Home Blog Page 124

गोवंश ची निर्दयपणे वाहतूक करणारे वाहन शेगाव येथील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.( shegaonnews )

0

 

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मधून गोवंशाची निर्दयपणे वाहतूक करणारे वाहन शहर पोलिसांनी जप्त करून आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हादाखल करण्यात आले आहे.

याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलिसांना माहिती मिळाली की टाटा एस कंपनीचे क्र. MH-04- FU-5535 मालवाहू वाहनमध्ये 03 बैल व 02 गोरे असे गोवंश जनावरे हे निर्दयतेने कोबुंन वाहतूक होत आहे.

या मिळालेल्या माहितीवरून शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत ठाकरे यांच्या आदेशान्वये पोलीस पथकांनी सदर ठिकाणी जाऊन टाटा एस कंपनीचे क्र. MH-04- FU-5535 मालवाहू वाहनाची पाहणी केली असता.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

वाहनमध्ये 03 बैल व 02 गोरे असे गोवंश जनावरे हे निर्दयतेने कोबुंन वाहतूक करण्यात येत असल्याचे दिसून आले याबाबत उपयुक्त वाहन गोवंशयासह ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आले.

 

shegaonnews:पो.हे.कॉ. संतोष गवई ब.न. 715 यांच्या फिर्यादीवरून आरोपी – जमील खान बुडनखान वय २८ वर्षे रा. ईदगाह प्लॉट विरुद्धअप न. 98/2024 कलम 11 (घ) (ड) (च) नियम कुरतेने वागविण्यास प्रतिबंध आणि 1960 सह कलम 130/177 मो.वा.का. अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोहेकाँ वाघमारे बन 742 हे करीत आहेत

तुटपुंज्या वेळेत हवं आहे चेहर्यावर चकमकीत सौंदर्य, तर मग Follow करा या हटके ट्रिक्स ( Beauty )

0

 

सर्वांनाच आपण चार-चौघात अगदी उठून दिसावे, असे वाटत असते. त्यासाठी मार्केट मधील नवनवीन प्रोडक्टस आपण वापरून बघतो.

मात्र बरेचदा आपल्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध नसतो. त्यावेळी अतिशय कमी वेळात तुम्ही अगदी घरबसल्या सुंदर त्वचा मिळवू शकता. त्यासाठी आम्ही काही हटके उपाय तुम्हांला सांगणार आहोत.

बेसन फेसपॅक एका वाटीत एक चमचाभर बेसन घ्या. त्यात थोडीशी हळद आणि कच्चे दूध घाला. हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्या.

हा फेसपॅक चेहर्याला आणि मानेला लावा. थोड्या वेळाने चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. त्याचप्रमाणे तुम्ही पपईचा सुद्धा वापर करू शकता. त्यासाठी ४-५ पपईचे लहान तुकडे नीट मॅश करून घ्या.

 

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

त्यात चिमूटभर चंदन पावडर घालाघाला आणि चमचाभर गुलाबजल टाकून मिसळून घ्या. हा फेसपॅक चेहरा आणि मानेला लावा. १०-१५ मिनिटांनंतर साध्या पाण्याने चेहरा वॉश करा. हा फेसपॅक आठवड्यातून २-३ वेळा करा.

लिंबू फेसपॅक चेहर्यावर झटपट चमक येण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मधाचा वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात लिंबाचा रस घ्या व त्यात थोडे मध घाला. ३० मिनिटे त्वचेवर असेच लावून ठेवाठेवा व नंतर चेहरा धुवून टाका. असे केल्याने त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते.

दही फेसपॅक एका भांड्यात १ चमचा टोमॅटो पेस्ट आणि २ चमचे दही मिक्स करून घ्या. हा फेसपॅक चेहर्याला आणि मानेला १५-२० मिनिटे असाच लावून ठेवा. नंतर चेहरा धुवून टाका.टोमॅटो मध्ये ॲंटीएजिंग गुणधर्म असतात.

 

त्यामुळे त्वचेवर चमक येते. तसेच दही त्वचा स्वच्छ आणि तरूण ठेवते. त्यामुळे त्वचा तुकतुकीत दिसू लागते.
कॉफी फेसपॅक एक चमचाभर कॉफी आणि कोको पावडर एका भांड्यात मिसळा. त्यात २ थेंब मध आणि लिंबाचा रस मिक्स करा.

Beauty: गरजेनुसार दूध घालून मिश्रण एकजीव करा. या पेस्ट चा मसाज १० मिनिटे चेहर्यावर करत राहाराहाव नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका.

प्रथमेश-क्षितिजा यांचा विवाह सोहळा पडला थाटामाटात पार ( Prathmesh parab wedding )

0

 

“मला वेड लागले प्रेमाचे… ” असे म्हणत प्रसिद्धीत आलेला दगडू म्हणजेच मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब याने क्षितिजा घोसाळकर हिच्यासोबत सप्तपदी घेऊन आपल्या आयुष्याच्या नवीन टप्प्याला सुरूवात केली आहे.

प्रथमेशने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटोज् शेअर सर्वांना ही गोड बातमी शेयर केली आहे. त्याने आपल्या चाहत्यांसाठी सप्तपदीचे फोटोज् पोस्ट केले आहेत. त्याच्या या फोटोज् वर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

थोडक्यात सांगायचे म्हणजे प्रथमेशचे चाहते त्याला वैवाहिक जीवनासाठी भरघोस शुभेच्छा देत आहेत..
अभिनेता प्रथमेश परबने लग्नात पांढर्या रंगाचा सदरा आणि गुलाबी रंगाची धोती परिधान केली होती.

तर क्षितिजा घोसाळकरने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून त्यावर गुलाबी रंगाची शाल घेतली होती. प्रथमेशने आपल्या विवाहात गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा रुबाबदार दिसणारा फेटाही बांधला होता.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

 

अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजा यांनी लवमॅरेज केले आहे. सर्वात अगोदर आपल्या दगडू सोबत क्षितिजाची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यादरम्यान त्यांची एकमेकांसोबत घट्ट मैत्री झाली.

Prathmesh parab wedding: टाइमपास ३ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि सरतेशेवटी त्यांचे प्रेम जिंकले.

चर्मकार समाजाच्या तरुणांनी व्यावसायिक शिक्षण घ्यावे – प्रशांत सोनवणे धानोऱ्यात संत रोहिदास जयंती साजरी. ( sant ravidas jayanti )

0

 

प्रतिनिधी l विकी वानखेडे

ग्रामीण भागातील सर्व समाज एकोप्याने रहात असल्याने आपली भारतीय संस्कृती टिकून आहे. आज सर्वच समाजात प्रत्येक बाबतीत प्रचंड स्पर्धा पाहण्यास मिळते.

यातून आपण आपली प्रगती साधत शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण घेणे गरजेचे आहे. यातून उन्नती साधता येत असते. पूर्वी संतांचे महान कार्य ही आजच्या समाजात आपले आदर्श ठरत आहेत.

यामुळे संताच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करुन त्यांच्या कार्याचा एक संदेश अवलंबला पाहिजे, याच बरोबर तरुणांनी स्पर्धा परीक्षेचा चांगला अभ्यास करुन प्रशासकीय सेवेत येऊन काम करावे, आपणास मिळत असलेल्या सवलतींच्या चांगला फायदा करून घेतला.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

पाहिजे तसेच समाजकारण डोळ्यांसमोर ठेऊन राजकारणात यावेत असे प्रतिपादन भुसावळ माध्यमिक शिक्षक पतपेढीचे खजिनदार प्रशांत सोनवणे यांनी आयोजित कार्यक्रमात केले.

येथे संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांची जयंती निमित्त प्रतिमापूजन करून प्रसाद यांचे वाटप करण्यात आले.यावेळी अडावद पोलिस ठाण्याचे उपनिक्षक राजू थोरात,माजी उपसभापती माणिकचंद महाजन, सरपंच रज्जाक

तडवी,राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष रविंद्र चौधरी, दूध संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण ठाकूर ,ग्राम पंचायत सदस्य रवींद्र शिरसाठ, मुक्तार अली, अतुल पाटील ,अशोक चौधरी ,सामाजिक कार्यकर्ते वासुदेव महाजन,अमोल महाजन, प्रशांत चौधरी ,राजेंद्र बोदडे ,अब्दुल कादीर ,आरिफ तडवी, जयदीप पाटील , चर्मकार समाजाचे सुरेश सोनवणे ,भास्कर

सोनवणे ,लक्ष्मण सोनवणे ,परशुराम सोनवणे ,चंद्रकांत सोनवणे ,विलास सोनवणे ,शांताराम सोनवणे ,लोटन सोनवणे, गणेश सोनवणे ,दिलीप सोनवणे , परशुराम दांडगे ,अनिल निभोरे,प्रविण सोनवणे, वैभव निंबाळकर, पराशर सुरवाडे, चेतन सोनवणे ,अविनाश वानखेडे, रोहन सोनवणे ,अजय निंबाळकर, राहुल सोनवणे महिला समाज बांधव आदि उपस्थित होते.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

यावेळी धानोरा सरपंच रज्जाक तडवी यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाल्याने चर्मकार समाजाकडून सन्मान करण्यात आला.

sant ravidas jayanti:यावेळी त्यानी चर्मकार वाड्याचा विकास तसेच समाज कार्यालयासाठी प्रयत्नशील असल्याने लवकरच कामास सुरुवात करणार असल्याचे सांगितले सूत्रसंचन भुमी फुटवेअर चे दिलीप सोनवणे आभार लोटन सोनवणे यांनी केले.

जिल्ह्यात चक्काजाम सगेसोयऱ्यांसाठी मराठा रस्त्यावर (Maratha Reservation: )

0

 

बीड प्रतिनिधी- मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत जिल्ह्यात भरातील मराठा समाज सगे सोयराच्या मुद्द्यावर आज रस्त्यावर उतरला होता जिल्हाभरात ठीक ठिकाणी रस्ता रोको करत चक्काजाम करण्यात आला..

यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बीड जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी रस्त्यावरती ठिय्या मांडून सगळी सोयरे कायद्याचे अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

यावेळी आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा घोषणाही दिल्या बीड तालुक्यात जिल्ह्याभरात मराठा समाजाने रस्ता रोक आंदोलन करून सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली..

वडवणी परळी केज पाटोदा आष्टी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले वडवणी मध्ये आंदोलन आणि पोलिसांच्या शाब्दिक चकमक झाली रस्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्हाभरात ठीक ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

केज मध्ये जेजुरी नदीच्या पुलावर महिलांनी रस्ता रोको केला होता यावेळी घोषणाबाजी करत संतप्त महिलांनी रस्ता अडवला यामुळे बराच वेळ ट्राफिक जाम झाली होती.

रस्त्यावर उभ्या असणाऱ्या महिलांनी एकही गाडी पुढे जाऊ दिली नाही शेवटी पोलिसांनी आव्हान करून रस्ता रोको आंदोलन मागे घ्यायला लावले मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं व सगेसोयरे अधिसूचना लागू करावी.

 

Maratha Reservation: यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेले आदेशाप्रमाणे आज पाटोदा तालुक्यातील पारगाव येथे नरपुरवाडी अनपटवाडी धालेवाडी येथे सर्व जाती धर्माची समाज बांधव यांच्या वतीने रस्ता रोखून अगदी शांतते करण्यात आला विद्यार्थी व पेशंट यांना सोडण्यात आले .

समृद्धि महामार्गावर भीषण अपघात १ ठार २ जख्मी वर स्त्याच्या कडेला पल्टी होऊन जळाला ट्रक (breking news ))

0

 

 

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी होऊन त्याला अचानक आग लागल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे ही घटना मेहकर इंटरचेंज पासून काही अंतरावर असलेल्या चायगाव गावाजवळ मुंबई कॉरिडोर मधील चॅनेल नंबर 290 जवळ आज सकाळच्या सुमारास घडली आहे

या बाबत अधिक माहिती नुसार अज्ञात नंम्बरचा ट्रक हा समृद्धि महामार्गाने नागपुर वरुन मुंबई कडे चालला होता

सकाळच्या सुमारास ट्रक चालकाला डुलकी लागल्यामुळे भरधाव ट्रक मेहकर इंटरचेंज पासून काही अंतरावर असणाऱ्या चैनल नंम्बर २९० जवळ महामार्गाच्या कठड्याला तोडून रस्त्याच्या खाली पल्टी झाला.

ट्रक पलटी होताच त्यामध्ये अचानक आग लागली यावेळी ट्रक मध्ये तीन जण अडकले होते अपघाताची माहिती मिळताच समृद्धि वरील जलद कृती दल,ॲम्बुलन्स अग्निशामक दलाचे वाहन,पोलिस त्याठिकानी पोहोचले त्यांनी तत्काळ ट्रकची आग विझवुन आत मध्ये अडकलेल्या तीन जणांना बाहेर काढले.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

ट्रक मधील एजाज शाह वय 20 वर्ष रा. उत्तर प्रदेश यांचा गंभीररित्या जळाल्यामुळे जागीच मृत्यु झाला होता तर शकील शाह वय 35 व शोएब अली वय 15 हे दोघे जण आगिने भाजल्यामुळे गंभीर जखमी झाले.

गंभीर जखमीना पुढील उपचारासाठी शहरातील खाजगी हॉस्पिटल मध्ये भरती केल्याची माहिती मिळाली असून मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय मेहकर येथे पाठविन्यात आले आहे.

 

breking news: या वेळी १०८ एम्बुलैंस चे डॉ.अशोक पिसे पायलट प्रदीप पडघान व भगवान राठोड़ तसेच समृद्धि महामार्ग पोलिस व जलद कृती दलाने तत्काळ अपघातग्रस्त ठिकाणी पोहचत मदत केली.

सोनाळा हद्दीत सहा देशी पिस्टलांसह 1आरोपीस अटक,1,84,320/-रु.चा मुद्देमाल जप्त.सोनाळा पोलीसांची यशस्वी कारवाई.(brekingnews )

0

 

बुलढाणा:-जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश राज्याचे सीमेवरील पो.स्टे.सोनाळा, तामगांव,जळगांव जामोद हद्दीतील ग्राम टुनकी परिसरात देशी बनावटीचे अग्नीशस्त्र (पिस्टल),काडसूसे वगैरेची खरेदी-विक्री होत असल्याच्या तक्रारी येत होत्या.

त्या अनुशंगाने तसेच आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 चे पार्श्वभूमिवर अशा अग्नीशस्त्रांची खरेदी विक्रीला प्रतिबंध करुन,असे व्यवहार करणारे ईसमांचा शोध घेवून,त्यांचेवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यसाठी पोलीस अधीक्षक सुनिल कडासने,अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात,बी.बी. महामुनी यांनी संबंधीत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी कार्यवाही केली.

प्राप्त माहितीनुसार दि. 23.02.2024 रोजी सपोनि चंद्रकांत पाटील-प्रभारी अधिकारी,पोहेको,विनोद शिवरे, पोर्की,राहूल पवार, चापोकों शेख इम्रान शेख रहेमान सर्व पो.स्टे. सोनाळा यांचे पथकाला गोपनीय खबर मिळाली की, पो.स्टे. सोनाळा हद्दीतील ग्राम इनकी बु ते लाडणापूर रोडवरील केदार नदीचे पुलाजवळ एक इसम देशी बनावटीचे पिस्टल (अग्नीशस्त्र) खरेदी विक्री करण्याच्या उद्देशाने त्याचे ताब्यात बाळगून आहे.

सदर गोपनीय खबरे वरुन नमुद पोलीस स्टाफ यांनी सदर ईसमास पकडून,त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ खालील प्रमाणे मुद्देमाल मिळून आला. सदर प्रकरणी पो स्टे. सोनाळा येथे गुरनं.46/2024 कलम 3/25 अग्नी शस्त्र कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.त्यामध्ये पकडण्यात आलेल्या.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

आरोपीची नांव-वसीम खान इंग्लीवास खान वय 22 वर्षे, रा. सिंगार, पुन्हाना, जिल्हा-नूरु, राज्य-हरीयाणा असे आहे.
आरोपी कडून जप्त मुद्देमाल
1) देशी बनावटीचे 06 नग अग्नीशस्त्र (पिस्टरन)कि. प्रत्येकी 30,000/-रुपये प्रमाणे 1,80,000/-रुपये,2) 07 नग पिस्टल मॅग्झीन कि.2000/-रुपये,3) एक नग जिवंत काडतूस- किं. 500/-रुपये,4) एक नोबाईल फोन क्रि. 500/-रुपये,5) नगदी रोख- 1120/- रुपये,6) एक बॅग कि 200/-रुपये

असा एकृण.1,84,320/-रुपयांचा
गुन्ह्यातील इतर आरोपीतांचा शोध व तपास सुरू आहे.
नमूद गुन्ह्यामध्ये ईतर आरोपीतांचा शोध घेणेकरीता पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि, अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी स्था गु शा. बुलढाणा यांचे नेतृत्वामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पथके तयार करण्यात आले आहेत.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

 

सदरची पथके अनोपंतांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आलेली आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. चंद्रकांत पाटील-प्रभारी अधिकारी पो स्टे सोनाळा करीत आहेत.वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शन व कामगिरी पथक सदरची कामगिरी श्री सुनिल कड़ासने- पोलीस अधीक्षक बुलडाणा, श्री अशोक थोरात-अपर पोलीस अधीक्षक खामगांव श्री बी बी महामुनी अपर पोलीस अधीक्षक

brekingnews: बुलढाणा, श्री डी एस गवळी उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली सपोनि चंद्रकांत पाटील-प्रभारी अधिकारी, पाहेको, विनोद शिबरे, पोकों राहुल पवार, चापोकों शेख इमान शेख रहमान सर्व पास्ट सोनाळा यांचे पथकाने पार पाडली आहे.

सासूने लाकडी बॅटने घेतले जावाईची विकेट बॅटने मारहाण केल्याने जावाई यांचं मृत्यू .( crimenews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणाजिल्हा प्रतिनिधी

शेगाव .ग्रामीण पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार
शेगाव तालुक्यात येणाऱ्या तसेच शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या जवळा बुद्रुक येथील
दिपक गजानन हाडोळे याला लाकडी बॅटने मारहाण करून त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या.

बद्दल दीपक हाडोळे याच्या सासू विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृतकाची पत्नी. वैष्णवी दीपक हाडोळे वय 30 वर्षे राहणार जवळा बुद्रुक तालुका शेगाव हिने

शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली की आरोपी ही फीर्यादी हिची आइ आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

जवळा बुद्रुक येथे 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळ दरम्यान यातील मृतक दीपक हा दारु पिउन फीर्यादीचे घरासमोर येउन शिवीगाळ करु लागला गेटला लाथा व दगड मारु लागला गेटची कडी वाकवुन गेट उघडले.

त्यानंतर मोठ्या दगडाने व विटांनी घराच्या दाराला कडी कोंडा व कुलुपाला मारले म्हणुन आरोपी हिने घराचा मागचा दरवाजा उघडुन बाहेर येउन फीर्यादीचे पतीच्या डोळयात मिरचीची पावडर फेकली बाजुला पडलेली लाकडी बॅटने बॅट फाकेपर्यंत फीर्यादीचे पतीला मारहाण केल्यामुळे मरण पावला आहे.

 

अशा तोडी रिपोर्ट वरून आरोपी सुशीला बाप अवधूत काळे राहणार जवळा बुद्रुक तालुका शेगाव विरुद्ध
अप क्रमांक 54/कलम 302भांदवी नुसार गुन्हा दाखल केला आहे.

crimenews: तपास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी शिंदे सा हे करीत आहेत

पत्रकार संतोष थोरहाते विश्वकर्मा पुरस्काराने सन्मानित !( journalist )

0

 

चिखली तालुका विश्वकर्मा जयंती उत्‍सव समिती विधायक पत्रकारीतेची दखल

 

हिवरा आश्रम ता,२२ः गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मूल्याधिष्टीत, शोधपत्रकारीता व विधायक पत्रकारीतमुळे परिचित असलेले हिवरा आश्रम येथील पत्रकार संतोष थोरहाते यांना नुकताच प्रभू विश्वकर्मा पुरस्काराने चिखली येथे सन्मानीत करण्यात आले.

चिखली तालुका विश्वकर्मा जयंती उत्‍सव समितीच्या वतीने बुधवारी ता.२१ रोजी चिखली येथील संत खटकेश्वर महाराज संस्थान येथे आयोजित प्रभू विश्वकर्मा जयंती उत्‍सव कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांच्या संतोष थोरहाते यांना विश्वकर्मा पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अत्रिनंदन सिमेंट प्रोडक्टचे संचालक विजयकुमार मेहत्रे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बुलडाणाचे जिल्हा उद्योग केंद्राचे सुनील पाटील तर प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संजय गाडेकर, संपादक पवन वानखेडे,पत्रकार सुधीर चेके,

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

जेष्ठ कामगार नेते सतीष शिंदे, ॲड वृषाली ताई बोंद्रे, गाव माझा च्या महिला प्रमुख अष्टगाथा मॅडम, सीमा मॅडम, मेघा जाधव, मार्गदर्शक,श्रीराम वानखडे, गजानन जवरकर, उत्सव समिती संतोष जगताप, बंडू कदम, राहुल इंगळे, समाधान, भोलवनकर तथा आदि उपस्थित होते.

संतोष थोरहाते यांनी हिवरा आश्रम सारख्या छोटयाशा खेडयापासून पत्रकारितेची सुरुवात केली. गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण भागात विधायक व शोधपत्रकारीतेचा वसा घेत कार्य करीत आहे.

त्‍यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजातील दुर्बल, वंचित घटकांच्या हक्क व न्यायासाठी पत्रकारीतेच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केले. अभ्यासपूर्ण लेखन, शोधपत्रकारीता हे त्यांच्या पत्रकारीतेचे मुख्य अंग आहे.

अल्पावधीतच आपल्या विधायक पत्रकारीतेच्या माध्यमातून जिल्हयातील पत्रकारीतेच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली.

 

संतोष थोरहाते यांच्या विधायक पत्रकारीतेची दखल घेत त्यांना विविध सेवाभावी संस्थाकडून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पत्रकारिते सोबत त्यांनी योगप्रचाराचे मोठे कार्य केले आहे.

journalist: सुप्रसिध्द ग्राफिक्स डिझायनर,व्हिडीओ एडिटर, फाँट डेव्हलपर सुध्दा आहेत.

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती साजरी..Shegaonnews 

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव:राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष माधुरीताई शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली येथील प्रभाग क्रमांक आठ मधील गजानन नगर या ठिकाणी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती स्वच्छता अभियान राबवून साजरी करण्यात आली .

सर्वप्रथम संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या सर्व उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसरात स्वच्छता अभियान राबविले.

या स्वच्छता अभियानामध्ये राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिव सौ माधुरी ताई क्षिरसागर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अर्चनाताई डगवाले, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य संघटक पुष्पाताई काळे , सुनिता देशमुख, पल्लवी माळी,

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

 

Shegaonnews:सौ पारस्कर ताई, कविता हिरळकर, गोदावरी जामोदे, सौ शहाकार, लता शाहकार ,रूपाली जामोदे, सुषमा जामोदे, वैशाली चहाकार, सौ माळोदे मॅडम, विजय हिरडकर गोपाल पवार सुनील चहा कर प्रमोद शहाकार प्रवीण वडुळकर दिनेश जामोदे शुभम पवार सोहम हिरळकर रितेश जामोदे,यांच्यासह परिसरातील महिला भगिनी व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते