Home Blog Page 117

आपल्या फॅनच्याच प्रेमात पडला हा अभिनेता, खूपच रोमॅन्टिक आहे यांची लवस्टोरी ( lovestory )

0

 

सध्या सर्वत्र गाजत असलेली मराठी मालिका “ठरलं तर मग” यामधील सर्वांचा फेवरेट अर्जुन म्हणजे अमित भानुशाली.

lovestory: त्याचा विनोदी अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो. अर्जुन आणि सायली चा मराठी प्रेक्षक वर्ग प्रचंड प्रमात आहेत. परंतु अमितची खरी सायली कोण? हे तुम्हांला ठाऊक आहे का बरं??

अभिनेता अमित भानुशाली हा ९ वर्षांपूर्वीच श्रद्धा सोबत विवाह बंधनात अडकला. त्या दोघांनी प्रेमविवाह केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रद्धा ही अमितची खूप मोठी फॅन होती.

मुंबईतील डोंबिवली स्टेशनवर एक गुजराती मुलगा आणि एक मराठी मुलगी अशी दोघांची लवस्टोरी सुरू झाली. अमित व श्रद्धा पहिल्यांदा डोंबिवली स्टेशनवर भेटले. श्रद्धा लेडीज कंपार्टमेंट मध्ये चढली व अमित जनरल डब्ब्यात चढला.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

मधल्या जाळीतून दोघेही एकमेकांना पाहत होते. अमित त्यादरम्यान “मन उधाण वार्याचे” या सिरीयल मध्ये काम करत होता. त्यामुळे श्रद्धाने त्याला ओळखले. तिने घरी आल्यावर ताबडतोब त्याला सोशल मीडियावर शोधायला सुरूवात केली. मात्र त्याचे खरे नाव तिला काही सापडेना.

पुढे ती म्हणाली की, शेवटी मी घरी सगळे जेवण वगैरे आवरून झाल्यावर रात्री १ वाजता तिला त्याचं खरं नाव सापडले. त्यानंतर तिने रात्री १ वाजता त्याला फेसबुकवर मेसेज केला.

की तिला त्याचे काम खूप आवडते. ऑल द बेस्ट डिअर… सकाळी ४ वाजता अमिताभ तिच्या मेसेजला रिप्लाय दिला. त्यानंतर दोघांनी एकमेकांशी गप्पा मारत मोबाईल नंबर एक्सचेंज केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

काही दिवसांनी त्यांना समजले की, ते दोघेही एकमेकांच्या जवळपास सोसायटीत राहतात. कालांतराने त्यांची एकमेकांशी मैत्री झाली व त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर अमित भानुशालीने श्रद्धाला प्रपोज केले.

lovestory:फक्त १५ दिवसांच्या रिलेशनशिप नंतरच ते थेट विवाहबद्ध झाले.

चितोडा जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा घसरला गटविकास अधिकारी यांना निवेदन ( Zilla Parishad )

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

चितोडा या गावांमध्ये जिल्हा परिषद मराठी मुलां मुलीची शाळा असून या शाळेची स्थापना 14/01/1913 साली झाली आहे या जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेला तब्बल 111 वर्ष पूर्ण झाले असून.

या गावात शैक्षणिक दर्जा घसरलेला दिसून येतो असे लेखी निवेदन यावल येथील गटविकास अधिकारी व शिक्षण विभागातील गटशिक्षणअधिकारी यांना तक्रारीचे निवेदन किरण मुलचंद तायडे रा. चितोडा ता यावल यांनी दिले आहे या शाळेत पहिले ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना एक ते शंभर पर्यंत अंक सुद्धा येत नाही . तसेच बाराखडी सुद्धा वाचता येत नाही.

अशी परिस्थिती शिक्षण क्षेत्रात झाली आहे त्यातच यावल तालुक्यातील चितोडा येथे जिल्हा परिषद मराठी मुला मुलींची शाळा असून या ठिकाणी सध्या 44 विद्यार्थी शिक्षण घेत आहे .44 विद्यार्थ्यांसाठी येथे दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

परंतु वास्तविक पाहता एकाही विद्यार्थ्याला एक ते शंभर पर्यंत बाराखडी सुद्धा वाचता येत नाही.यावरून असे सिद्ध होते की या शाळेत शैक्षणिक दर्जा घसरला असून शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे .Zilla Parishad

शैक्षणिक दर्जा वाढण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत परंतु या ठिकाणी त्या उपक्रमांची देखील पायमल्ली होताना दिसत आहेत मुलांच्या पिण्याच्या पाण्याची टाकी देखील बऱ्याच दिवसापासून साफ केली नसून टाकीमध्ये सुद्धा घाण साचली आहे .

बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालक हे मोलमजुरी करणारे आहेतअशिक्षित असल्यामुळे ते विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ शकत नाही परंतु ज्या शिक्षकांवर विश्वास ठेवून त्यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला ते शिक्षक आज राजपत्री अधिकारी झालेले दिसून येतात त्यांच्या मर्जीनुसार शाळेमध्ये ये जा करतात आपल्याला एक ते दीड लाख रुपये पगार मिळतो.

आपल्याला या गोरगरीब विद्यार्थ्यांचे काय घेणेदेणे आहे अशा बोगस शिक्षकांचे संपूर्ण कागदपत्रे तपासण्यात यावे तसेच हे शिक्षक कोणत्या वर्षी जिल्हा परिषद मध्ये रुजू झाले यांच्या संपूर्ण कागदपत्राची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पडताळणी करावी व यांच्या सेवा पुस्तकांमध्ये तशी नोंद घ्यावी.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरगरीब पाल्यांचे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम प्रथम राज्यात राबवण्यात आला या चितोड्या गावामध्ये जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेची दयनीय अवस्था आज रोजी आपल्याला पाहायला मिळत आहे.

माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाला चितोडा जिल्हा परिषद च्या शाळेने दिली केराची टोपली शिक्षण क्षेत्रात खळबळ अशा शिक्षकांवर कारवाई होणे गरजेचे असे निवेदनामध्ये म्हटले आहे चितोडा येथील शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नसतील तर गरीब विद्यार्थ्यांनी करायचे काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.

तरी या गंभीर विषयाकडे यावल येथील गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी श्री विश्वनाथ धनके साहेब व जळगाव येथील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव या विभागाने लक्ष देण्याची गरज आहे .

Zilla Parishad: यामुळे गोरगरीब पाल्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा दर्जा हा इतर शाळांपेक्षा दर्जेदार व्हायला पाहिजे इतर शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी जिल्हा परिषद मध्ये प्रवेश घेतील याची व जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा शिक्षणाच्या दर्जा वाढेल अशी शिक्षकांनी सुद्धा दक्षता घ्यावी

भाड्याचे पैसे मागीतल्याने ऑटो चालकास मारहाण, एका विरूध्द गुन्हा दाखल ( crimenews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

crimenews:शेगांव भाडयाचे ठरवलेले 200 रुपये दे असे म्हटले असता आरोपी याने ऑटो चालकास बाजुला पडलेली विटेचे तुकडा हातात घेवून फि चे कपाळावर उजव्या डोळ्याच्यावर मारून जख्मी केल्याची घटना दि. १८ मार्च २०२४ रोजी रात्री ८ वा सुमारास सुरभी कॉलनी येथे घडली.

हकीकत अशी आहे की, ऑटो चालक संजय उत्तम माळी वय- ३८ वर्षे रा.झाडेगांव हे शेगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजर असतांना प्रकाश सुरेश मेतकर रा. सुरभी सुरभी कॉलनी शेगांव हा या ठिकाणी आला व फिला म्हणाला की मला नविन कुलर घ्यायचे आहे ट्रिप मारता काय असे म्हटले त्यावेळी फि ने त्याला हो म्हणूण त्याचे सोबत भाड्याचे २०० रुपये ठरवले होते.crimenews

त्याचे सोबत फि चे अॅटोने खामगाव रोडवर असलेल्या मोहता यांचे गोडावून वर गेलो तेथून त्याने कुलर घेतला व सदर कुलर आम्ही माझे अॅटोमध्ये टाकून त्याचे घरी सुरभी कॉलनी येथे गेलो.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

कुलर अॅटोमधून खाली उतरल्यावर त्याला फि ने भाड्याचे पैसे मागीतले असता त्याने फिला ५० रुपये दिले. त्यावर फि ने त्याला २०० रुपये ठरवले होते असे म्हटले असता त्याने फिला घ्यायचे असतील तर घे नाहीतर निघ ईथून असे म्हणून शिवीगाळ केली.फि ने त्यास शिवीगाळ करुन नको माझे भाडयाचे ठरवलेले २०० रुपये दे असे म्हटले असता आरोपी याने फिला बाजुला पडलेली विटेचे तुकडा हातात घेवून फि चे कपाळावर उजव्या डोळ्याच्यावर मारले .

परत पैसे मागशिल तर तूला जिवाने मारुन टाकील अशी धमकी दिली.या प्रकरणी – संजय उत्तम माळी वय- ३८ वर्षे, व्यवसाय ऑटो चालक रा. झाडेगांव ता. शेगांव यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तोंडी रिपोर्ट व मेडीकल प्रमाणपत्रावरून वरुन आरोपी

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

crimenews:सुरेश मेतकर रा. सुरभी सुरभी कॉलनी शेगांव ता शेगाव याचे विरुद्ध अप नं १३३/२०२४ कलम ३२४,५०४,५०६ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ सुनील सुसर हे करीत आहेत.

इंडस्ट्रीमधील या एकाच गोष्टीचा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला आहे प्रचंड तिरस्कार ( sonaleekulkarni )

0

 

मराठी इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे संपूर्ण जगभरात प्रचंड चाहते आहेत. सोनालीने आज चाहत्यांच्या मनात स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तिचा मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग निर्माण झालेला आहे. सोनालीने नुकतेच “झी मराठी” चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लावली होती.

या पुरस्कार सोहळ्यात सोनालीचा मराठमोळा अनोखा अंदाज सर्वांना पाहायला मिळाला. यादरम्यान सोनालीने तिला इंडस्ट्रीमधील मुळीच पटत नसलेल्या गोष्टी सांगितल्या.

मराठी मनोरंजनसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना “झी मराठी चित्र गौरव” पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. २०२४ च्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील सहभागी झाली होती. यादरम्यान सोनाली एका अप्रतिम लूकमध्ये सर्वांना दिसली.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

सोनालीने मीडियाशी बोलताना अनेक गोष्टींवर चर्चा केली. यावेळी सोनाली म्हणाली, “या प्रोफेशन मधील सर्वात कंटाळवाणी गोष्ट म्हणजे मेकअप करणे. मला मेकअप करायला भयंकर कंटाळा येतो. मला जर खरंच शक्य झाले असते तर मी मेकअप न करताच साध्या कपड्यांवर रेड कार्पेटवर हजेरी लावली असती.

असे बरेचजण करतात, त्यामुळे मलाही तसे करायला नक्कीच आवडेल.”अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही खूप सुंदर व सुरेख अभिनेत्री आहे.( sonaleekulkarni )

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आतापर्यंत तिने कित्येक चित्रपटांत काम केले आहे. त्यापैकी हिरकणी, मितवा, धुरळा, तमाशा लाईव्ह, नटरंग हे तिचे गाजलेले काही चित्रपट आहेत.

sonaleekulkarni:सोनाली ही संपूर्ण महाराष्ट्रात अप्सरा म्हणून ओळखली जाते. नुकतीच ती साऊथ चित्रपटात दिसली आहे. तर आता लवकरच ‘मोगल मर्दिनी ताराराणी’ या चित्रपटात देखील झळकणार आहे.

अधिकाऱ्यांनी जप्त केलेले वाहान गेले तरी कुठे? , गौणखनिजाची वातुक करणारे शासन जप्तीतील वाहान असुरक्षित जबाबदार कोण ? ( Revenuenews )

0

 

विकी वानखेडे यावल

Revenuenews:आवारात जप्त केलेले वाहन हे अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याचे उघडकीस


येथील तहसील कार्यालयाच्या आवारात असलेले जप्त केलेले वाहन हे अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याचे उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, किनगाव परिसरात दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ रोजी महसूल खात्याच्या पथकाने केलेल्या कारवाईत अशोक लेलँड कंपनीचे वाहन हे अवैध गौणखनिजाजी वाहतूक करतांना आढळून आले होते.Revenuenews

या प्रकरणी कार्यवाही करून सदर वाहन जप्त करण्यात आले होते. तर, हे वाहन तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेले होते.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

 

दरम्यान, आज पहाटे चार वाजेच्या सुमारास भूषण विठ्ठल कोळी, विठ्ठल भाऊलाल कोळी व स्वप्नील तुषार कोळी यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात प्रवेश करून सीसीटिव्हीचा कॅमेरा काढून टाकत नंतर आवारात लावलेला ट्रक पळवून नेला.

या प्रकरणी किनगाव येथील कोतवाल गणेश रमेश वराडे यांनी यावल पोलीस स्थानकात फिर्याद दिली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यानुसार, भूषण विठ्ठल कोळी, स्वप्नील तुषार कोळी आणि विठ्ठल भाऊलाल कोळी ( सर्व रा. रिधूर, ता. जळगाव) यांच्या विरोधात भादंवि कलम ३७९, ३४१, ४२२ तसेच गौणखनिज कायद्यातील कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Revenuenews:: या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासीम तडवी हे करत आहेत.

बुलढाण्यात शिवसेनेतच लढत होण्याची चिन्हे! तीन दशके एकत्र झुंजले, आता एकमेकांना आव्हान ( lok sabha election )

0

 

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक )

बुलढाणा: गल्ली ते दिल्ली पर्यंत गाजत असलेला महायुती मधील जागा वाटपाचा संभ्रम दूर झाला असून ही जागा शिंदेगटाला मिळाल्याचे संकेत मिळाले आहे. यापूर्वी आघाडीत ही जागा ठाकरे गटाला सुटल्यात जमा आहे.

यापरिनामी मागील ३ दशकांपासून एकत्र लढणारी शिवसेना आणि लाखो शिवसैनिक आता एकमेकांविरोधात लढणार आहे. यापरिनामी बुलढाण्याचे रणांगण कुरुक्षेत्र ठरणार आहे.
मिशन- ४५ अंतर्गत भाजपने केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली एक वर्षापूर्वी बुलढाण्यात दावारूपी प्रवास सुरु केला. सहा भेटीत यादवांनी अख्खा मतदारसंघ पालथा घातला. याद्वारे मित्रपक्ष असलेल्या शिंदे गट व खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर दवाब निर्माण करण्यात भाजपा यशस्वी ठरली. यामुळे जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरला. मात्र सलग सहा टर्म (मेहकर विधानसभा व बुलढाणा लोकसभा ) मैदान मारणारे खासदार जाधव अविचल राहिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे राहिले. शेवटी’ निकालाचे नंतर पाहू, पण बुलढाणा आमचाच’, या शब्दात त्यांनी भाजपला सुनावल्याचे समजते. यामुळे अंतिम तडजोडीत बुलढाणा आपल्याकडे राखण्यात आम्ही यशस्वी झाल्याचे, या घडामोडीत संलग्न वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले. उद्या किंवा परवा शिंदे गटाची यादी जाहीर होऊन त्यात जाधव यांचे नाव पहिल्या क्रमांकावर राहील असा दावाही त्यांनी बोलून दाखविला.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

दुसरीकडे मागील तीन दिवसापासून खासदार जाधव यांनी बुलढाण्यातील संघ परिवार, ज्येष्ठ भाजप पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेण्याचा धडाका लावला आहे. त्यापूर्वी चिखली, जळगाव जामोद, खामगाव, सिंदखेडराजा या मित्र पक्षांच्या मतदारसंघात विकास कामांचे उदघाटन, लोकार्पण व भूमीपूजन यांचा धडाका लावला. यामुळे ही जागा शिंदे गटाला मिळणार या चर्चेला पुष्टी मिळाली.

आचारसंहितेपूर्वीच्या ‘कॅबिनेट’ मध्ये खामगाव जालना रेल्वेमार्गासाठीच्या पन्नास टक्के वाट्याला मान्यता देऊन मुख्यमंत्र्यांनी पाठबळ दिले. या सर्व बाबी जागा शिंदे गटाला सुटल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे ठाकरे गटाला ही जागा जवळपास सुटली असून २० मार्चच्या बुलढाणा दौऱ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उमेदवाराची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे lok sabha election

..आता आमने सामने

या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात सेनेच्याच दोन गटात युद्ध होण्याची चिन्हे आहेत. एकप्रकारे ही लढत ठाकरे विरुद्ध शिंदे अशी राजकीय प्रतिष्ठेचे युद्ध ठरण्याची चिन्हे आहे. २० तारखेपर्यंत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

असा आहे इतिहास

नव्वदीच्या दशकात अगदी दूरवरच्या बुलढाण्यात एकसंघ शिवसेना फोफावली. १९८९ च्या आसपास मेहकरात झालेली सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा जिल्ह्यात सेनेचे भगवे वादळ आणणारी ठरली. तत्कालीन जिल्हा प्रमुख दिलीप रहाटे व त्यांचे सहकारी ( खासदार) प्रताप जाधव यांनी सभा लावली होती. याचे प्रत्यंतर १९९० च्या सभेत आले. बुलढाणा ( राजेंद्र गोडे) व जळगाव ( कृष्णराव इंगळे) हे दोन आमदार निवडून आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

भाजप सोबतच्या युतीनंतर १९९५ मध्ये विजय शिंदे( बुलढाणा), प्रताप जाधव( मेहकर) हे आमदार झाले. यानंतर सेनेची घोड दौड कायम राहिली. १९९६ मध्ये बुलढाणा लोकसभा पदरी पडल्यावर सेनेने थेट २०१९ पर्यंत बाजी मारली.

lok sabha election ):मात्र आता पुलाखालून बरेच पाणी नव्हे एकसंघ पुलंच वाहून गेलाय! यंदाच्या लढतीत सेनेची ही शकले एकमेकांविरुद्ध उभी ठाकण्याची दाट शक्यता आहे. असेच झाले तर, किमान जिल्ह्यात असली सेना कोणती? हा फैसला लागणार आहे…

शेगावात पकडला सव्वा सहा किलो गांजा ७६ हजार रू मुद्देमाल जप्त ( crimenews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव शहरातील जिजामाता नगर मध्ये एका दुकानावर गुंगिकारक औषधद्रव्य (Narcotic drugs) गांजा जवळ बाळगून विक्री केल्या जात असल्याचे माहिती वरून शहर पोलिसांनी १४ मार्च रोजी रात्री छापा टाकला असता ६ किलो २६९ ग्राम गांजा किंमत ७५२२८ रुपयाचा मुद्देमाल व नगदी १६२० रुपये असा एकून ७६८४८ रुपयेचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे .

याप्रकरणी एका आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.याबाबत शहर पोलिस स्टेशनचे (Police Station)सपोनी श्रीकांत माधवराव इंगोले वय ४० वर्ष यांनी फिर्याद दिली.

यात त्यांनी नमूद केले की प्राप्त माहिती वरून गोपाल रामदास तायडे वय २९ वर्ष रा. डगडाळीपुरा जिजामाता नगर शेगाव यांचे टिनाचे टपरी दुकान डगडाळीपुरा जिजामाता नगर शेगाव येथे१४ मार्चचे रात्री ८ ते ९.४६ वा.दरम्यान शासकीय पंच व राजपत्रीत अधिकारी यांच्या समक्ष कायदयाचे सर्व नियमाचे पालन करुन रेड केला असता.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

त्याच्या ताब्यातून हिरवट, काळसर, कळीदार बिजा असलेला गांजा वजन 6.269 कि. ग्रॅम एकून किमती 75228/- रुपये चा मुद्देमाल व नगरी 1620 रुपये असा एकून 76848 रुपयेचा मुद्देमाल पंचासमक्ष ताब्यात घेवून जप्त करण्यात आला.crimenews

संपूर्ण जप्ती पंचनामा कार्यवाहीचे फोटोग्राफी (Photograph) करण्यात आलेली आहे. नमूद आरोपी याचे सदर कृत्य कलम 20 (ब) (2) गुंगीकारक औषधिद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये गुन्हा होत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Crimenews :असल्याने यांच्यावर अप नं. 127/2024 कलम 20 (ब) (2) गुंगीकारक औषधिद्रव्य आणि मनोव्यापारावर (Drugs and Psychotherapy) परीणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 नुसार गुन्हा १५ मार्च रोजी नोंदवण्यात आला.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज! तयारी अंतिम टप्प्यात (voternews )

0

 

बुलढाणा: बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभाग व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहे.voternews

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किरण पाटील व उप जिल्हाधिकारी ( निवडणूक) सुहासिनी गोनेवार यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी करण्यात येत आहे.ही तयारी आता अंतिम टप्प्यात आहे.

मागील कमीअधिक एक वर्षापासून निवडणूक विभागातर्फे लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. नायब तहसीलदार संजय बनगाळे, अव्वल कारकून जीवन ढोले, राम जाधव , संजय खुळे, प्रमोद राठोड, अमोल वानखेडे, रत्नाकर झिने, प्रदीप फोलाने आदी या कामाला लागले आहे
तेरा तहसिलमधील निवडणूक कक्ष देखील कामाला भिडले . मतदार यादी कार्यक्रम राबवून जानेवारी २४ मध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.

आमीर व रीना यांच्या घटस्फोटाचे कारण मी नाही, किरण रावने सांगितले स्पष्ट शब्दांत ( Amirkhankiranrao )

voternews:जिल्ह्याची मतदार संख्या २० लाख ५३ हजार आहे. सध्या निरंतर मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यातील नवीन मतदारांची पुरवणी यादी करण्यात येणार आहे. जिल्ह्याला आवश्यक ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, मशिन प्राप्त झाल्या असून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. बहुतेक मतदान साहित्य मिळाले आहे.

२२६६ मतदान केंद्र

👇👇👇👇👇👇👇
जिल्ह्यात यंदा २२६६ मतदान केंद्र राहणार आहे. आवश्यक कर्मचारी नेमण्यात आले असून त्यांना कामांचे वाटप करण्यात आले आहे. मतमोजणी बुलढाणा येथील आयटीआय मध्ये होणार असून स्ट्रॉंग रूम तयार करण्यात येत आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सलग दुसऱ्या लढतीची धुरा महिला अधिकाऱ्याकडे*
दरम्यान सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीची धुरा महिला अधिकाऱ्याकडे आहे.मागील लढतीची जवाबदारी गौरी सावंत यांनी उत्कृष्टपणे सांभाळली होती.

voternews:यंदा डिइओ सुहासिनी गोनेवार यांनी ही जवाबदारी समर्थपणे पेलली आहे. जिल्हाधिकारी डॉ पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या तयारीचे सुसज्ज नियोजन केले. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर त्यांचा कटाक्ष आहे. यामुळे इतर जिल्ह्याच्या तुलनेत बुलढाणा तयारीत पुढे आहे.

दसरा नगर परिसरातून 6150 रुपयाचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल ( crimenews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात पोलिसांनी छापा मारून 6150 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त केला आहे.

याबाबत शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव शहर पोलिसांना गुप्त व खात्रीशिर माहिती मिळाली की दसरा नगर भागामध्ये प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

या माहितीवरून पोलिसांनी उपरोक्त ठिकाणी छापा मारला असता सुगंधी युक्त प्रतिबंधित बहार खानदानी पान मसाला असे लिहिलेले 39 प्लास्टिक पाकीट, तसेच बिएचआर तंबाखू असा एकूण सहा हजार 150 रुपयाचा माल जप्त केला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Crimenews :याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन वाघमारे बकल नंबर 742 यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वैभव सुकडा तळोकार वय 24 राहणार दसरा नगर शेगाव विरुद्ध 128/24 कलम 328, 188 ,272, 273, सह कलम 26 (2) (1) 26 (2) (आय व्ही )59 सुरक्षा मानके कायदा सन 2006 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पीएसआय काटकाडे साहेब करीत आहेत

आमीर व रीना यांच्या घटस्फोटाचे कारण मी नाही, किरण रावने सांगितले स्पष्ट शब्दांत ( Amirkhankiranrao )

0

 

 

किरण राव ही सध्या तिच्या “लापता लेडीज” या चित्रपटामुळे प्रसिद्धीत आहे. तिने आपला एक्स पती आमीर खान याच्यासोबत या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

“लापता लेडीज” च्या प्रमोशन दरम्यान किरण व आमीर हे दोघेजण बरेचदा एकमेकांसोबत दिसले. यादरम्यान किरण आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना दिसली. आमीर खानने आपली पहिली पत्नी रिना दत्ता हिला २००२ मध्ये घटस्फोट दिला.Amirkhankiranrao

या घटस्फोटावर काहींचे म्हणणे होते की, किरण राव त्यांच्या या घटस्फोटाला जबाबदार होती. परंतु नुकत्याच झालेल्या मुलाखतीत किरण रावने स्वतः स्पष्टपणे सांगितले की, माझ्यामुळे आमीरने घटस्फोट घेतला, असे लोकांचे म्हणणे आहे.

मात्र हे पूर्णपणे खोटे आहे.”लगान” चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आम्ही दोघे एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. याच काळात आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आम्ही फक्त २-३ वेळाच बोललो, यावर तर कुणाचा विश्वास सुद्धा बसणार नाही. २००४ मध्ये आम्ही एकमेकांसोबत बाहेर जायला सुरुवात केली.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

 

Amirkhankiranrao:तेव्हा आमीर मंगल पांडे चे शूटिंग करत होता.किरण राव आणि आमीर खान हे २००४ मध्ये विवाहबंधनात अडकले.

त्यांना आझाद नावाचा मुलगा देखील आहे. त्यानंतर २०२१ मध्ये आमीर व किरण एकमेकांच्या परवानगीने वेगळे झाले. किरण म्हणते की, माझ्यासाठी माझा मुलगा सर्वात महत्वाचा आहे, त्याला कोणत्याही गोष्टीमुळे त्रास होणार नाही, याची मी सर्व प्रथम काळजी घेते.