांची जागा कोणीही घेवू शकणार नाही.

त्यांच्या अंतिम यात्रेचा कार्यक्रम दि.०८ डिसेंबर रोजी होता,अरुण वानखडे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये सतत ४० वर्षांपासून कार्यरत करत होते.अरूण वानखडे यांच्या परिवाराचे सात्वन करण्यासाठी दि.०९ डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अरुण वानखडे यांच्या लाखपुरी या मुळ गावी जाऊन त्यांच्या राहत्या घरी मुलगा अशोक वानखडे व परिवाराची भेट घेतली, त्यांचे सात्वन केले.

या मध्ये उपस्थीती मध्ये वंचित बहुजन,कश्यप जगताप,दिलीप बुदगिरकर,संजय नाईक,भैय्यासाहेब तायडे,तालुका अध्यक्ष सुनिल सरदार,शहर अध्यक्ष तसवर खान,प्रधान गुरुजी,विनायक नवघरे,लियाकत पटेल,गोवर्धन जामनिक,लाखपुरी सरपंच राजप्रसाद कैथवास,दुर्गाताई भोपत,सचिन दिवनाले,तोताराम देशमुख,अरविंद जामनिक,दिपक जामनिक,अजय तायडे,दत्ता जामनिक,माणिकराव नवघरे,दत्तु वानखडे,गौतम वानखडे,तालुका प्रसिध्दी प्रमुख अतुल नवघरे सह संपुर्ण वानखडे कुटुंब व लाखपुरी सर्कलचे शकोडो वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते व गावकरि उपस्थित होते. vanchitbahujanaghadi

चौथ्या दिवशीही अन्नत्याग उपोषण सुरूच,शासन- प्रशासनाचे दुर्लक्ष जिवतीसह अनेकदा गावांतील बाजारपेठ बंद करून अन्नत्याग उपोषणाला व्यापारय्रांनी दिले समर्थन चौथ्या दिवशी शेकडो शेतकरी बांधवांची उपस्थिती

0

====================
✍️ कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
====================

जिवती :- अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पट्टयांच्या प्रमुख मागण्या सह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिवती तालुका भूमीहिन शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात ७ डिसेंबर 2023 पासून तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे.उपोषण कर्त्या शेतकरी पुत्रांची प्रकृती खालावली जात आहे.

आज राजुरा विधानसभा आमदार सुभाष धोटे, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर व उपविभागीय अधिकारी राजुरा तसेच जिवतीचे तहसिलदार यांनी उपोषणाला भेट दिली उपस्थित शेतकय्रांना मार्गदर्शन करून उपोषण कर्त्यांसी संवाद साधला, चर्चा केली मात्र मुख्य मागणी जमिनीच्या पट्टयांचा प्रश्नावर तोडगा निघाला नाही जोपर्यंत जिल्ह्याचे पालकमंत्री उपोषण स्थळी भेट देऊन जमिनीच्या पट्टयांचा प्रश्न निकाली काढणार नाही.

तोपर्यंत अन्नत्याग उपोषण मागे घेणार नाही असा ठाम निर्णय यावेळी घेण्यात आला.

मागील चार दिवसांपासून जिवती येथे सुरू असलेल्या अन्नत्याग उपोषणाला समर्थन देण्यासाठी जिवती शहर व इतर काही कडकडीत बंद करून विविध गावांतील शेकडो शेतकरी, शेतकरी पुत्र,व संपूर्ण व्यापारी बांधवांनी रॅली काढून प्रमुख मागण्या पुर्ण करण्यासाठी नारेबाजी करत उपोषण स्थळी भेट देत शासन प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केले.उपोषण कर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी विविध गावातून आलेल्या शेतकरी बांधवांना उपस्थित तरूण शेतकरी पुत्रांनी आपल्या तिव्र भावना मांडल्या.

पिढ्यांना पिढी पासून वास्तव्यास असलेल्या शेतकरी बांधवांना जमिनीचा मालकी हक्क व त्यांच्या इतर मागण्या तातडीने सोडविण्यासाठी विधानसभेत लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित करून जिवती तालुक्यातील प्रमुख मागण्या निकाली काढण्यात यावे यासाठी विनंती केली.जर शासन प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर शेतकरी आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरेल.शेतकरी रस्त्यावर उतरल्यावर होणाऱ्या परिणामांस शासन प्रशासनच जबाबदार असेल आणि येणाऱ्या निवडणुकीत संपूर्ण तालुक्याचं बहिष्कार करण्यात येईल.

येथे क्लिक करून पहावे

👇👇👇👇👇👇

सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र इंगळे यांना जिवे मारण्याची धमकी

असा इशारा सुध्दा यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांनी दिले.सुग्रीव गोतावळे, सुदाम राठोड, लक्ष्मण मंगाम, शब्बीर जागीरदार, मुकेश चव्हाण, विनोद पवार, प्रेम चव्हाण, विजय गोतावळे, दयानंद राठोड हे शेतकरी पुत्र अन्नत्याग बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत.आंदोलन कर्त्यांची प्रकृती खालावत आहे मात्र शासन प्रशासनाने जमिनीच्या पट्ट्यांच्या या मुख्य मागणीलाच बघल ठेवत असल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. Chandrpurnews

सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र इंगळे यांना जिवे मारण्याची धमकी

0

 

नरेंद्र इंगळे हे एक समाज कार्यकर्ता असून………………….
एका वर्षापूर्वी नरेंद्र इंगळे यांची चूक नसताना चंदन दयाराम घटे या व्यक्तीने दि. १२ जुलै २०२२ रोजी यांना जातीवादी शिवीगाळ करून काठीने मारहाण केली व तेव्हा नरेंद्र इंगळे हे बाळापूर पोलीस स्टेशन ला तक्रार करायला गेले असता तेव्हा त्यांचं मेडिकल पण झालेलं होत.

परंतु गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने मला समजावून सांगितले कि केस करू नको व चंदन घटे त्यानां माझ्या पाया पडून माफी मागायला लावली.या गोष्टीची खुन्नस मनामध्ये धरून तो व्यक्ती नरेंद्र इंगळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून म्हणजे तू ढेडल्या मला पोलीस स्टेशनला माफी मागायला लावली आता तुला तर जिवंत सोडणार नाही

. माझं एक एकर गेलं तरी चालेल आणि तुला खोट्या केसमध्ये फसवणार व माझे नावही कुठेही येणारं नाही कारण चंदन घटे हा व्यक्ती नेहमी बिमारीचे नाटक करून खोटे मेडिकल रिपोर्ट बनून आणतो. आणि लोकांना सांगतो की मी बिमार आहे याच गोष्टीचा फायदा घेऊन तो या प्रकरणातून निघण्याचा पर्यन्त करत आहे. आणि तो हे सगळं नरेंद्र इंगळे यांना बोलून दाखवलं आहे की माझ्या जवळ पैसा आहे आणि पोलीस स्टेशनला माझी खूप ओळखी आहे.

ह्या प्रकरणामुळे नरेंद्र इंगळे यांना मानसिक त्रास देत असल्याने ते ६ ते ७ महीने गावा बाहेर राहीले. काही महिन्यानंतर गावात आल्यावरही चंदन घटे इसम पुन्हा त्याच प्रकारे त्रास देत होता 20 जुलै 2023 ला पारस पोलीस चौकी ला लेखी तक्रार मागे घेतली तिसऱ्यादा चंदन घटे हे तिथेही हजर राहिले नाही त्यांनी बिमारीचे नाटक केल आणि चंदन घटे यांची पत्नी पारस पोलीस स्टेशन ला आल्या होत्या.

आणि त्यांनी आपल्या पती विषयी हमी दिली की आता यापुढे माझ्या पती कडून कुठलाही त्रास नरेंद्र इंगळे यांना होणार नाही. त्यामुळे इंगळे यांनी केस परत मागे घेतली परंतु त्यानंतर हा विषय अजुन गंभीर झाला. नरेंद्र इंगळे हे गल्लीतून जाता येतांना त्यांना बघून जातीय शिवीगाळ करणं व जिवंत मारण्याच्या धमक्या देणे हा प्रकार चंदन घटे या व्यक्तीकडून सुरूच आहे.

या गोष्टीमुळे नरेंद्र इंगळे पूर्ण पणे वैतागले आहे त्यांना कुठलेही काम करता येत नसल्यामुळे सतत ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता परंतु त्यांनी स्वतःला सावरले व विचार केला मी मेलो तर त्या व्यक्तीला चांगलंच होईल पण नुकसान स्वतःच आणि दुःख घरच्यांना होईल. तरीही यांना न्याय मिळेल या प्रतीक्षेत ते आहेत. कारण संबंधित व्यक्तीवर अजूनही कारवाही झालेली नाही.

त्याची कसल्याही प्रकारे चौकीशी झाली नाहीत्यामुळे त्याचा आजही तो मानसिक त्रास दिला जात आहे.१६ ऑक्टोंबर ला लेखी तक्रार केली आहे. पोलीस प्रशासनावर माझा विश्वास आहे मला न्याय मिळेल या प्रतीक्षेत आहे. Akolanews

लहुजी वस्ताद चौकामध्ये 45 वर्षीय महिलेचा वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल..crimenews 

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: एका 45 वर्षीय महिलेचा वाईट उद्देशाने हात धरून “तू मला आवडतेस” असे सांगून विनयभंग करणाऱ्या आरोपी विरुद्ध शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडितेने शेगाव शहर पोलीस स्टेशन तक्रार दिली की लहुजी वस्ताद चौका जवळ कटलरीची दुकान लावणाऱ्या श्याम गजानन चांदुरकर याने 45 वर्षीय महिलेचा वाईट उद्देशाने “तू मला आवडतेस” असे सांगितल्यावर मी आरडाओरड केली.

त्यावेळेस ओरडू नको असे सांगून काठी उचलून मारण्याची धमकी दिली अशा तोंडी तक्रारीवरून आरोपी शाम गजानन चांदुरकर विरुद्ध 354, 354 (1) 344 427 506 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://www.suryamarathinews.com/sindhujadhav/

अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील आंबुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे एएसआय गजानन गावंडे बकल नंबर 699 पोलीस कॉन्स्टेबल गजानन डाबेराव करीत आहेत  crimenews

शेवटी जिवन तोगरे याला न्याय मिळाला सिंधू जाधव हिला अँट्रॉसिटीच्या गुन्हात पोलिसांकडून अटक …. Sindhujadhav 

0

====================
कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी.
====================
जिवती –
पिट्टीगुडा उप पोलीस स्टेशन चे हद्दीत रुग्णसेवक जिवन राजाराम तोगरे रा.पाटागुडा याचा संशयास्पद मृतदेह 4 जून 2023 रोजी शेणगाव ते मरकागोंदी रोडचे बाजूला शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळ्यामुळे घटनास्थळीच पोस्टमार्टम करण्यात आले होते. मृत्यूबाबत तालुक्यात तसेच समाजात तर्क वितर्क लावले जात होते.

त्यामुळे याप्रकरणाचा तपास पिट्टीगुडा पोलिसांकडून जिवती पोलिसांकडे देण्यात आला. मृतकाचे नातेवाईकांनी घातपाताचा आरोप करून जिवन ला न्याय देण्यात यावा या करिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते.

https://www.suryamarathinews.com/shivsena/

त्यावरून जिवती पोलिसांनी सखोल तपास करून सिंधू जाधव हिला ऑॅट्रॉसिटीच्या गुन्हात अटक केली.असून पुढील तपास डिवाय एसपी गडचांदूर हे करणार आहेत.Sindhujadhav

जिवती तालुकातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा पार पडला shivsena 

0

====================
कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
जिवती –

मा. एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात व मा.किरण पांडव साहेब व जीह्याचे संपर्क प्रमुख मा.गंगाधर बडुरे साहेब, चंद्रपूर जिल्हा प्रमुख मा.बंडू भाऊ हजारे यांच्या मार्गद्शनाखाली दिनांक 9/12/2023 रोज चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुका मध्ये शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा पार पडला.

जिवती तालुक्यातील जनतेला व शेतकऱ्यांना आपल्या येणाऱ्या अडचासाठी येणाऱ्या शासकीय कार्यालय व शासकीय योजना व शासकीय दवाखान्यात येणाऱ्या अडचणीत सर्वसाधारण लोकांना अडचणीचा सामना करावा लागतो व त्यांना योग्य ती माहिती मिळत नाही त्यासाठी त्यांना योग्य ती माहिती तत्काळ मिळावी आणि लवकरात लवकर सर्वसाधारण लोकांच्या समक्ष्या दूर करण्यासाठी जिवती येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. शिवाजी वाघमारे उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून मा. लक्ष्मण तोगरे उपस्थित होते.
आज खऱ्या अर्थाने जिवती तालुक्यात सर्वसामान्य जनते साठी अडचणीचा सामना करावा लागणार नाही जेव्हा जेव्हा जिवती तालुक्यातील जनतेला अडचण पडेल तेव्हा तेव्हा शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे माध्यमातून आवाज उठऊन तालुक्यातील जनतेला शेतकऱ्यांना तत्काळ न्याय मिळवून देण्याचं काम करू असे शिवसेना तालुका प्रमुख भरत ज्ञानोबा बिरादार व तालुका संघटक गणेश पवार यांनी आपले मनोगत वेक्त केले व तालुक्यात शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

यादव भालेराव,दगडू मोतेवड, रमेश मेश्राम,मोहन आत्राम , ,ज्ञानेश्वर भाऊ,गुरु छपरे ,राकेश राठोड. Shivsena

डोबाळवेस माळीपुरा भागात47 वर्षीय शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या..सततची नापिकी व बँकेच्या कर्जापाई आत्महत्या केल्याची चर्चा..

0

 

इस्माईलशेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: सततची नापिकी व कर्जत वाई 47 वर्षीय शेतकऱ्यांनी ढबाळवेस माळीपुरा भागात राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीकृष्ण लोखंडे शेतकरी डोबाळवेस माळीपुरा भागात राहत होते,

त्यांच्यावर सेंट्रल बँकेचे सव्वा लाख रुपये व मृतकाची आई पार्वती बाई लोखंडे यांच्या नावे सव्वा लाख असे एकूण अडीच लाख रुपये बँकेचे कर्ज असल्याने कर्ज कसे फेडावे या चिंतेत श्रीकृष्ण लोखंडे राहत होते निसर्गाच्या लहरीपणामुळे सततच्या नापीके मुळे श्रीकृष्ण लोखडे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली सततच्या नापिकीमूळे बँकेच्या कर्जाची परतफेड करता येत नसल्याच्या कारणाने चिंतीत असलेल्या श्रीकृष्ण लोखंडे या 47 वर्षीय स्वतःच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

या घटनेतील मृतक श्रीकृष्ण सुखदेव लोखंडे वय ४७ हे शेतकरी होते. मात्र सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर असलेल्या बँकेच्या कर्जाची परतफेड करणे त्यांच्याकरिता कठीन होऊन बसले होते. त्यामुळे ते नेहमी चिंताग्रस्त राहायचे,

त्यामुळे परिस्थितीला कंटाळून त्यांनी आज सकाळी १० वा सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा असा आप्त परिवार आहे.

अवघ्या 24 तासात मोबाईल चोरटा मुद्देमाल सह केला गजाआड प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांची पुन्हा दमदार कामगिरी crimenews 

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

सविस्तर वृत्त असे की अमोल दिलीप ढोले वय 35 वर्ष राहणार हिवरखेड़ तह- तेल्हारा जिला अकोला हे शेगाव येथे दर्शनासाठी आले होते दर्शन झाल्यानंतर थकल्याने ते रेल्वे स्टेशन शेगाव च्या बुकिंग ऑफिस ला झोपले असता.

कुणी अज्ञात चोरट्याने त्यांचा लावा मोबाईल खिशातून चोरून नेला याची माहिती नेहमीच आपल्या दमदार कामगीरी ने चर्चेत असलेले शेगाव चे प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांना मिळताच त्यांनी सीसीटीव्ही चेक करून चोरट्याला ओळखले व रात्रभर आपली सूत्र कामाला लावून स उ नि प्रकाश गावंडे व प्रवीण डहाके यांच्या सोबत शोध घेऊन अवघ्या चोवीस तासात.

गजानन रमेश गायकवाड वय 24 वर्ष निवासी बुद्ध विहार जवळ हरिहर पेठ अकोला ला चोरी केलेल्या मोबाईल समवेत पकडले व उपनिरीक्षक डाँ विजय साळवे यांच्या ताब्यात दिले वरून विजय साळवे यांनी कायदेशीर कारवाई करत आरोपीस रेल्वे पोलीस च्या ताब्यात दिले तिथे त्यावर अपराध क्रमांक 0380/2023 कलम 379 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवघ्या चोवीस तासात रंजन तेलंग यांनी केलेल्या या कारवाई चे सर्वत्र कौतूक होत आहे. Crimenews